Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ITR Verification Deadline: आयकर विभागाने करदात्यांना दिली 30 दिवसांची वाढीव मुदत दिली

ITR Verification Deadline

ITR Verification Deadline: 2022-23 मध्ये करदात्यांना विलंबित आणि सुधारित आयटीआर दाखल करण्यासाठी अंतिम तारीख 31 डिसेंबर 2022 देण्यात आली होती. मात्र आता आयकर विभागाने आयटीआर पडताळणीसाठी करदात्यांना 30 दिवसांची वाढीव मुदत दिली आहे.

ITR Verification Deadline:  ज्या नागरिकांची वार्षिक कमाई २.५ लाख ते ५ लाख रुपये आहे त्यांनी आयटीआर दाखल करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वार्षिक ५ लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्यांना आयटीआर भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. वर्ष 2022-23 साठी करदात्यांसह विलंबित आणि सुधारित आयटीआर (belated or revised ITR) दाखल करण्यासाठी अंतिम तारीख 31 डिसेंबर 2022 देण्यात आली होती. मात्र आता आयकर विभागाने (Income Tax Department) आयटीआर पडताळणीसाठी (ITR verification) करदात्यांना 30 दिवसांची वाढीव मुदत दिली आहे. ज्या करदात्यांनी 31 डिसेंबर 2022 पर्यंत उशीरा दंड भरून विलंबित ITR सुधारित आयटीआर (belated or revised ITR) दाखल केले आहेत त्यांना ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने करदात्यांना 30 जानेवारीपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे.

ई-व्हेरिफायच्या माध्यमातून करता येईल पडताळणी

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानुसार, ज्या करदात्यांनी 31 डिसेंबर 2022 पर्यंत उशीरा दंड भरून विलंबित ITR किंवा सुधारित ITR भरला आहे, त्यांना ITR मध्ये दिलेल्या माहितीची पडताळणी करावी लागणार आहे. करदाते आयटीआर ई-व्हेरिफायच्या माध्यमातून 30 जानेवारी 2023 ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. देण्यात आलेली तारीख ही अंतिम असणार आहे. म्हणजेच जानेवारी महिन्यात करदात्यांना कोणत्याही परिस्थितीत आयटीआरची पडताळणी ही करावीच लागेल.

आयटीआर ई-व्हेरिफिकेशन झाले नाही तर?

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने सांगितल्यानुसार, दिलेल्या मुदतीत आयटीआर ई-व्हेरिफिकेशन झाले नाही तर ते अवैध ठरवण्यात येईल. याचा अर्थ तुमचा ITR भरणे व्यर्थ ठरणार आहे. त्यामुळे 30 जानेवारी 2023 पूर्वी करदात्याने ITR मध्ये दिलेल्या सर्व माहितीची पुष्टी करणे आणि त्याचे ई-व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे. जर हे ई-व्हेरिफिकेशन अयशस्वी झाल्यास आयकर नोटीस, कायदेशीर कारवाई किंवा दंडही  होऊ शकतो.

ई-व्हेरिफिकेशन करण्यासाठी 'येथे' भेट द्या

विलंबित किंवा सुधारित आयटीआर ई-व्हेरिफिकेशन करण्यासाठी करदाते ऑनलाईन पद्धतीचा वापर करू शकतात. यासाठी करदात्याला आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईट https://www.incometax.gov.in/iec/foportal/  वर जावे लागेल आणि ई-व्हेरिफिकेशन पर्याय निवडून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.