आगामी अर्थसंकल्पात सरकार 35 हून अधिक वस्तूंवरील सीमाशुल्क वाढविण्याचा विचार करत आहे.केंद्र सरकारने या वस्तूंची यादी तयार केली आहे. ज्यात खाजगी जेट, हेलिकॉप्टर, दागिने, हाय-एंड इलेक्ट्रॉनिक वस्तू, प्लास्टिक वस्तू यांचा समावेश आहे.
व्यापारी तूट आणि वित्तीय तूट कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध पर्यायांचा विचार केला जात आहे. विविध मंत्रालयांच्या शिफरशींच्या आधारे वस्तूंची यादी तयार करण्यात आली आहे. या वस्तूंवर शुल्क वाढवल्यास आयात कमी होण्यास मदत होईल. याशिवाय यापैकी काही उत्पादनांच्या स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन मिळेल.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने डिसेंबरमध्ये विविध मंत्रालयांना अत्यावश्यक वस्तूंची यादी तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या. वाणिज्य मंत्रालयाने अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्कात कपात करण्याची मागणीही केली आहे, ज्यामुळे रत्ने आणि दागिने क्षेत्राची निर्यात आणि उत्पादन वाढेल. देशाच्या चालू खात्यातील तूट (CAD) आणि सोन्याच्या वाढत्या आयातीला लगाम घालण्यासाठी सरकारने या वर्षी जुलैमध्ये सोन्याचे आयात शुल्क 10.75% वरुन 15% केले होते. सोन्यावरील मूळ सीमाशुल्क 12.5 टक्के आहे. 2.5 टक्के कृषी पायाभूत विकास उपकर (AIDC) आणि सीमा शुल्क 15 टक्के आहे.
रत्ने आणि दागिने उद्योगाने वाणिज्य मंत्रालयाला शुल्कात कपात करण्याची शिफारस केली आहे. उत्पादन आणि निर्यातीला चालना देण्यासाठी काही इतर उत्पादनांवरील आयात शुल्कातही बदल करण्याची शिफारस वाणिज्य मंत्रालयाला केली आहे.
एप्रिल-नोव्हेंबर 2022 दरम्यान, एप्रिल-नोव्हेंबर 2022 साठी व्यापारी व्यापार तूट 198.35 बिलियन डॉलर झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात व्यापारी तूट 115.39 बिलियन डॉलर होती. निर्यातीत 11% वाढून 295.26 बिलियन डॉलर झाली आहे.या आर्थिक वर्षातील आठ महिन्यांच्या कालावधीत आयात मात्र 29.5% वाढून 493.61 बिलियन डॉ़लर्स झाली आहे. एप्रिल-नोव्हेंबर 2021 दरम्यान 381.17 बिलियन डॉलर इतके होते. भारताची चालू खात्यातील तूट (CAD) सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत GDPच्या 4.4% वाढली.