Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Vaalvi Marathi Movie Box office Collection: वेड चित्रपट पाठोपाठ 'वाळवी' ही सुपरहीट, बॉक्स ऑफिसवर जमविला कोटींचा गल्ला

Vaalvi Marathi Movie Box office Collection

Image Source : http://www.mtwikiblog.com/

Vaalvi Marathi Movie: वेड चित्रपटाच्या पाठोपाठ वाळवी हा मराठी चित्रपटदेखील बॉक्स ऑफिसवर सुपरहीट ठरत आहे. या चित्रपटानेदेखील फार कमी दिवसात कोटींचा गल्ला जमा केला.

Vaalvi Movie: मागील काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात ‘वेड’ (Ved) या चित्रपटाची चर्चा होती. आता वेड पाठोपाठ ‘वाळवी’ (Vaalivi) हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर कब्जा करीत आहे. या चित्रपटाने फार कमी दिवसात कोटींचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या क्रिएटीव प्रमोशनचा फायदा या चित्रपटाला झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.

पहिल्या आठवडयात 1 कोटी 33 लाखाची कमाई

परेश मोकाशी दिग्दर्शित वाळवी या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारण प्रेक्षकांच्या आग्रहामुळे या चित्रपटाचे शो देखील वाढविण्यात आले आहेत. यामुळे थिएटर मालकदेखील आश्चर्य व्यक्ती करीत आहेत. यापूर्वी बाॅलिवुड चित्रपटांमुळे मराठी शो ची संख्या कमी केल्याचे पाहिले आहे, मात्र पहिल्यांदाच हिंदी चित्रपटाचे शो कमी करून, मराठी चित्रपटाचे वाढविले असल्याचे दिसले. वाळवी हा चित्रपट 13 जानेवारीला प्रदर्शित झाला होता. पहिल्याच आठवडयात या चित्रपटाने 1 कोटी 33 लाखाची कमाई केली होती.

दुसऱ्या आठवडयात  3 कोटीपेक्षा ही अधिक गल्ला

वाळवी या चित्रपटातील प्रमुख भूमिकेत असलेले कलाकार सुबोध भावे (Subhod Bhave), स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) व शिवानी सुर्वे (Shivani Surve) यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे. त्यामुळे या चित्रपटाची विजयी घौडदौड आणखी सुरू आहे. मागील आठवडयात या चित्रपटाने शनिवारपर्यंत 2 कोटी 53 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर रविवारी या चित्रपटाने , बॉक्स ऑफिसवर 67 लाखाची कमाई केली. त्यामुळे फक्त दोन आठवडयात या चित्रपटाने 3 कोटीपेक्षा ही अधिक गल्ला जमविला आहे.  वेड चित्रपटपाठोपाठ वाळवी हा चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे, हे मात्र खरं आहे.