Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Online Shopping ची वाढली क्रेझ, ई-कॉमर्स उद्योगात नोंदवली गेली 26.2 टक्के वाढ!

Online Shopping ची वाढली क्रेझ, ई-कॉमर्स उद्योगात नोंदवली गेली 26.2 टक्के वाढ!

गेल्या सहामाहीत ऑनलाइन खरेदीदारांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे विविध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा सुळसुळाट आणि त्यावर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी देण्यात येणाऱ्या ऑफर्स. Unicommerce च्या अहवालानुसार ऑनलाइन शॉपिंगच्या बाबतीत सर्वाधिक वाढ ही टियर-1 शहरांमध्ये पाहायला मिळते आहे.

ऑनलाइन शॉपिंग ही काही नवी गोष्ट राहिली नाहीये. आज गावखेड्यात देखील ऑनलाइन शॉपिंग करणारे भरपूर लोक तुम्हांला आढळतील. मात्र गेल्या काही वर्षांपासून इंटरनेटचा वापर आणि विस्तार वाढल्यानंतर  ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ पाहायला मिळते आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Unicommerce ने त्यांच्या वार्षिक अहवालात एक महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये ऑनलाइन खरेदीदारांची संख्या वाढली असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

याचे मुख्य कारण काय?

गेल्या सहामाहीत ऑनलाइन खरेदीदारांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे विविध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा सुळसुळाट आणि त्यावर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी देण्यात येणाऱ्या ऑफर्स. यासोबतच कोविड दरम्यान अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली होती. त्यावेळी अनेक लोक आपापल्या गावी जावून घरून काम करत होते. काम आणि इतर खरेदी संभाळणे त्यांना त्यामुळे शक्य झाले होते. सोबतच कोविडचा प्रसार झपाट्याने होत असताना ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मला लोक पसंती देत नव्हते.

मात्र जसजसा कोविडचा प्रसार कमी झाला, तसतसे कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसमधून काम करण्यास सांगितले गेले आहे. त्यामुळे बरेचशे कर्मचारी छोट्या शहरांमधून, त्यांच्या गावातून पुन्हा एकदा ऑफिसच्या ठिकाणी मोठ्या शहरांत स्थलांतरित झाले आहेत. अशा परिस्थितीत ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी करण्यात वाढ झाली असल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदवले गेले आहे.

ऑनलाइन शॉपिंगमध्ये टियर-1 शहरे आघाडीवर 

Unicommerce च्या अहवालानुसार ऑनलाइन शॉपिंगच्या बाबतीत सर्वाधिक वाढ ही टियर-1 शहरांमध्ये पाहायला मिळते आहे.  टियर-1 शहरांमध्ये ऑनलाइन शॉपिंगच्या ऑर्डरमध्ये  31.1 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर टियर-2 आणि टियर-3 शहरांमध्ये देखील अनुक्रमे  23.3 टक्के आणि 22.4 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

केवळ मोठ्या शहरांमध्येच नाही तर छोट्या शहरांमध्ये देखील ऑनलाइन शॉपिंग करण्याची क्रेझ वाढताना दिसते आहे. नागरिकांना मोठ्या प्रमाणात पर्याय उपलब्ध झाले असल्यामुळे आणि वेळेची बचत करण्यासाठी देखील लोक  ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मला पसंती देताना दिसतायेत.

ई-कॉमर्स उद्योग तेजीत

युनिकॉमर्सच्या अहवालानुसार ई-कॉमर्स उद्योगात वार्षिक 26.2 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. त्याच वेळी, वार्षिक आधारावर GMV (ग्रॉस मर्चेंडाईज व्हॉल्यूम) मध्ये 23.5 टक्के वाढ झाली आहे.कर्मचाऱ्यांचे मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरण झाल्यामुळे आता टियर-3 आणि टियर-3 शहरांमधील उद्योगात मात्र किरकोळ घट झाली आहे.