Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Indias First Semiconductor Plant : देशातील पहिला सेमीकंडक्टर प्लांट गुजरातमधील ‘या’ ठिकाणी उभारला जाणार

Indias First Semiconductor Plant

Image Source : www.businesstoday.in.com

देशातील पहिला सेमीकंडक्टर प्लांट लवकरच (first semiconductor plant) गुजरातमध्ये सुरू होणार आहे, म्हणजेच तो दिवस दूर नाही जेव्हा जगभरातील स्मार्टफोन, टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक उपकरण मेक इन इंडिया सेमीकंडक्टर्स (Chip) द्वारे सपोर्टेड असतील.

कोरोनानंतर, चीनमधील परिस्थितीमुळे संपूर्ण जगात सेमीकंडक्टर संकट निर्माण झाले. सेमीकंडक्टरच्या पुरवठ्यासाठी चीनचा पर्याय शोधला जात होता. आता भारत ही पोकळी भरून काढणार आहे. देशातील पहिला सेमीकंडक्टर प्लांट लवकरच (first semiconductor plant) गुजरातमध्ये सुरू होणार आहे, म्हणजेच तो दिवस दूर नाही जेव्हा जगभरातील स्मार्टफोन, टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक उपकरण मेक इन इंडिया सेमीकंडक्टर्स (Chip) द्वारे सपोर्टेड असतील.

धोलेरामध्ये उभारणार प्लांट

उद्योगपती अनिल अग्रवाल यांचा वेदांत ग्रुप आणि फॉक्सकॉन ही सेमीकंडक्टर क्षेत्रातील मोठी उत्पादक कंपनी संयुक्तपणे हा प्लांट उभारणार असून गुजरातमधील धोलेरा या स्पेशल इन्व्हेस्टमेंट रिजनची निवड करण्यात आली आहे. हा विशेष प्रदेश अहमदाबादजवळ येतो.

जागा आधी ठरलेली नव्हती

वेदांता आणि फॉक्सकॉन भारतात सेमीकंडक्टर प्लांट स्थापन करण्यावर बऱ्याच दिवसांपासून चर्चा करत आहेत, पण त्यांचा उत्पादन प्रकल्प नेमका कुठे उभारला जाईल, हे दोन्ही कंपन्यांच्या संयुक्त उपक्रमाकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नव्हतं. याबाबत आता परिस्थिती स्पष्ट झाली आहे. सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, राज्य सरकारी कर्मचार्‍यांसह साईटचे विश्लेषण केल्यानंतर, संयुक्त उपक्रमाला प्लांट उभारण्यासाठी धोलेरा योग्य असल्याचे आढळले आहे. हा प्रकल्प आता प्रगत अवस्थेत आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबरमध्ये भावनगरमध्ये जाहीर सभेला संबोधित केले होते. त्यावेळी त्यांनी धोलेरा एसआयआरमध्ये सेमीकंडक्टर प्लांट उभारण्याचे संकेत दिले होते.

1.54 लाख कोटींची गुंतवणूक 

गुजरात सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नुकतीच माहिती दिली की, वेदांता आणि फॉक्सकॉन यांनी यासाठी संयुक्त उपक्रम (जॉइंट व्हेन्चर) तयार केला आहे. या संयुक्त उपक्रमाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येच राज्य सरकारसोबत सामंजस्य करार (MoU) केला होता. कंपनी राज्यात 1.54 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून हा प्रकल्प उभारणार आहे. देशाच्या इतिहासातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कॉर्पोरेट गुंतवणूक आहे अशी माहिती मिळाली आहे. या प्लांटमध्ये सेमीकंडक्टर सोबत डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग युनिटही स्थापन करण्यात येणार आहे. देशातील हे पहिले सेमीकंडक्टर उत्पादन युनिट ठरणार आहे.

लाखो रोजगार निर्माण होतील

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये गुजरात सरकार आणि संयुक्त उपक्रम यांच्यात हा सामंजस्य करार पार पडला. गांधीनगर येथे केंद्रिय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत दोन्ही बाजूंनी त्यावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले होते की, या प्लांटमधून राज्यात एक लाख नोकऱ्या निर्माण होतील.