अमरावतीत सकाळच्या नाश्त्याला मिळणारा ‘गिला वडा’. आधी हा पदार्थ 10 रुपयाला प्लेट मिळत होता. वाढत्या महागाईनुसार आता 20 रुपयांमध्ये फूल प्लेट नाश्ता मिळतो.
'तर्री पोहा' हा स्पेशली नागपूरचा पदार्थ. सकाळी सकाळी नागपुरात फेरफटका मारला तर तुम्हाला ठिकठिकाणी तर्री पोहाचे स्टॉल्स दिसतील. तरी पोहा 25 रुपये फूल प्लेट प्रमाणे दिला जातो.
सांभरवडीलाच ‘कोथिंबीर वडी’ देखील म्हणतात. हिवाळ्यामध्ये शेतातीत हिरवीगार कोथिंबीर निघाल्यानंतर हा पदार्थ बनविला जातो. कोथिंबीर वडी आणि मसाला ताक 25 रुपये प्लेटप्रमाणे नाश्तासाठी मिळते.
गजानन महाराजांचे देवस्थान असलेले शेगाव. येथील कचोरी संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. ही कचोरी आता फक्त शेगावमध्येच नाही तर विदर्भातील बहुतेक शहरातसुद्धा मिळते. शेगाव कचोरी 20 रुपये प्लेटप्रमाणे नाश्तासाठी मिळते.
बटाटा वडा हा सुद्धा नागपूरमध्ये सकाळी नाश्तासाठी खूप प्रसिद्ध आहे. यालाच ‘आलूबोंडा’ सुद्धा म्हटले जाते. विदर्भात कुठेही जा तुम्हाला हा नाश्ता 20 रुपये प्लेटप्रमाणेच मिळेल.