Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा, 5G सेवेसाठी 100 लॅब्स उभारणार

100 labs will be set up for 5G service

5G Internet: देशातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. विशेषत तरूण वर्ग हा मोठा खूश होणार आहे. कारण देशात आता 5G सेवेसाठी लवकरच 100 लॅब्सची निर्मिती करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.

Budget 2023: अर्थसंकल्प 2023 नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 5G सेवेसाठी 100 लॅब्स उभारणार असल्याची घोषणा यावेळी केली. यामुळे आता देशात इंटरनेट स्पीड सुपरफास्ट मिळणार आहे. या घोषणेमुळे टेलिकाॅम दुनियेला मोठा दिलासा मिळाला आहे. आता सध्या देशात रिलायन्स जिओ व एअरटेल 5G सेवा पुरवित आहेत.

कोणी सुचविली ही योजना (Someone Suggested this Plan)

5G ही सेवा सुरू करण्याची योजना केंद्रीय कॅबिनेट मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सुचविली होती. तसेच त्यांनी 100 लॅबपैकी 12 लॅबचे इन्क्यूबेटरमध्ये रूपांतर करण्याचा प्रस्तावदेखील ठेवला होता. कारण यामुळे टेलिकाॅम क्षेत्रातील विद्यार्थ्यांना याचे प्रशिक्षण देता येईल व नवनवीन प्रयोगांना चालनादेखील मिळेल असे त्यांचे म्हणणे होते. 

5G लॅब कशी काम करेल (How the 5G Lab will Work)

5G लॅबमुळे इंटरनेट सुपरफास्ट मिळण्यास मदत होणार आहे. 5G साठी उभारण्यात येणारी ही लॅब अनेक क्षेत्रांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या लॅब खाजगी क्षेत्राला स्वयंचलित चाचणी सुविधा पुरवतील. अकादमीशी संबंधित लोक आणि सरकार एकत्रितपणे भविष्यातील संबंधित विविध संकल्पना या प्रत्यक्षात आणू शकतात.  मॅन्युफॅक्चरिंग आणि हेल्थकेअर यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये 5G चा वापरामध्ये आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे.  

5G इंटरनेटचे फायदे (Advantages of 5G Internet)

देशात सध्या रिलायन्स जिओ आणि एअरटेल 5G सेवा पुरवित आहेत. 5G च्या माध्यमातून युजर्स फक्त सुपरफास्ट स्पीडचा फायदा घेऊ शकत नाहीत, तर ऑगमेंटेड रिअॅलिटी, व्हर्च्युअल रिअॅलिटी यासारख्या गोष्टींचाही फायदा होऊ शकतो. या तंत्रज्ञानाचा फायदा केवळ टेलिकाॅम क्षेत्रा पुरताच नव्हे, तर इतर क्षेत्रांना देखील  होणार आहे.