तडकाफडकी निर्णयांमुळे इलॉन मस्क सध्या समाज माध्यमात ट्रेंडिंगमध्ये आहेत. ट्विटरसंबंधीचे मस्क यांचे धोरण कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक ठरले आहे. मात्र या संभ्रमाच्या वातावरणाने वैतागलेल्या ट्विटरच्या कर्मचाऱ्यांनी इलॉन मस्क यांना जोरदार धक्का दिला आहे. मस्क यांनी दिलेल्या अल्टिमेटमपूर्वीच शेकडो कर्मचाऱ्यांनी ट्विटरला रामराम ठोकला आहे.
शेकडो कर्मचाऱ्यांचा अंतिम मुदतीपूर्वीच राजीनामा
ट्विटरचा मालक इलॉन मस्क याने ट्विटरमधील कर्मचाऱ्यांना नोकरी सोडायची की नाही हे ठरवण्यासाठी मुदत दिली होती. द न्यूयॉर्क टाइम्सने याबाबतचे वृत्त दिले होते. यानुसार गुरुवारी 5 वाजेपर्यंतची ही मुदत होती. मात्र याआधीच शेकडो कर्मचाऱ्यांनी तीन महिन्यांचा अगोदर पगार घेऊन राजीनामाचं देण्याचा निर्णय घेतला. यामुळे आक्रमकता इलॉन मस्कच्या यांच्या अंगलट आली आहे. इलॉन मस्क यांच्यासाठी हे अनपेक्षित होते. अगोदरच हजारो कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केल्याने ट्विटरसमोर पेच निर्माण झाला. तो सोडवण्याच्या दृष्टीने मस्क यांनी कर्मचाऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र आता कर्मचारीच स्वताहून नोकरी सोडून जाऊ लागल्याने मस्क यांची चिंता वाढली आहे.
टेस्लाच्या कर्मचाऱ्यांवर ट्विटरचा वर्कलोड
इलॉन मस्क टेस्ला या इलेक्ट्रिक कार निर्मात्या कंपनीचे मालक आहेत. ट्विटरमध्ये मुदतपूर्व राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या शेकडो आहे. यात दिवसागणीक वाढ होत आहे. यामुळे ट्विटरच्या प्रशासनावर याचा परिणाम होतेय. यावर उपाय म्हणून टेस्लामधील काही कर्मचाऱ्यांची ट्विटरच्या कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली. ट्विटर अकाउंटवरील ब्ल्यू टिक पेड करणे असो की मोठ्या प्रमाणात यापूर्वी केलेली कर्मचारी कपात असो, अशा निर्णयांमुळे जागतिक औद्योगिक वर्तुळात मस्क यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. मात्र ट्विटरमधील कर्मचाऱ्यांच्या सामूहिक राजीनामा सत्रामुळे अल्पावधीसाठी का होईना मस्क यांना पेचात टाकले आहे.