Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PHANTOM X2 Pro: TECNO ने मार्केटमध्ये आणला नवीन PHANTOM X2 Pro, जाणून घ्या फीचर्स

PHANTOM X2 Pro

Image Source : http://www.noypigeeks.com/

PHANTOM X2 Pro: Tecno Phantom X2 Pro 5G स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी लॉन्च करण्यात आला आहे. ही कंपनीच्या Tecno Phantom X2 5G ची स्ट्रॉंग सिरिज आहे. आज लॉन्च केलेल्या प्रो मॉडेलमध्ये (Pro model), कंपनीने मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसरसह (MediaTek Dimension Processor) 50 मेगापिक्सेल ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे.

PHANTOM X2 Pro: Tecno Phantom X2 Pro 5G स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी लॉन्च करण्यात आला आहे. ही कंपनीच्या Tecno Phantom X2 5G ची स्ट्रॉंग सिरिज आहे. आज लॉन्च केलेल्या प्रो मॉडेलमध्ये (Pro model), कंपनीने मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसरसह (MediaTek Dimension Processor) 50 मेगापिक्सेल ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. Tecno Phantom X2 Pro 5G मोबाईलची भारतातील किंमत आणि फीचर्सबद्दल जाणून घेऊया. 

Tecno Phantom X2 Pro 5G डिटेल्स (Tecno Phantom X2 Pro 5G details)

डिस्प्ले

या नवीन फोनमध्ये 6.8-इंचाचा फुल-एचडी प्लस AMOLED डिस्प्ले आहे जो 120 Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. security साठी कंपनीने गोरिल्ला ग्लास व्हिक्टसचा वापर केला आहे.

प्रोसेसर

वेग आणि मल्टीटास्किंगसाठी, कंपनीने टेक्नो फँटम X2 प्रो मध्ये 4nm वर आधारित MediaTek Dimensity 900 चिपसेट वापरला आहे.

कॅमेरा सेटअप

हा फोन जगातील पहिला 50MP कॅमेरा सेन्सर फोन आहे, त्याचबरोबर तुम्हाला 50 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा सेन्सर आणि 13 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा सेन्सर मिळेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील भागात 32-मेगापिक्सल कॅमेरा सेन्सर असणार आहे.  मागील कॅमेरा 60fps वर 4K व्हिडिओ रेकॉर्ड करू शकणार आहे. 

बॅटरी

फोनमध्ये 5160 mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 45W फास्ट चार्जला सपोर्ट करते.

Tecno Phantom X2 Pro 5G ची किंमत (Tecno Phantom X2 Pro 5G price)

या टेक्नो मोबाईल फोनची किंमत 49 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे, आजपासून ग्राहकांसाठी Amazon वर या डिवाइसची प्री-बुकिंग सुरु झाली आहे. या टेक्नो फोनसोबत 12 महिन्यांसाठी मोफत Amazon प्राइम मेंबरशिप (Amazon Prime Membership) दिली जात आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी, व्याजाशिवाय ईएमआयची सुविधा देखील उपलब्ध आहे.