IT सेवा कंपनी टेक महिंद्राने नुकतेच सांगितले की, ती पुढील दोन वर्षांत उत्पादने आणि प्लॅटफॉर्म क्षेत्रात 700 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. महिंद्रा कंपनीने आधीच प्लॅटफॉर्म व उत्पादन क्षेत्रात उपस्थित आहे .
"पुढील दोन-तीन वर्षांमध्ये, उत्पादने आणि प्लॅटफॉर्ममधून मिळणारा महसूल USD 1 बिलियनपर्यंत नेण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे," असे वेळी नवीन विभागाची घोषणा केल्यानंतर टेक महिंद्रा कंपनीचे कार्यकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सीपी गुरनानी यांनी सांगितले. पुण्यातील व्हर्च्युअल संवादात ते बोलत होते. कॉमविवाच्या टीमच्या नेतृत्वात नवीन विभागातील गुंतवणूक पुढील अडीच वर्षांत 500-700 कोटी रुपयांपर्यंत नेणार आहे असे गुरनानी म्हणाले.
भुवनेश्वर आणि बेंगळुरू येथील कॉमविवा संघाला संपूर्ण उत्पादने आणि प्लॅटफॉर्म या नवीन क्षेत्राचे नेतृत्व करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. दूरसंचार व्यतिरिक्त टेक महिंद्रा बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे.
प्रथम ग्राहक निर्मितीकडे कंपनीचे लक्ष्य (The company aims to create customers first)
कंपनीचे कॉर्पोरेट डेव्हलपमेंटचे अध्यक्ष विवेक अग्रवाल म्हणाले की, कंपनी सध्यस्थितीत उत्पादने आणि प्लॅटफॉर्म ऑफरसाठी प्रथम ग्राहक तयार करतील आणि ग्राहकांसाठी काम करून मिळवलेल्या एम्बेडेड डोमेन ज्ञानाचा फायदा घेतील.
टेक महिंद्रा ग्राहकांसोबत सहनिर्मिती करण्यावरही लक्ष केंद्रित करेल, पुढे ते म्हणाले की, एका जपानी ग्राहकासोबत ब्रँड सोल्यूशन करण्यास त्यांनी सहमती दर्शवली आहे ज्यामुळे जगभरातील वाहन उद्योगालाही मदत होईल. ते ma समूहातील इतर कंपन्यांसोबतही काम करणार आहे.
गुंतवणूकदारांचे मत (Investors' Opinion)
एक दिवसापूर्वी गुंतवणूकदारांशी बोलताना, कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी रोहित आनंद म्हणाले की कंपनी भविष्यात सेंद्रिय वाढ, मार्जिन विस्तार आणि ड्रायव्हिंग पोर्टफोलिओ सिनर्जी यावर लक्ष केंद्रित करेल. बिझनेस प्रोसेस सर्व्हिसेसचे बिझनेस हेड बिरेंद्र सेन म्हणाले की ChatGPT सारखे जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म. याचा व्यवसायावर मोठा परिणाम होणार नाही. टेक महिंद्रा कंपनीचा शेअर शुक्रवारी BSE वर 2.19 टक्क्यांनी घसरून रु. 1,085.45 वर स्थिरावला.