Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tea Price Hike: तुमचा 'कटिंग' चहा महागणार! आसाम, पश्चिम बंगालमधील हवामान कारणीभूत

Tea Price Hike

नोव्हेंबरपासून आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये पाऊस झालेला नाही. दोन्ही राज्यात चहाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. जर पाऊस झाला नाही तर चहाचे उत्पादन घटू शकते. त्यामुळे किरकोळ बाजारातील चहाच्या किंमती वाढू शकतात. त्याचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होऊ शकतो.

Tea Price Hike: भारतीयांच्या दिवसाची सुरुवात चहाच्या घोटाने होते. चहा हे भारतातील एक प्रसिद्ध पेय असून त्याची मोठी बाजारपेठ आहे. जगभरात चहा उत्पादनात देशाचा दुसरा क्रमांक लागतो. मात्र, यंदा चहाचं उत्पादन रोडावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर चहाचे उत्पादन कमी झाले तर किरकोळ बाजारात चहा महाग होऊ शकतो. त्यामुळे गरमागरम कटिंग चहाचा आस्वाद घेण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील. आसाम, पश्चिम बंगालमधील हवामानाची स्थिती यास कारणीभूत ठरत आहे.

पावसाचे प्रमाण घटले (Dry spell in Assam)

नोव्हेंबरपासून आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये पाऊस झालेला नाही. दोन्ही राज्यात चहाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र, या भागात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून जमिनीतील ओलावा नाहीसा झाला आहे. जर येत्या दहा पंधरा दिवसांत पाऊस झाला नाही तर पहिल्या तोडणीतील चहाचे उत्पादन 25% घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उत्पादन कमी झाल्याचा किंमतींवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

tea-board-of-india.jpg

चहाच्या पहिल्या तोडणीतील उत्पादन घटणार (first flush tea production might reduce)

आसाम, बंगालमध्ये चहाची पहिली तोडणी फेब्रुवारी-एप्रिल दरम्यान केली जाते. मात्र, जर पाऊस झाला नाही, तर पहिल्या तोडणीतील उत्पादन घटेल. पहिल्या तोडणीत चहाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन निघते. तसेच चहाच्या पानांची गुणवत्ता देखील चांगली असते. या चांगल्या प्रतिचा चहा निर्यातही केला जातो. उत्पादन घटल्याचा परिणाम देशांतर्गत किंमतींसह (Tea Price Hike) निर्यातीवरही होऊ शकतो.

किरकोळ बाजारातील चहाच्या किंमती वाढणार?( Retail tea prices may increase)

आसाममध्ये दैनिक तापमान 30 अंशापर्यत जात आहे. या काळात चहाच्या झाडांना नवी पालवी फुटण्यासाठी पावसाची गरज असते. पहिल्या तोडणीतून भारतामध्ये 100 ते 120 मिलियन किलो चहाचे उत्पादन होते. त्यात मोठी घट होण्याची भीती आहे. याचा परिणाम किरकोळ विक्री होणाऱ्या चहाच्या किंमतीवरही होऊ शकतो. पुढच्या पंधरवाड्यात पाऊस झाला तर काही प्रमाणात नुकसान टळू शकेल, असे धनुश्री टी उद्योगाचे संचालक सी. के. धनुका यांनी म्हटले आहे.

tea-board-of-india-2.jpg

चहाचे उत्पादन मिलियन किलोमध्ये -

सध्या चहाच्या किंमती पूर्णपणे मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून आहेत. मात्र, सरकारने विक्रीची किमान आधारभूत किंमत ठरवावी, अशी मागणी चहा उत्पादकांकडून होत आहे. त्यामुळे तोटा टळू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. चहाचे उत्पादन घेण्याचा खर्चही आधारभूत किंमतीत समाविष्ट करायला हवा, त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांचेही नुकसान होणार नाही, असे धनुका यांनी म्हटले.