Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

TDS on FD : फिक्स्ड डिपॉझिटवरचा टीडीएस वाचवायचा आहे, मग या आहेत स्मार्ट टिप्स

TDS on FD

TDS on FD : आपल्या प्रत्येक मिळकतीच्या स्त्रोतावर आयकर विभागाकडून कर कापला जातो. फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला उत्पन्न मिळतं आणि त्यामुळे त्यावर सुद्धा टीडीएस आकारला जातो.

TDS on FD :  गुंतवणूकीचा साधासोपा पूर्वपार चालत आलेला मार्ग म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट. फिक्स्ड डिपॉझिट अंतर्गत बँक, पतपेढी किंवा पोस्ट ऑफिसमध्ये एका ठराविक कालावधीसाठी गुंतवणूक केली जाते. या रकमेवर गुंतवणूक कालावधी संपुष्टात आल्यावर त्या बँकेकडून व्याज जमा केलं जातं. मात्र,  फिक्स्ड डिपॉझिटवर जमा होणारे व्याज करपात्र ठरते म्हणजे या व्याजावर बँकाकडून टीडीएस कापला जातो. हा टीडीएस किती टक्के कापला जातो, का, आणि तो आपण कसा वाचवू शकतो यासाठी तुम्हाला काही स्मार्ट टिप्स.

FD वर टीडीएस का व किती आकारला जातो

FD वरील व्याजाच्या रूपात आपल्याला उत्पन्न मिळत असते. आणि उत्पन्नाचा स्त्रोत असलेल्या प्रत्येक मार्गावर टीडीएस म्हणजे उगम कर हा आकारलाच जातो. त्यामुळे फिक्स्ड डिपॉझिटवर मिळणाऱ्या व्याजरूपी मिळकतीवर सुद्धा टीडीएस आकारला जातो. मात्र, यामध्ये काही अटी आहेत. जर, आपण केलेल्या  फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याज हे 10 हजाराहून अधिक असेल तर बँक या रकमेवर टीडीएस कापूनच व्याज आपल्या खात्यात जमा करत असते. या व्याजावर 10 टक्के टीडीएस आकारला जातो. त्यातही जर तुम्ही पॅनकार्ड सादर केलं नाही तर 20 टक्के टीडीएस कापला जातो.

FD वरील टिडीएस वाचवायचा कसा

  • FD वरील टिडीएस वाचवायचा असेल तर सोपा मार्ग आहे पोस्ट ऑफिसमध्ये FD करणे. कारण पोस्ट ऑफिसमध्ये केलेल्या FD  वर टीडीएस आकारला जात नाही.
  • जर आपण 3 लाखांची FD करत असू आणि ती एकाच व्यक्तीच्या नावाने केली तर त्यावरील व्याजावर टीडीएस कापला जातो. त्यामुळे ही 3 लाखाची FD जर आपण 1-1 लाख रूपयाची FD कुटुंबातील तीन सदस्यांच्या नावाने तयार केली तर त्यावरील व्याज हे विभागलं जातं. साहजिकच आहे 10 हजारापेक्षा कमी व्याज रक्कम असल्याने त्यावर टीडीएस कापला जात नाही.
  • दुसरा मार्ग आहे तो म्हणजे वेगवेगळ्या बँकामध्ये FD करणे. यामुळे मिळणारे व्याज हे विभागले जाऊन टीडीएस कापला जात नाही.

टीडीएस  परत कसा मिळवायचा

जर आपले उत्पन्न हे करदायित्वाच्या अंतर्गत येत नसेल तर आपण बँकेकडून कापलेला FD वरी टीडीएस हा आयकर विवरण पत्र भरताना 15 G आणि 15 H फॉर्म भरून हा टीडीएस कर परतावा मिळवू शकतो.