Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tax planning for newbies: नुकतीच नोकरी लागलीय? असं करा पगाराचं नियोजन

Tax planning for newbies

शिक्षण पूर्ण होऊन नोकरी लागल्यानंतर पैशाचे नियोजन अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर कितीही पगार मिळाला तरी तुमचा खिसा मोकळाच राहील. कारण पैशाच्या योग्य नियोजनाशिवाय तुम्ही बचत करू शकत नाही. आता उत्पन्नावरील कर वाचवण्यासाठी काय पर्याय आहेत, याचीही तुम्हाला माहिती करून घ्यावी लागेल.

शिक्षण सुरू असताना दर महिन्याला घरुन खर्चाचे पैसे आणि पॉकेट मनी येत असल्याने बचत करण्याचा आणि आयकर परतावा भरण्याचा विचार कधी डोक्यात आला नसेल. मात्र, शिक्षण पूर्ण होऊन नोकरी लागल्यानंतर पैशाचे नियोजन अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर कितीही पगार मिळाला तरी तुमचा खिसा मोकळाच राहील. कारण पैशाच्या योग्य नियोजनाशिवाय तुम्ही बचत करू शकत नाही. आता उत्पन्नावरील कर वाचवण्यासाठी काय पर्याय आहेत, याचीही तुम्हाला माहिती करून घ्यावी लागेल. 

फक्त कर वाचवायचांय म्हणून कोठेही गुंतवणूक न करता व्यवस्थित माहिती घेऊन गुंतवणूक करायला हवी. दरवर्षी इनकम टॅक्स रिटर्न तुम्हाला भरावा लागेल. जर तुम्ही पैसे योग्यरित्या गुंतवले नाही तर तुम्हाला कर भरावा लागेल. अनेकजण शेवटच्या घडीला याचे नियोजन करतात. मात्र, तसे न करता सर्व बाबींचा आधी अभ्यास करायला हवा. गुंतवणूक आणि पैशाचे नियोजन करण्यासाठी खालील बाबी तुम्ही ध्यानात घ्या. 

ओल्ड टॅक्स आणि न्यू टॅक्स रिजिम - 

 इनकम टॅक्स रिटर्न भरताना ओल्ड टॅक्स किंवा न्यू टॅक्स रिजिममधून रिटर्न भरावा यात तुमचा गोंधळ उडू शकतो. न्यू टॅक्स रिजिम 2022 च्या अर्थसंकल्पापासून सुरू करण्यात आला होता. नव्या टॅक्स रिजिममध्ये दोन महत्त्वाचे बदल आहेत. एक. यात कमी करांचे अधिक टप्पे (स्लॅब) आहेत. दुसरे म्हणजे ओल्ड रिजिम नियमांनुसार असलेले फायदे नव्या टॅक्स रिजिममध्ये नाहीत. 

नव्या टॅक्स रिजिमनुसार कर जरी कमी आकारण्यात येत असला तरी यामध्ये 80C आणि 80CCD अंतर्गत करात सूट मिळत नाही. घरभाडे, लिव ट्रॅव्हल अलाऊंन्सची सूट यामध्ये नाही. ओल्ड टॅक्स रिजिमनुसार तुम्हाला जास्त फायदे मिळू शकतात. या बाबत सखोल माहिती घेतल्यानंतरच तुम्ही ट्रॅक्स रिजिम निवडायला हवा.

सॅलरी स्पीप समजून घ्या

कर नियोजन करताना सर्वात आधी तुमची सॅलरी स्लीप समजून घ्या. नव्याने नोकरी सुरू केल्यानंतर पगारातून किती पैसे कशासाठी कापले जात आहेत याची माहिती बऱ्याच जणांना नसते. नेट सॅलरी, ग्रॉस सॅलरी म्हणजे काय? CTC म्हणजेच कॉस्ट टू कंपनीमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे, हे समजून घ्या. HRA, LTA ला करामधून सुटका आहे का? याची माहिती मिळवा. 

इन्कम टॅक्स रिटर्न कसा भरतात ते शिकून घ्या?

आयकर परतावा भरण्याचे विविध पर्याय आहेत. incometaxindia.gov.in साईटवर जाऊनही तुम्ही रिटर्न भरू शकता किंवा सीएकडे जाऊनही तुम्ही टॅक्स रिटर्न फाइल करु शकता. टॅक्स रिटर्न भरण्यासाठी सहाय्य करण्यासाठी अनेक मध्यस्थी कंपन्या आहेत. त्या तुम्ही www.tin-nsdl.com संकेतस्थळावर जाऊन तपासू शकता.

करातून सूट मिळवण्यासाठी कोणते पर्याय आहेत. 

तुमच्या पगारातून 50 हजार रुपये स्टॅडर्ड डिडक्शन म्हणून कापून घेतले जातात. ITR भरताना तुम्ही ही रक्कम क्लेम करू शकता. 
भविष्य निर्वाह निधी, पब्लिक प्रोविडंट फंड, इक्विटी लिंक्ड सेविंग स्कीममध्ये जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर 80C अंतर्गत दीड लाखांपर्यंत रकमेच्या करातून तुम्हाला सूट मिळू शकते. 

नोकरी लागल्यानंतर कंपनीकडून तुम्हाला आरोग्य विमा सुरक्षा मिळते. मात्र, तुम्ही स्वत: चा वेगळा आरोग्य विमा काढलेले योग्य राहील. 80D अंतर्गत तुम्हाला 25 हजारापर्यंत सूट मिळू शकते. 

तुम्ही जर नॅशनल पेन्शन योजनेत पैसे गुंतवत असाल तर तुम्हाला 80CCD अंतर्गत सूट मिळू शकते. 

जर शिक्षण सुरू असताना तुम्ही एज्युकेशन लोन घेतले असेल तर 80E अंतर्गत तुम्ही टॅक्स वाचवू शकता. 

कंपनी कायदा 2013 अनुसार जर तुम्ही अधिकृत संस्थांना डोनेशन केले असतील तर 80G अंतर्गत तुम्हाला करातून सुटका मिळू शकते. 

या शिवायही अनेक पर्याय वापरून तुम्ही करातून सूट मिळवू शकता. प्रत्येक बाबीचा सखोल अभ्यास केल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका.