कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक करण्यापूर्वी त्या गुंतवणुकीतून सर्वाधिक परतावा (High Returns) मिळेल का? आणि मिळालेले उत्पन्न टॅक्स फ्री (Tax Free Income) कसे होईल याकडे सर्वांचे लक्ष असते. सध्या कर सवलतीचा लाभ देणाऱ्या अनेक योजना सक्रिय आहेत. आपल्याला बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की, श्रीमंत लोक जास्त श्रीमंत कसे होतात? त्यांचे बरेसेच उत्पन्न टॅक्स फ्री कसे होते? हे लोक कुठे गुंतवणूक करतात.
आज आम्ही तुम्हाला एका अशा गुंतवणूक पर्यायाबद्दल माहिती देणार आहोत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही सर्वाधिक परतावा तर मिळवाल, सोबत मिळालेले उत्पन्न टॅक्स फ्री देखील होणार आहे. तो गुंतवणूक पर्याय आहे 'टॅक्स फ्री बॉंड्स' (Tax Free Bonds). चला तर त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
टॅक्स फ्री बॉंड्सचे फायदे जाणून घ्या
टॅक्स फ्री बॉंड्स (Tax Free Bonds) हा सर्वाधिक लोकप्रिय गुंतवणूक पर्याय म्हणून चर्चेत आहे. सर्वात जास्त पैसे कमावण्यासाठी आणि टॅक्स वाचवण्यासाठी या पर्यायाची निवड केली जाते. या बॉंड्समध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत. जर तुम्ही 20 ते 30 टक्क्यांच्या टॅक्स स्लॅबमध्ये येत असाल आणि तुम्ही तुमच्या बँकेत मुदत ठेव केली असेल, तर मुदत ठेवीच्या वार्षिक 50,000 रुपयांच्या व्याजावर 15 हजार रुपयांचा कर तुम्हाला भरावा लागतो. याचा थेट परिणाम तुमच्या परताव्यावर होतो. 15 हजार रुपये कर कापून तुम्हाला 35,000 रुपये उत्पन्न मिळते. हेच पैसे तुम्ही बँक ठेवींऐवजी टॅक्स फ्री बॉंड्समध्ये गुंतवले, तर त्यातून मिळणारा संपूर्ण परतावा हा करमुक्त असून पूर्णतः तुमचा असेल.
'या' गुंतवणुकीत धोका आहे का?
टॅक्स फ्री बॉंड्स सरकारकडून जारी केले जातात. त्यामुळे हे पूर्णतः सुरक्षित असतात. ज्यामुळे तुम्ही यामध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकतात. या बॉंड्समध्ये तुम्हाला जास्त व्याजदर दिला जातो आणि करही भरावा लागत नाही.
सर्वाधिक परतावा देणाऱ्या टॅक्स फ्री बॉंड्सबद्दल जाणून घ्या
टॅक्स फ्री बॉंडमध्ये सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या बॉंड्समध्ये HUDCO N2 सिरीजमध्ये तुम्हाला 8.2 टक्के व्याजदर मिळते. हा व्याजदर मार्च महिन्यात दिला जातो. तर HUDCO N5 सिरीजमध्ये 7.51 टक्के व्याज मिळणार आहे. हा व्याजदर फेब्रुवारी महिन्यात दिला जातो.
IRFC N9 सिरीजमध्ये 8.48 टक्के व्याज दिले जाते. तर IRFC NA सिरीजमध्ये 8.65 टक्के व्याजदर दिले जाते. यासोबत RECN6 सिरीजमध्ये 8.46 टक्के व्याजदर मिळत आहे. RECNF सिरीजमध्ये 8.88 टक्के व्याज मिळत आहे. याशिवाय तुम्हाला NHAI N6 सिरीजमध्ये 8.75 टक्के व्याज मिळणार आहे.
Source: hindi.news18.com