गेल्याच महिन्यात टॅक्स भरण्याची तारीख निघून गेली आहे. अनेकांनी टॅक्स भरला देखील आहे. पण, अजूनही एखाद्याला कुठे आणि कशी गुंतवणूक केल्यावर टॅक्स वाचवता येतो हे माहित नसल्यास, आत्तापासूनच टॅक्स कसा वाचवायचा? यासाठी प्लॅनिंग करणे आवश्यक आहे. यामुळे तुमची फक्त टॅक्समध्येच बचत होत नाहीतर तुम्हाला दीर्घ काळासाठी गुंतवणूक ही करता येते, जी तुम्हाला भविष्यात महत्वाच्या कामासाठी नक्कीच कामी येईल.
Table of contents [Show]
फिक्स्ड डिपाॅझिट (FD)
अनेक बॅंका अशा आहेत ज्या टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट ऑफर करतात. मात्र, त्यांचा लॉक-इन अवधी 5 वर्षांचा असतो. तसेच, या टॅक्स सेव्हिंग एफडीवर भारतीय इन्कम टॅक्स अॅक्ट 80 सी अंतर्गत टॅक्स सवलत मिळते. त्यामुळे एफडीत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला सवलतही मिळते आणि दीर्घ अवधीसाठी गुंतवणूक ही करता येते.
पीपीएफ (PPF)
इन्कम टॅक्स अॅक्ट 80C अंतर्गत कर वाचवण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. कारण, केंद्र सरकार याची देखरेख करत असल्यामुळे येथे पैसा गुंतवणे सर्वांत सुरक्षित आहे. तसेच, व्याजदरही चांगला मिळतो आणि यावर मिळणारे रिटर्न करमुक्त आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी पैसे गुंतवूण चांगला रिटर्न मिळवू शकता. पण, याचा लाॅक-इन अवधी 15 वर्षांचा आहे.
सुकन्या समृद्धी योजना
ही योजना मुख्यता मुलींचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. ही योजना आकर्षक व्याजदर देते, त्यामुळे या योजनेत पैसे गुंतवल्यास चांगला व्याजदर मिळू शकतो. तसेच, या योजनेत गुंतवणूक केल्यास 80C अंतर्गत टॅक्समध्येही सवलतही मिळते. त्यामुळे आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करण्याबरोबर तुम्हाला चांगला रिटर्नही मिळू शकतो.
राष्ट्रीय पेन्शन योजना
रिटायरमेंट नंतर पैशांची गरज लागतेच, तो उद्देश ठेवून ही योजना राबवण्यात येत आहे. रिटायर झाल्यानंतर तुम्ही एकदाच ती रक्कम काढू शकता किंवा प्रत्येक महिन्याला त्यातून ठराविक रक्कम काढू शकतात. पगारदार व्यक्तीने विभाग 80CCD (1B) द्वारे NPS मध्ये डिपाॅझिट केल्यास टॅक्सवर अतिरिक्त सवलत मिळवू शकते, पण मग त्या व्यक्तीला सवलत मिळवण्यासाठी फक्त 50,000 रुपये डिपाॅझिट करावे लागेल.
अटल पेन्शन योजना
अटल पेन्शन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन योजनेत तुम्हाला सारखाच टॅक्सचा फायदा मिळणार आहे. तुम्ही एक ठराविक रक्कम भरून या योजनेसाठी योगदान देऊ शकता आणि 1000 रुपये ते 5000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळवू शकता. ही पेन्शन वयाच्या 60 व्या वर्षी सुरू होते.
जीवन विमा
तुमच्या जीवन विम्याचा हफ्ता 80C अंतर्गत एकूण उत्पन्नातून कपात होत असल्यास, तुम्हाला टॅक्समध्ये सवलत मिळू शकते. यामध्ये तुम्ही स्वत: पती किंवा पत्नी आणि मुलांसाठी जीवन विमा घेतल्यास तुम्हाला करातून वर्षाला 1.5 लाख रुपयांची सवलत मिळू शकते.
आरोग्य विमा
तुम्ही तुमच्या आरोग्य विम्याच्या प्रीमियमवर इन्कम टॅक्स अॅक्ट 80D अंतर्गत टॅक्स सवलत मिळवू शकता. यामध्ये पॉलिसीधारक, पती किंवा पत्नी, मुले आणि पॉलिसीधारकाचे पालक यांचा समावेश होतो.