Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tax Free Income: 'या' 5 प्रकारातील उत्पन्नावर कधीही आयकर भरावा लागत नाही

Tax Free Income

Image Source : www.maharashtratimes.com

Tax Free Income: अर्थ मंत्रालयाने (Ministry of Finance) आखून दिलेल्या कर प्रणालीनुसार निश्चित उत्पन्नावर ठराविक कर (Tax) प्रत्येकाला भरावा लागतो. मात्र असे कोणते उत्पन्न आहे, ज्यावर आयकर भरावा लागत नाही. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

देशात कर प्राप्तीसाठी अर्थ मंत्रालयाकडून  (Ministry of Finance) एक कर रचना (Tax System) तयार करण्यात आली आहे. या कर रचनेनुसार 3 लाखांपर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त असते. तर 3 ते 6 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के कर आकाराला जातो. 6 ते 9 लाखांच्या उत्पन्नावर 10 टक्के कर आणि 9 ते 12 लाखांच्या उत्पन्नावर 15 टक्के कर भरावा लागतो, हे आपल्या सर्वानाच ठाऊक आहे.पण असे कोणते उत्पन्न आहे, ज्यावर आपल्याला कर भरावा लागत नाही. त्याबद्दल आज जाणून घेऊयात.

शेतीतून मिळालेले उत्पन्न

भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. देशातील कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी, प्राप्तिकर कायदा 1961 नुसार, शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाला आयकराच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे. जर तुमच्याकडे शेतजमीन असेल आणि तुम्ही शेती किंवा शेतीशी संबंधित कामातून कमाई करत असाल, तर तुम्हाला त्या उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागत नाही. हे उत्पन्न पूर्णतः करमुक्त (tax free) असते.

बचत खात्यावरील व्याज

आपल्या सर्वांकडे बँकेमध्ये बचत खाते (Saving Account) आहे. या बचत खात्यातील रकमेवर दर तीन महिन्याला व्याजदर (Interest) देण्यात येतो. हे व्याज करमुक्त असते. या रकमेवर आयकर कायद्याच्या 80TTA नुसार सवलत मिळवता येते. मात्र जर  तुमच्या बचत खात्यातील रकमेवरील व्याज हे 10,000 रुपयांपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला जास्तीच्या रकमेवर कर भरावा लागेल.

ग्रॅच्युईटी रक्कम

राज्य शासन किंवा केंद्र शासनासाठी काम करत असलेल्या कर्मचाऱ्याला त्याच्या निवृत्तीवेळी ग्रॅच्युईटी रक्कम (Gratuity amount) दिली जाते. ही रक्कम लाखो रुपयांमध्ये असते. मात्र या सरकारी कर्मचाऱ्यांना ती रक्कम पूर्णतः कर मुक्त असते. याउलट खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील ग्रॅच्युईटी रक्कम देण्यात येते. मात्र ठराविक रकमेनंतर त्यावर कर भरावा लागतो. उपलब्ध महितीनुसार 20 लाखांपर्यतची रक्कम कर सवलतीस पात्र ठरते. त्यावरील रकमेवर कर भरावा लागतो.

हिंदू अविभक्त कुटुंबाकडून (HuF) मिळालेली रक्कम

हिंदू अविभक्त कुटुंबाकडून (HuF) मिळालेली रक्कम किंवा वारसा हक्काने मिळालेली रक्कम/ मालमत्ता ही आयकराच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आली आहे. हे  उत्पन्न आयकर कायद्याच्या कलम 10(2) अंतर्गत येत असून ते करमुक्त आहे. या कलमात असे म्हटले आहे की, कुटुंबाचे उत्पन्न, स्थावर मालमत्तेचे उत्पन्न किंवा हिंदू अविभक्त कुटुंबाच्या वडिलोपार्जित मालमत्तेवरील उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा आयकर भरावा लागणार नाही. हे उत्पन्न करमुक्त असेल.

शिष्यवृत्ती किंवा पुरस्कार

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक संस्था किंवा ट्रस्ट वेगवेगळ्या स्वरूपाची शिष्यवृत्ती देतात. एखाद्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती किंवा पुरस्कार प्राप्त झाला असेल, ज्यातून तो त्याच्या अभ्यासाचा खर्च चालवत असेल, तर त्याला आयकर कायद्याच्या कलम 10 (16) अंतर्गत प्राप्तिकरातून सवलत मिळते. या सवलतीत शिष्यवृत्ती किंवा पुरस्काराच्या रकमेची मर्यादा घालण्यात आलेली नाही.


Source: hindi.news18.com