देशातील नामांकित कंपनी टाटा स्टील (Tata Steel Ltd) आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. ही कंपनी जगातील सर्वोच्च स्टील उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. नुकतीच आर्थिक वर्षाची पहिली तिमाही संपून जुलैपासून दुसरी तिमाही सुरू झाली आहे. कंपनीने जूनच्या तिमाहीतील व्यवसायासंदर्भातील अपडेट गुरुवारी 6 जुलै रोजी जारी केले आहे. या जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार कंपनीच्या उत्पादनात वाढ झाली आहे. तसेच वितरणात देखील वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
टाटा स्टीलच्या उत्पादनात 2 टक्क्यांची वाढ
टाटा स्टील कंपनीने गुरुवारी जाहीर केलेल्या अपडेटनुसार जून तिमाहीमध्ये भारतात क्रूड स्टीलच्या उत्पादनात वार्षिक आधारावर 2 टक्क्यांची वाढ झाली आहे. ही वाढ पकडून कंपनीचे उत्पादन 50.1 लाख टनापर्यंत पोहचले आहे. ही उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी निलाचल इस्पात निगम लिमिटेड (NINM) चा मोठा वाटा असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच देशांतर्गत वितरणात जून तिमाहीमध्ये 18 टक्क्यांची वाढ वार्षिक आधारावर झाली आहे. ही वाढ 48 लाख टनापर्यंत पोहचली आहे.
'या' ब्रँड्सच्या विक्रीत वाढ
टाटा स्टीलने एका निवेदनात सांगितल्याप्रमाणे, कंपनीचे ऑटोमोटिव्ह आणि विशेष उत्पादन विभागातील वितरण वार्षिक आधारावर समान राहिले आहे. याशिवाय इतर उपविभागांमध्ये, प्रवासी वाहने आणि दुचाकींचे उत्पादन वाढल्याचे दिसून आले आहे. तर व्यावसायिक वाहनांचे उत्पादन कमी झाले आहे. याशिवाय, ब्रँडेड उत्पादनांचे वितरण आणि रिटेल सेगमेंटमध्ये 37 टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवण्यात आली आहे. टाटा टिस्कॉन (Tata Tiscon) आणि टाटा स्टीलीयम (Tata Steelium) या सुप्रसिद्ध ब्रँड्सच्या विक्रीमध्ये पहिल्या तिमाहीत वाढ झाली आहे.
टाटा स्टीलच्या शेअर्सचे अपडेट जाणून घ्या
या दरम्यान टाटा स्टीलचे शेअर्स गुरुवारी एनएसईवर (NSE) 0.27 टक्क्यांनी घसरुन 112.65 रुपयांवर बंद झाले. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 1.03 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत सुमारे 25.17 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Source: hindi.moneycontrol.com