भारतातील प्रसिद्ध कार निर्माती कंपनी Tata Motors ने आपल्या ग्राहकांकरिता जुलैमध्ये खास ऑफर आणली आहे. टाटाच्या काही निवडक कारवर कंपनीकडून 50,000 रुपयांपर्यंतची सूट देण्यात येत आहे. या डिस्काउंट स्कीममध्ये Tiago, Altroz, Tigor, Harrier आणि Safari या कारचा समावेश आहे. मात्र, टाटाकडून पंच आणि नेक्सॉन सारख्या कारवर कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. टाटा द्वारे ऑफर केल्या जात असलेल्या ऑफरवर एक नजर टाकूया.
टाटा टियागो Tata Tiago
Tata Motors भारतात तिच्या Tiago हॅचबॅकवर 45,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. पेट्रोल, सीएनजी तसेच इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये या गाड्या उपलब्ध आहेत. मात्र, फक्त Tiago च्या पेट्रोल आणि CNG व्हर्जनवर ही सूट दिली जात आहे. गेल्या वर्षी लाँच झालेल्या इलेक्ट्रिक कारचा यात समावेश करण्यात आलेला नाही.
टाटा टिगोर Tata Tigor
टाटा टिगोरच्या सीएनजी व्हेरियंटवर सवलत दिली जात आहे. Tigor CNG च्या मॉडेलवर जास्तीत जास्त 50,000 रुपयांची सूट देण्यात येत आहे. यामध्ये 35,000 रुपयांची रोख सूट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे.
टाटा अल्ट्रोझ Tata Altroz
Tata Motors कडून टाटा अल्ट्रोझ या प्रीमियम हॅचबॅकच्या निवडक मॉडेलवर 28,000 पर्यंत सूट देत आहे. Altroz हॅचबॅक भारतात पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारांमध्ये तसेच CNG आवृत्तीमध्ये सवलतीची ऑफर देण्यात येत आहे. Altroz च्या बेस पेट्रोल व्हेरिएंटवर एकूण 23 हजारांची सूट देत आहे. तर डिझेलवर 28 हजार रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे.
टाटा हॅरियर / सफारी Tata harrier/ safari
टाटा मोटर्स त्यांच्या दोन प्रमुख SUV - हॅरियर आणि सफारीवर समान सवलत देत आहे. दोन्ही एसयूव्हीवर 35 हजार रुपयांपर्यंतची सूट देण्यात येत आहे. मात्र, या ऑफरमध्ये नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या रेड डार्क एडिशनचा समावेश नाही.
( या सवलतीच्या ऑफर डीलरशिप, स्थान आणि उपलब्धतेनुसार बदलू शकतात. नवीन कार घेण्यापूर्वी याची जरूर चौकशी करा.)