हल्दीराम ब्रांड कुणाला माहिती नाही? नमकीन, नाश्ता, मिठाई खरेदी करण्यासाठी खवय्यांचे आवडीचे ठिकाण म्हणजे हल्दीराम. हल्दीरामची लोकप्रियता केवळ भारतापुरती मर्यादित नसून साता समुद्रापार हल्दीरामचे चाहते आहेत. आता हीच रिटेल चेन असलेली हल्दीराम कंपनी विक्रीसाठी सज्ज झालीये. येत्या एकाही दिवसांत टाटा ग्रुप कंपनी हल्दीराम खरेदी करणार असल्याचे वृत्त आहे. टाटा उद्योग समूह याआधीच टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स (Tata Consumer Product) नावाने खाद्यान्न क्षेत्रात कार्यरत आहे. याच वर्टीकलच्या माध्यमातून ‘हल्दीराम’ची खरेदी होऊ शकते आं अंदाज आहे.
टाटा कंझ्युमर हल्दीराममधील मोठा 51 टक्के भागभांडवल खरेदी करू शकतो आणि हल्दीरामला आपल्या पोर्टफोलिओचा भाग बनवू शकतो असे समजते आहे. यावर दोन्ही उद्योगसमूहांनी कुठलेही अधिकृत निवेदन दिले नसून याबाबतची बोलणी अंतिम टप्प्यात असल्याचे बोलले जात आहे.
देशभरात स्टोअर्स
गेल्या 85 वर्षांपासून हल्दीराम भारतातील खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवत आहे. 85 वर्षांपूर्वी 1937 साली बिकानेर, राजस्थान येथे झाली. हल्दिरामचे संस्थापक गंगा बिशन अग्रवाल यांनी या कंपनीची सुरुवात केली आणि नंतर नोएडा, गुरूग्राम, दिल्ली, कलकत्ता, रायपुर आदी शहरांमध्ये स्टोअर्सचा विस्तार केला.
हल्दीराम कंपनी अब बिकने जा रही है
— Ayush Jain (@aestheticayush6) September 6, 2023
◆ टाटा ग्रुप इसमें 51% हिस्सा खरीद सकती है
◆ दोनों कंपनियों के बीच बातचीत का दौर जारी
Haldiram | Tata Group | #Haldirams | #TataGroup pic.twitter.com/hFpqnvaLlP
महाराष्ट्रात नागपूर शहरापासून हल्दीरामने नागरिकांना सेवा देण्यास सुरुवात केली. हे स्टोअर नागपूरमध्ये इतके लोकप्रिय झाले की मराठी लोकांना ‘हल्दीराम’ हे नागपूरचेच आहे असा समज होऊ लागला, हा समज अजूनही कायम आहे. मात्र या कंपनीचे मुख्यालय नोएडा, उत्तर प्रदेश येथे आहे.
कितीमध्ये होऊ शकते डील?
मिडीया रिपोर्टनुसार ही डील 10 अब्ज डॉलर्समध्ये होऊ शकते. या डीलमध्ये टाटा कंझ्युमर हल्दीराममधील मोठा 51 टक्के भागभांडवल खरेदी करू शकतो. ही डील पूर्ण झाल्यानंतर टाटा कंझ्युमर हल्दीरामसोबत देशभरात नव्या स्वरूपात नागरिकांना सेवा देण्यास तयार होईल आणि रिलायन्स समूह, अदानी समूह व इतर कंपन्यांशी स्पर्धा करण्यास सज्ज होईल.