Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

व्यवसाय कर्ज (Business Loan) घेताय? या गोष्टींची माहिती तयार ठेवा

व्यवसाय कर्ज (Business Loan) घेताय? या गोष्टींची माहिती तयार ठेवा

बँका आणि NBFC कंपन्या लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी, व्यवसाय वाढवण्यासाठी आणि इतर व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी business loan देतात.

कोणताही व्यवसाय चालवणे सोपी गोष्ट नाही. व्यवसायातील दैनंदिन गोष्टींची पूर्तता करण्यासाठी पैसा आणि मनुष्यबळ या दोन्हींची आवश्यकता असते. चांगले कौशल्यधारित मनुष्यबळ हवे असेल तर पुन्हा त्यासाठीही पैशांची गरज लागते. थोडक्यात कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची आवशक्यता असते. हे भांडवल उभे करण्यासाठी व्यवसाय कर्ज (Business Loan) उपयोगी ठरते. बॅंका आपल्याला आपल्या गरजेनुसार कर्ज उपलब्ध करून देतात. कर्जाचे अनेक प्रकार ही उपलब्ध आहेत. पण नेहमी कर्ज घेताना बॅंकांच्या अटी, नियम आणि पात्रता निकष याबाबतची माहिती घेतली पाहिजे. आज आपण अशाच व्यवसाय कर्जासाठी बॅंकांची प्रक्रिया समजून घेणार आहोत. 

सर्वप्रथम एखाद्या लघु उद्योगासाठी व्यवसाय कर्ज (बिझनेस लोन) घेण्यापूर्वी तुमच्या बिझनेसला किती लोन आवश्यक आहे आणि ते कशासाठी वापरले जाणार आहे, हे तुम्हाला माहिती असले पाहिजे. लहान उद्योग सुरू करताना वेगवेगळ्या पद्धतीने निधी उभा करता येतो. जसे की, वर्किंग कॅपिटल लोन, टर्म लोन, सरकारी योजना, बँकेकडून लोन, ईक्विपमेंट आणि इनवॉइस लोन, क्लाऊड फंडिंग, क्राऊड फंडिंग, विना तारण लोन, मालमत्ता तारण ठेऊन लोन, शेअर तारण  ठेऊन लोन, सोने तारण ठेऊन लोन, अशा विविध प्रकारे लोन घेता येऊ शकते.

बिझनेस लोन कोणाकडून मिळू शकते?

बॅंक (Bank) 
लोन घेण्याचा सगळ्यात प्रचलित प्रकार म्हणजे बँक लोन किंवा तारण (सिक्युरिटी) असलेले लोन. तारण असलेल्या लोनसाठी मालमत्ता तारण ठेवावी लागते. जसे की, मशीन, बॉन्ड, स्टॉक, साधने, स्थावर मालमत्ता इत्यादी. तारण लोन मिळवणे सरळ व सोपे असते. सर्व बँका साधारणपणे लघु उद्योगांना तारण लोन देतात.

एनबीएफसी (Non-Banking Financial Company)
बिझनेस लोनसाठी दुसरा पर्याय म्हणजे एनबीएफसी (नॉन-बँकिंग फायनॅन्शियल कंपनी). एनबीएफसी यांची अर्ज प्रक्रिया बँकेपेक्षा खूप सोपी असते. बँकेत अर्ज प्रक्रिया लांब, क्लिष्ट असते आणि अनेक अटी व शर्ती असतात. एमबीएफसी मध्ये अर्जदाराकडे आवश्यक कागदपत्रे असली आणि चांगले क्रेडिट स्कोअर/ सिबिल स्कोर असेल की लगेच लोन मिळते.

सरकारी योजना (Government Scheme)
छोट्या उद्योजकांना बिझनेस लोन हवे असल्यास सरकारकडून मुद्रा योजना, स्टँड-अप इंडिया योजनामधून लोन दिले जाते. मुद्रा योजने अंतर्गत व्यावसायिक बँका, आरआरबी, सहकारी बँकांकडून 10 लाखापर्यंतचे लोन मिळते. तर स्टॅंड-अप इंडिया योजनमधून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला उद्योजकांना स्वस्त आणि विना तारण लोन दिले जाते. 1 ते 10 वर्षांच्या कालावधीसीठी 10 लाख ते 1 कोटी रूपयांपर्यंत लोन दिले जाते. यासोबतच खास महिला उद्योजकांसाठी भारतीय महिला बँक व्यावसायिक कर्ज योजना (Business loan schemes for women entrepreneurs) सरकारने आणली आहे. महिला उद्योजकांना नवीन उपक्रम सुरू करायचा असल्यास त्यांना कमाल 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.

बिझनेस लोन : तारण की बिना तारण?
Mortgage Business Loan or Unsecured Business Loan

तारण बिझनेस लोन (Mortgage Business Loan)
तारण लोनचे व्याज दर कमी असतात आणि लोन परत करण्याचा कालावधीही लवचिक असतो. यात तारण ठेवता येत असल्यामुळे जास्त रकमेचे लोन मिळू शकते. तारण असलेल्या लोनची परतफेड केली नाही, तर लोन देणार्‍या कंपनीला कोर्टाचा आदेश नसतानाही तुमच्या मालमत्तेवर दावा करण्याचा हक्क असतो.

विना तारण बिझनेस लोन (Unsecured Business Loan)
विना तारण बिझनेस लोनमध्ये काहीही तारण ठेवलेले नसल्यामुळे परतफेड करण्यास उशीर झाला किंवा परतफेड केली नाही तर लोन देणारी कंपनी तुमच्या मालमत्तेवर दावा करू शकत नाही. पण कंपनी तुमच्या कंपनी व मालमत्तेविरोधात केस करू शकेल. अशावेळी तुम्हाला लोनची मूळ रक्कम, उशिरा परतफेड करण्याचा दंड आणि कोर्टाचा खर्च परत करावे लागेल.

बिझनेस लोनसाठी अर्ज करायचा असल्यास त्यासाठी आवश्यक असणारे पात्रता निकष माहिती असणे अत्यंत महत्वाचे असते.

  • बिझनेस लोनसाठी पात्र असायला लघु उद्योगाची वार्षिक उलाढाल 15 लाख ते 1 कोटी रूपये यामध्ये असली पाहिजे.
  • अर्जदाराचे वय 21 वर्षापेक्षा कमी नसावे आणि लोनचा कालावधी जेव्हा संपेल तेव्हाचे वय 65 वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • बिझनेस लोनसाठी मिळवण्यासाठी तुमचा व्यवसाय किमान 3 वर्षापासून सुरू असावा. काही  लोन देणार्‍या कंपन्या 1 वर्षापासून सुरू असलेल्या उद्योगांना ही लोन देतात.
  • बिझनेस लोन मंजूर होण्यापूर्वी अर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरचे मूल्यांकन होते. याला सिबिल स्कोअर पण म्हणतात. क्रेडिट स्कोअर / सिबिल स्कोअर असल्यास कर्ज लगेच आणि जास्त मिळू शकते.
  • लोनची रक्कम, लोन घेण्याचा उद्देश, उद्योग क्षेत्र, कंपनीचा प्रकार, कंपनीचा ओळख क्रमांक, तारणाचा पुरावा (असल्यास) इत्यादी बाबी तपासल्या जातात.