Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Swiggy ambulance service: डिलिव्हरी कर्मचाऱ्यांसाठी Swiggy चा मोठा निर्णय! एका क्लिकवर मिळणार खास सुविधा

Swiggy ambulance service

स्वीगीने डिलिव्हरी बॉईजसाठी असलेल्या पार्टनर अॅपमध्ये SOS हे बटण समाविष्ट केले आहे. हे बटण दाबताच डिलिव्हरी बॉईजच्या मदतीसाठी रुग्णवाहिका येईल. अवघ्या 12 मिनिटांत रुग्णवाहिका ऑनलाइन लोकेशनवर येते असा दावा स्विगीने केला आहे.

मागील काही महिन्यात देशभरात ऑनलाइन सेवा पुरवणारे कर्मचारी म्हणजेच डिलिव्हरी बॉईजचे अनेक अपघात झाले. यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला. दिल्लीतील दोन डिलिव्हरी बाईजचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे गीगवर्क करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. डिलिव्हरी बॉईजच्या सुरक्षेसाठी आता स्विगीने मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे कर्मचाऱ्यांना एमर्जन्सी परिस्थितीत आरोग्य सेवा (Swiggy ambulance service) उपलब्ध होणार आहेत.

अॅपमध्ये SOS बटण

स्विगीने डिलिव्हरी बॉईजसाठी असलेल्या पार्टनर अॅपमध्ये SOS हे बटण समाविष्ट केले आहे. हे बटण दाबताच डिलिव्हरी बॉईजच्या मदतीसाठी रुग्णवाहिका येईल. अवघ्या 12 मिनिटांत रुग्णवाहिका ऑनलाइन लोकेशनवर पोहचले, असे लक्ष्य ठेवले आहे. सोबतच टोल फ्री नंबरवर कॉल करूनही डिलिव्हरी बॉईज मदत मिळवू शकतात.

कुटुंबियांनाही मिळणार फायदा

अॅम्ब्युलन्सची सुविधा फक्त डिलिव्हरी बॉईजसाठीच नाही तर त्यांच्या कुटुंबियांसाठीही कंपनीने उपलब्ध करून दिली आहे. कुटुंबियांमध्ये पत्नी, आणि दोन मुलांचा समावेश मर्यादित ठेवण्यात आला आहे. म्हणजे कुटुंबातील चार व्यक्तींसाठी ही रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध असणार आहे. स्वीगी कंपनीमध्ये देशभरामध्ये तीन लाख डिलिव्हरी बाईज कामावर आहेत. या सर्वांना या एमर्जन्सी सुविधेचा फायदा मिळणार आहे. अॅम्ब्युलन्स सेवेचा लाभ घेण्यासाठी कंपनीने 4242 हा टोल फ्री नंबर जारी केला आहे. रुग्णवाहिका पुरवणाऱ्या कंपनीशी स्विगीने सहकार्य करून ही योजना राबवली आहे.

डिलिव्हरी पार्टनर्सच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या सुविधेद्वारे कर्मचाऱ्यांना कोणत्याही वेळी मदत मिळू शकते. देशातील 500 पेक्षा जास्त शहरांमध्ये दहा हजारांपेक्षा जास्त रुग्णवाहिका या सेवेसाठी उपलब्ध असतील. दिल्ली, बंगळुरु हैदराबाद, पुणे शहरांमध्ये पायलट प्रोजेक्ट राबवल्यानंतर देशभर ही सुविधा सुरू केली आहे.