तुम्हाला जर कोणी, ‘तुम्ही मला 10 लाख द्या मी त्याचे 100 कोटी रुपये करून देतो" असे म्हणाले तर तुम्ही काय कराल? हे असे वाक्य कानावर पडल्या पडल्या तुमच्या तोंडातून, “हं काहीही !!” हे उद्गार नक्कीच निघतील. खरेतर अशा लोकांवर कधीच विश्वास नाही ठेवला पाहिजे. कारण अशा सो कॉल्ड बुल्स गुंतवणूकदारांनी बऱ्याच जणांचा पैसा वाया घालावला आहे. मार्केटमध्ये असे कितीतरी फ्रॉड झाले आहेत. पण या अशा फ्रॉड मार्केट बुल्समध्ये एक खराखुरा मार्केट बुल (Market Bull) आहे; ज्याने स्वत:चा प्रत्येक शब्द खरा करून दाखवला आहे. या मार्केट बुलने 30 वर्षांत 200 कोटी रुपयांची संपत्ती निर्माण केली आहे. तर शेअर मार्केटमधील सुपरस्टार गुंतवणूकदार रमेश दमाणी (Superstar Investor Ramesh Damani) यांच्या मार्केट प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
Table of contents [Show]
वडिलांच्या ‘त्या’ डीलमुळे रमेश यांची दिशा बदलली!
रमेश दमाणी यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी-नॉर्थरिज (California State University-Northridge) मधून MBA चे शिक्षण घेतले. रमेश यांच्या घरात स्टॉक मार्केटचा सातत्याने जप होत असला तरी रमेश दमाणी यांना कधीच त्यात इंटरेस्ट नव्हता. त्यांच्या वडिलांची खूप इच्छा होती; रमेश यांना शेअर मार्केटमध्ये काडीचाही रस नव्हता. त्यामुळे रमेश दमाणी यांच्या वडिलांशी एक शेवटचा प्रयत्न म्हणून रमेश यांना एक ऑफर दिली. या ऑफरनुसार रमेश यांच्या वडिलांनी त्यांना काही रक्कम दिली आणि ती रक्कम डबल करून दाखवली. तर ते सर्व पैसे रमेश यांचे आणि जर ते अपयशी ठरले तर रमेश यांना स्टॉक मार्केटमध्ये येण्यासाठी पुन्हा कधीच प्रयत्न करणार नाही, अशी ऑफर रमेश यांच्या वडिलांनी दिली होती. त्यानुसार रमेश यांनी ही ऑफर स्वीकारली. पण 6 महिन्यातच दमाणी (Damani) यांचे नुकसान झाले. आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना शेअर मार्केटबद्दल पुन्हा कधीच विचारले नाही. पण हा पराभव रमेश यांच्या खूपच जिव्हारी लागला आणि त्यांनी चॅलेंज म्हणून हा पराभव स्वीकारत पुन्हा एकदा शेअर मार्केटमध्ये उतरले.
स्वत:ची ब्रोकरेज फर्म सुरू केली!
रमेश दमाणी यांनी परदेशातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे (Bombay Stock Exchange) सदस्यत्व स्वीकारले. त्यानंतर त्यांनी स्वतःची ब्रोकरेज फर्म (Brokerage Firm) सुरु केली. 90च्या दशकात हर्षद मेहतांनी संपूर्ण मार्केटवर गारूड घातले होते. तेव्हा इतर गुंतवणूकदारां प्रमाणे रमेश यांनी देखील वाहत्या नदीत आपले हात दुखून घेतले. त्यांनी आपल्या ब्रोकरेज फर्ममधील ग्राहकांसाठी याच काळात भरपूर पैसे कमावून दिले. पण यातून रमेश यांना फक्त 1 टक्काच नफा म्हणून मिळत होता. काही ग्राहकांनी तर 100 टक्के रिटर्न्स या काळात मिळवले होते. त्यानंतर हर्षद मेहता यांनी केलेला घोटाळा जगासमोर आला आणि संपूर्ण मार्केट कोसळले. परिमामी त्यानंतर रमेश यांनी स्वतः शेअर मार्केटमध्ये उतरून ट्रेडिंग (Trading) करण्याचा निर्णय घेतला.
कंपन्यांची क्षमत ओळखून त्यात गुंतवणूक करण्याचा हातखंडा!
रमेश यांनी इन्फोसिस आणि CMC (Computer Management Corporation Private Limited) या दोन कंपन्यांमध्ये 10 लाख रुपये गुंतवले होते. 1999 पर्यंत त्यांची ही गुंतवणूक कितीतरी पटींनी वाढली होती. कंपन्यांची क्षमता ओळखून त्यात गुंतवणूक करण्याची रमेश यांची स्ट्रॅटेजी चांगलीच चालली. अशाप्रकारे रमेश यांनी भविष्यातील प्रगतीचा आढावा घेऊन कंपन्यांची निवड करून त्यात गुंतवणूक केली. त्यांनी भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (Bharat Electronics Limited) आणि भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (Bharat Earth Movers Limited) या कंपन्यांमध्ये अशावेळी गुंतवणूक केली होती. जेव्हा या कंपन्यांचे नामोनिशाण देखील नव्हते.
चुकांमधून शिकण्याची कला!
रमेश यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक अशा चुका केल्या ज्यातून त्यांनी खूप महत्त्वाचे धडे घेतले. रमेश यांच्या मार्केटमधल्या सर्वात पहिल्या 10 हजार डॉलर्सच्या गुंतवणुकीतून भरपूर काही शिकवले. हे पैसे इन्व्हेस्ट करताना रमेश असे स्टॉक्स शोधत होते, जे आता आहेत; पण आधी त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला आहे. त्यांच्या या स्ट्रॅटेजीमुळे त्यांना भारी नुकसान तर झाले. पण त्यातून त्यांनी महत्त्वाचा धडादेखील घेतला. तो म्हणजे आधी जी कंपनी चांगली परफॉर्म करत होती ती आता देखील चांगलीच परफॉर्म करेल असे मुळीच नाही. त्यांची दुसरी मोठी चूक त्यांच्या मते, 2008 च्या मार्केट क्रॅशवेळी पैसे न गुंतवणे ही होती. त्यावेळी आलेल्या संधीचा फायदा उचलता आला नाही. त्यांच्या दृष्टीने ही चूक होती.
रमेश दमाणी यांना नव्या पिढीचे गुंतवणूकदार समजले जाते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे भरपूर आहे. त्यांच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी मार्केटकडे एक लॉन्ग टर्म ऑप्शन म्हणून पाहण्याची दृष्टी देतात. त्यांचा हा प्रवास आणि स्ट्रॅटेजी अनेक लॉन्ग टर्म इन्व्हेस्टर तयार करत आहेत. त्यांनी लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंटला दिलेल्या योग्य महत्त्वामुळेच ते आज भारतातले यशस्वी आणि उत्तम इन्व्हेस्टर आणि ट्रेडर मानले जातात.