Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sukanya Samriddhi Yojana: मुलीच्या नावाने महिन्याला 'इतकी' गुंतवणूक करा; 21 वर्षानंतर मिळतील 63 लाख रुपये

Sukanya Samrudhi Yojana

Sukanya Samriddhi Yojana: चालू वर्षांत मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करा आणि 21 वर्षांनंतर 63 लाख रुपये मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी जमा करा. मात्र त्यासाठी तुम्हाला मासिक किती रक्कम खात्यात भरावी लागेल, ते जाणून घ्या.

आजही घरात मुलगी जन्माला आली की, तिच्या शिक्षणाची आणि लग्नाची चिंता तिच्या आई-वडिलांना जन्मापासूनच सुरु होते. मात्र आता पालकांना चिंता करण्याची गरज नाही. मुलींच्या स्वावलंबनासाठी केंद्र सरकारने अनेक योजना चालू केल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे 'सुकन्या समृद्धी योजना' (Sukanya Samriddhi Yojana).

अलीकडेच सरकारने लहान बचत योजनेमधील (Small Saving Scheme) व्याजदर वाढवले आहेत. सध्या सुकन्या समृद्धी योजनेत 7.6 टक्के व्याजदर (Interest Rate of Scheme) देण्यात येत आहे. सरकारच्या या व्याजदर वाढीनंतर सुकन्या समृद्धी योजनेत 8 टक्के व्याजदर मिळणार आहे. हा नवीन व्याजदर नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये (New Finacial First Quarter) लागू करण्यात आला आहे. जर तुम्हीही या योजनेत गुंतवणूक केली, तर तुम्हाला 21 वर्षांनंतर 63 लाख रुपये मिळू शकता. त्यासाठी तुम्हाला मासिक किती गुंतवणूक करावी लागेल, ते जाणून घेऊयात.

सुकन्या समृद्धी योजनेबद्दल

केंद्र सरकारकडून 2015 साली सुकन्या समृद्धी योजनेची (Sukanya Samriddhi Yojana) सुरुवात करण्यात आली. यामध्ये पालक त्यांच्या मुलीच्या नावाने गुंतवणूक करू शकतात. 10 वर्षाच्या आतील मुलींच्या नावाने यामध्ये गुंतवणूक करता येते. जर तुम्ही मुलीच्या जन्मानंतर लगेचच सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केली, तर मुलीचे वय 15 वर्ष होईपर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकता. मुलगीचे वय 18 वर्ष झाल्यानंतर तुम्ही या खात्यातील 50 टक्के रक्कम काढू शकता. ही रक्कम उच्च शिक्षण आणि लग्नासाठी काढली जाऊ शकते. उर्वरित रक्कम मुलीच्या वयाच्या 21 व्या वर्षी काढता येते.

63 लाख कसे मिळतील?

sukanya-samruddi-yojana.jpg
Source: Groww.com

जर तुम्हाला मुलगी झाली असेल, तर चालू  वर्षात म्हणजे 2023 मध्ये तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करू शकता. यामधील 7.6 टक्के व्याजदरानुसार आणि सुकन्या समृद्धी कॅल्क्युलेटरच्या हिशोबाने जर तुम्ही 12,500 रुपयांची मासिक गुंतवणूक केली, तर  15 वर्षाची एकूण गुंतवणूक 22,50,000 रुपये होईल. या गुंतवणुकीची मॅच्युरिटी 21 वर्षांनंतर होते. त्यामुळे एकूण 21 वर्षाचे व्याजदर हे 41,15,155 रुपये असेल. 2044 साली ही गुंतवणूक मॅच्युअर होईल आणि तुम्हाला एकरकमी 63,65,155 रुपये मिळतील.

कर सवलत मिळवता येते का?

सुकन्या समृद्धी योजनेतील गुंतवणुकीवर 1.5 लाख रुपयांपर्यंत आयकराच्या कलम 80Cअंतर्गत कर सवलत (Tax Free) मिळवता येते. यामध्ये मिळणाऱ्या व्याजावर आणि मॅच्युरिटीच्या संपूर्ण रकमेवर कर भरावा लागत नाही. ही संपूर्ण रक्कम करमुक्त असते. 

Source: www.livemint.com