Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UPI payment System: भारतीय UPI पेमेंट सिस्टिमची जगभर प्रशंसा का होतेय?

UPI payment System

इंडिया मेड युनिफाइड पेमेंट सर्व्हिस (UPI) चा डंका संपूर्ण जगात वाजला आहे. विकसित देशांच्या तुलनेत भारताची ऑनलाइन पेमेंट प्रणाली फारच जास्त प्रगत आहे. फ्रान्स, ओमान, मलेशिया, युएई, नेपाळ, भूटान, युनायटेड किंगड्म यासह अनेक देशांनी भारताची ऑनलाइन पेमेंट प्रणाली स्वीकारली आहे. यातून भारताच्या डिजिटल क्रांतीचे यश दिसून येते.

फायनान्शिअल टेक्नॉलॉजी क्षेत्रात भारताने मागील काही वर्षात उंच भरारी घेतली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातद्वारे भारत संपूर्ण जगाला सेवा पुरवतो. त्यातूनच भारतीय बँकिंग आणि आर्थिक संपूर्ण आर्थिक क्षेत्रामध्ये क्रांती घडून आली. इंडिया मेड युनिफाइड पेमेंट सर्व्हिस (UPI) चा डंका संपूर्ण जगात वाजला आहे. विकसित देशांच्या तुलनेत भारताची ऑनलाइन पेमेंट प्रणाली फारच जास्त प्रगत आहे. फ्रान्स, ओमान, मलेशिया, युएई, नेपाळ, भूतान, युनायटेड किंगड्म यासह अनेक देशांनी भारताची ऑनलाइन पेमेंट प्रणाली स्वीकारली आहे. यातून भारताच्या डिजिटल क्रांतीचे यश दिसून येते.

जगभरात होणाऱ्या एकूण ऑनलाइन व्यवहारांपैकी सुमारे ४० टक्के व्यवहार फक्त भारातमध्ये होतात, असे एका अहवालातून समोर आले आहे. जेष्ठ नागरिकांपेक्षा तरुणांमध्ये युपीआय आधारित पेमेंट मोडला जास्त पसंती आहे. भारातमध्ये युपीआय यशस्वी होण्यामागे केंद्र सरकारचे सहकार्य महत्त्वचा घटक ठरला. केंद्र सरकारद्वारे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (National Payments Corporation of India -NPCI) ची स्थापना करण्यात आली. तसेच सर्व ऑनलाइन व्यवहार नियंत्रित करण्यासाठी इमिजिएट पेमेंट सर्व्हिस (Immediate Payment Service -IMPS) सुरू करण्यात आली. एकूण बँकिंग व्यवस्थेच्या केंद्रस्थानी पायाभूत सुविधांची निर्मिती तसेच आराखडा आखण्यात आल्यामुळे त्याचा प्रसार वाढला.

अमेरिकेमध्ये संपूर्ण देशासाठी एक पेमेंट व्यवस्था अस्तित्वात नाही. प्रत्येक राज्याचे पेमेंटचे कायदे वेगवेगळे आहेत. भारतामध्ये मात्र, केंद्र सरकारद्वारे केंद्रित पद्धतीने काम झाले. 2022 मध्ये अमेरिकेत युनिफाइड पद्धतीने पेमेंट सुरू करण्यासाठी पायलट प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्याच्या कितीतरी आधीच भारताने ही सुविधा सुरू केली आहे.

UPI द्वारे होणाऱ्या ऑनलाइन पेमेंटमध्ये वाढ होण्यामागे तांत्रिक पायाभूत सुविधा उभारण्यामध्येही भारताने चांगले काम केले. ऑनलाइन व्यवहार करताना सुरक्षाही महत्त्वाचा घटक आहे. याची काळजी घेण्यात आली. रिअल टाइम पेमेंट करण्यासाठी अॅप्स, सर्व्हर, बँकिंग गेटवे यासह सर्व तांत्रिक बाबीवर भारतीय फिनटेक क्षेत्रातील कंपन्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. त्यामुळेच भारताच्या पेमेंट सिस्टिमचे जगभरामध्ये कौतुक होत आहे. UPI सिस्टिमने चीनच्या पेमेंट प्रणालीलाही मागे टाकले आहे.