Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Toy Import: इम्पोर्टेड खेळणीवर BIS मार्क तपासून घ्या; हलक्या दर्जाच्या खेळण्यांची आयात रोखण्यासाठी कठोर नियमावली

Toy Import

सरकारने आता ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सची (BIS) नियमावली खेळण्यांसाठीही लागू केली आहे. या नियमावलीनुसार खेळण्यांची गुणवत्ता नसेल तर आयातीवर निर्बंध घातले जातील. तसेच खेळणी खरेदी करताना BIS मार्क चेक करायला विसरू नका.

Cheap Toy Import: भारतामध्ये खेळण्यांची मोठी बाजारपेठ आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनच्याही पुढे गेल्याचे अनेक अहवालांतून पुढे आले आहे. सहाजिकच भारतात लहान मुलांसाठी खेळण्यांची मोठी आयात केली जाते. कारण, स्थानिक खेळणी उद्योगांकडून गरज भागवली जात नाही. तसेच चीनमधून स्वस्तात खेळणी आयात होत असल्याने या क्षेत्राकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र, आता सरकारला जाग आली असून खेळणी आयातीवरील आयात शुल्क वाढवण्यात आले असून गुणवत्तेची नियमावलीही कठोर केली आहे.

BIS नियमावली खेळण्यांसाठीही लागू (BIS norms for imported toys)

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सची (BIS) नियमावली खेळण्यांसाठीही लागू केली आहे. या नियमावलीनुसार खेळण्यांची गुणवत्ता नसेल तर आयातीवर निर्बंध घातले जातील. भारतामध्ये चीनमधून सर्वाधिक खेळण्यांची आयात होते. मात्र, त्या हलक्या दर्जाचे असल्याचे समोर आले आहे. देशांतर्गत उद्योगाला चालना देण्यासाठीही आयात कमी करण्यावर सरकारचा भर आहे. ग्राहकांचाही फसवणूक रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. 

तयार खेळण्यांसह पार्ट्सची गुणवत्ताही तपासली जाणार (Toys spare parts will be checked)

फक्त तयार खेळणीच नाही तर कच्चामाल, इतर सामुग्री, असेंबल करण्यासाठी आयात होणारे स्पेअरपार्टची गुणवत्ताही तपासली जाणार आहे. चौदा वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी असणारी खेळणीचा समावेश या नियमावलीत केला आहे. खेळण्यांची आयात कमी करण्यासाठी केंद्र सरकारने आयात शुल्क 70% पर्यंत वाढवले आहे. 2020 मध्ये बेसिक सीमाशुल्क 20% वरुन 60% करण्यात आले होते. ते आता 70% वर पोहचेल आहे. त्यामुळे आयातीत मोठी घट झाली आहे.

खेळण्यांची आयात घटली (Toys import reduced)

2018-19 साली भारताने 2,960 कोटींची खेळणी आयात केली होती. हे प्रमाण 2021-22 मध्ये 870 कोटींवर आले. दरम्यान देशांतर्गत कंपन्यांची निर्यातही वाढली. 2021-22 आर्थिक वर्षात भारताने 2,601 कोटींची खेळणी निर्यात केली. फक्त खेळणी आयात रोखण्यावर सरकारचे लक्ष नाही तर खेळणीची निर्यात कशी वाढेल, याकडे सरकार लक्ष देत असल्याचे नुकतेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटले होते.

आयात होणाऱ्या खेळण्यांना आता BIS  नुसार सुरक्षा मानांकनातही पास व्हावे लागेल. तरच भारतात आयातीला परवानगी मिळेल. ज्या खेळण्यांवर BIS क्वालिटी मार्कचे चिन्ह नाही अशा 16 हजार खेळण्या BIS ने जानेवारी महिन्यात जप्त केल्या आहेत, असे BIS चे संचालक प्रमोद कुमार तिवारी यांनी म्हटले आहे.