Central Government Welfare Scheme: स्त्री स्वाभिमान योजना ही केंद्र सरकारने देशातील महिला आणि मुलींना आरोग्य आणि स्वच्छता प्रदान करण्यासाठी सुरू केलेली एक कल्याणकारी योजना आहे. स्त्री स्वाभिमान योजना 2023 अंतर्गत, देशातील महिला आणि मुलींना मासिक पाळीच्या वेळी आरोग्याशी संबंधित समस्या दूर ठेवण्यासाठी सॅनिटरी नॅपकिन दिले जातात, जेणेकरून देशातील महिला आणि मुली त्यांच्या मासिक पाळीत निरोगी राहू शकेल. ही योजना ग्रामीण भागातील महिला आणि मुलींकरीता फार उपयोगी ठरणारी आहे.
Table of contents [Show]
योजनेचा उद्देश काय?
ग्रामीण भागात राहणार्या महिला आणि मुलींना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे बाजारात मिळणारे सॅनिटरी नॅपकिन्स विकत घेता येत नाहीत, त्यामुळे ते कापड वापरतात. परंतु ते कापड सुध्दा पूर्णपणे निर्जंतुक नसतात. त्यामुळे ग्रामीण भागात राहणार्या महिला आणि मुलींच्या आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होतात. याबाबी लक्षात घेता केंद्र सरकारने स्त्री स्वाभिमान योजना सुरु केली आहे.
देशातील महिला आणि मुलींना परवडणाऱ्या किमतीत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्याचप्रमाणे स्त्री स्वाभिमान योजनेतून महिलांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. त्यामुळे महिला आणि मुलींचे आरोग्य तर चांगले राहीलच, सोबतच त्या स्वावलंबी आणि सशक्तही होतील.
रोजगार मिळण्यास मदत होणार
स्त्री स्वाभिमान योजना सुरू करण्याची घोषणा CSC महिला BLI समारंभात करण्यात आली होती. ज्या अंतर्गत देशातील ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात राहणाऱ्या मुली आणि महिलांना सरकारकडून स्वस्त दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध करून दिले जातील. तसेच त्यांना नॅपकिन बनवण्यासाठी रोजगार उपलब्ध करून दिला जाईल.
स्त्री स्वाभिमान योजनेमुळे महिलांना आणि मुलींना मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या आरोग्यासंबंधी अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळेल, तसेच ते रोजगार मिळवून स्वावलंबी आणि सक्षम होतील. स्त्री स्वाभिमान योजना 2023 अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी, सर्व महिला आणि मुलींना CSC केंद्राला भेट देऊन https://csc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर स्वतःची नोंदणी करावी लागेल.
विक्री आणि खरेदी करणाऱ्या महिलांची साखळी
केंद्र सरकारने सुरू केलेल्या या स्त्री स्वाभिमान योजनेंतर्गत महिला आणि मुलींना मासिक पाळीच्या काळात स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे, तसेच त्यांना सरकारकडून नॅपकिन बनवण्याचे काम देण्यात येणार आहे. म्हणजेच महिलांनाही या योजनेअंतर्गत रोजगार मिळण्याची संधी मिळणार असून, त्यासाठी सरकारतर्फे देशात विविध ठिकाणी युनिट्स बांधण्यात येणार आहेत, जेणेकरून अधिकाधिक महिलांना या योजनेत जोडून त्यांना रोजगार उपलब्ध करुन देता येईल.
पात्रता
- महिला आणि मुलगी भारतीय असणे आवश्यक आहे.
- ज्या महिला आणि मुलींना मासिक पाळीच्या समस्या आहेत, त्यांनाच याचा लाभ मिळेल.
- ग्रामीण आणि शहरी भागात राहणार्या महिला आणि मुली लाभ मिळवण्यास पात्र असतील.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पत्त्याचा पुरावा
ओळख पुरावा
पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
मोबाईल नंबर