Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Share Market Opening: शेअर बाजार आज वाढीसह ओपन, सेन्सेक्स 60,800 पार, निफ्टी 17,900 च्या जवळ

Share Market Opening

Share Market Opening: आज शेअर मार्केट वाढीसह ओपन झाले आहे आणि सेन्सेक्स-निफ्टीत दिवसाच्या सुरुवातीला वाढ झालेली दिसून येत आहे.

आज देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात थोड्या तेजीने झाली आहे आणि सेन्सेक्स-निफ्टी वरच्या श्रेणीत व्यवहार करत आहेत. सेन्सेक्सची हालचाल हळूहळू वाढत असून सुरुवातीच्या काही मिनिटांतच त्याने 60,800 चा टप्पा ओलांडला आहे. निफ्टी आधीच 17900 च्या पुढे गेला आहे. BSE चा सेन्सेक्स 78.89 अंकांच्या उसळीनंतर 60770.43 वर उघडला आणि NSE चा निफ्टी 61.2 अंकांच्या वाढीसह 17905 च्या पातळीवर उघडला. काल निफ्टी 17844.60 च्या पातळीवर बंद झाला होता.

सोमवारी सेन्सेक्स 311 अंकांनी घसरून 60,691.54 वर बंद झाला तर निफ्टी 99.60 अंकांनी घसरून 17,844.60 वर बंद झाला होता.  देशांतर्गत शेअर बाजारात बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील समभागांमध्ये कमालीची कमजोरी दिसून आली. अदानी एंटरप्रायझेस हा निफ्टीमधील सर्वात असुरक्षित शेअर्सपैकी एक होता. त्यात 5.88 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. तर, Divs Lab हा निफ्टी 2.5% वाढून अव्वल ठरला होता. BSE सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या 30 समभागांपैकी 18 समभाग घसरले, तर 12 समभाग वाढीसह  बंद झाले होते. मारुतीचे शेअर्स 1.3 टक्क्यांनी खाली आले. दुसरीकडे अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर्स 1.6% वाढून बंद झाले. बीएसईच्या आकडेवारीनुसार सोमवारी 3738 शेअर्सचे व्यवहार झाले. यामध्ये 2175 समभाग घसरणीसह बंद झाले, तर 241 समभाग लोअर सर्किटला आले. बाजारातील कमजोरीमुळे  सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 265.90 लाख कोटी रुपयांवर आले आहे.

या पार्श्वभूमीवर मंगळवारी बाजारात काय घडते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले होते. मंगळवारी मात्र तेजीने बाजाराची सुरुवात झालेली बघायला मिळाली. मंगळवारी अदानी ग्रुपच्या शेअर्सचे काय होते, याकडे देखील गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे.  गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत भारतीय बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचे गुंतवणूक मूल्य 11 टक्क्यांनी कमी होऊन 584 अब्ज डॉलर  झाले आहे. भारतीय बाजारात कमी नफा आणि परदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतल्याने हे घडल्याचे विश्लेषण करण्यात येत आहे.  मॉर्निंगस्टारच्या मते, 2022 मध्ये भारतीय बाजारपेठेत विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचे (FPIs) एकूण गुंतवणूक मूल्य 654 अब्ज डॉलर असण्याची अपेक्षा होती. त्रैमासिक आधारावर सप्टेंबर 2022 अखेर ती तीन टक्क्यांनी वाढून 566 अब्ज डॉलरवर  पोहोचली होती. ही सलग दुसरी तिमाही होती जेव्हा गुंतवणुकीचे मूल्य वाढले होते. 2020 आणि 2021 मध्ये मजबूत वाढीनंतर, 2022 मध्ये जागतिक बाजार घसरले. यादरम्यान 1.21 लाख कोटी रुपये काढण्यात आले.