Trade setup for today: आंतरराष्ट्रीय स्तरावरील सकारात्मक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजार सोमवारी, 16 जानेवारी रोजी वाढीसह उघडले. सकाळी 9:19 वाजता बीएसई सेन्सेक्स 267.66 अंकांच्या किंवा 0.44 टक्क्यांच्या वाढीसह 60 हजार 528.84 अंकांवर व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे, एनएसई (NSE: National Stock Exchange) निफ्टी 85.90 अंकांच्या म्हणजेच 0.48 टक्क्यांच्या वाढीसह 18 हजार 42.50 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता.
सुरुवातीच्या व्यवहारात हे शेअर्स वाढले (These shares rose)
सोमवारी शेअर बाजारात जस्ट डायलच्या शेअर्समध्ये आठ टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली. त्याचवेळी, डिमार्टची मूळ कंपनी एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडचे समभाग 5 टक्क्यांनी घसरले.
सेन्सेक्समध्ये बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserv Ltd.) सर्वात जास्त 1.33 टक्क्यांनी वाढला. त्याचप्रमाणे एचडीएफसी बँक (HDFC Bank), इंडसइंड बँक (IndusInd Bank), बजाज फायनान्स (Bajaj Finance), एसबीआय (SBI) आणि एचसीएल टेक (HCL Tech) यांचे शेअर्स वधारले.
याशिवाय टीसीएस (TCS), अॅक्सिस बँक (Axis Bank), एशियन पेंट्स (Asian Paints), टायटन (Titan), सन फार्मा (Sun Pharma), मारुती (Maruti), टेक महिंद्रा (Tech Mahindra) आणि विप्रो (Wipro) ट्रेडिंग देखील वेगाने होत आहे.
या शेअर्समध्ये घसरण दिसून आली (These shares fell)
सेन्सेक्सच्या सुरुवातीच्या व्यवहारात नेस्ले इंडिया (Nestlé India), एल अँड टी (L&T), एनटीपीसी (NTPC), महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) यांचे शेअर्स लाल चिन्हासह व्यवहार करत होते.
एसजीएक्स निफ्टीवर सकारात्मक चिन्हे (Positive signs on SGX Nifty)
एसजीएक्सवर म्हणजे सिंगापूर एक्सचेंजवर (Singapore Exchange Limited) निफ्टी फ्युचर्स 18 अंकांच्या किंवा 0.10 टक्क्यांच्या वाढीसह 18 हजार 56.50 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. यावरून सोमवारी दलाल स्ट्रीटची सुरुवात सकारात्मक होणार असल्याचे संकेत मिळत होते.
आज 22 कंपन्या डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करतील. यामध्ये एंजल वन (Angel One), फेडरल बँक (Federal Bank) आणि बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) प्रमुख आहेत.