Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

DroneAcharya Aerial: सातत्याने अप्पर सर्किटमध्ये असणारा शेअर, 11 टक्क्यांनी कोसळला!

Shares of Dronacharya Ariel tumbled

Shares of Dronacharya Ariel tumbled: द्रोणाचार्य एरियल कंपनी शेअर बाजारात येण्याआधीपासून चर्चेत होती. आयपीओ आल्यानंतर, शेअर लिस्टेट झाल्यावर सातत्याने या कंपनीचे शेअर्स वाढत चालले होते, मात्र या वाढीला सध्या ब्रेक लागला आहे. याबाबतची संपूर्ण माहिती पुढे वाचा.

DroneAcharya Aerial Shares: भारतातील ड्रोन बनवणारी कंपनी द्रोणाचार्य एरियल इनोव्हेशनचे (Droneacharya Aerial Innovations Ltd) शेअर्स आता 20 दिवसांच्या उसळीनंतर, कोसळले आहेत. सूचीबद्ध झाल्यापासून या स्टॉकने जबरदस्त कमाई केली आहे. या कंपनीच्या गुंतवणूकदारांमध्ये बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आमिर खान आणि रणबीर कपूर यांचाही समावेश आहे. गुरुवारी शेअर बाजारातील व्यवहाराअंती कंपनीचे शेअर्स 220.25 रुपयांवर बंद झाला.

शेअर अपर सर्किटमध्ये येत होता (Share hit upper circuit level)

द्रोणाचार्य एरियलच्या (DroneAcharya Aerial) शेअर्ने, गेल्या 15 दिवसात त्यांच्या गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट करण्याचे काम केले आहे. या शेअरमध्ये सलग 14 दिवस अपर सर्किट होते. ही मालिका बाजारात आल्यापासून सुरू होती. या छोट्या कंपनीवर विश्वास ठेवून पैसे गुंतवणाऱ्या आणि भरघोस परतावा देणाऱ्या गुंतवणूकदारांची यामुळे निराशा झालेली नाही. भारतातील दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनीही द्रोणाचार्य एरियल इनोव्हेशन्स लिमिटेडमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.

शेअरला लागला ब्रेक (The share fell)

गुरुवारी द्रोणाचार्यच्या वेगाने वाढणाऱ्या शेअर्सला अखेर पूर्णविराम मिळाला आणि शेअर बाजारातील व्यवहाराअंती 4.98 टक्क्यांनी, म्हणजेच 11.55 रुपयांनी घसरत 220.25 रुपयांच्या पातळीवर पोहोचला. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशीही शेअर बाजारात घसरण झाली. बीएसईचा 30 शेअर्स असलेला सेन्सेक्स 147.47 अंकांनी, म्हणजे 0.25 टक्क्यांनी घसरून 59,958.03 वर बंद झाला. यासह, एनएसईचा निफ्टी निर्देशांक देखील 37.50 अंकांनी, म्हणजे 0.21 टक्क्यांनी घसरून 17 हजार 858.20 च्या पातळीवर व्यवसाय संपला.

ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्सने मार्च 2022 पासून 180 हून अधिक ड्रोन वैमानिकांना प्रशिक्षण दिले आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA: Directorate General of Civil Aviation) रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (RPTO) परवाना मिळवणारी ही पुणेस्थित स्टार्टअप देशातील पहिली खाजगी कंपनी आहे.

आमिर-रणबीरने इतके शेअर्स खरेदी केलेत (Aamir-Ranbir bought shares)

द्रोणाचार्य एरियल कंपनीच्या (DroneAcharya Aerial) आयपीओ आधीही बॉलिवूड स्टार्स आमिर खान आणि रणबीर कपूर यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक करून कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते. रिपोर्ट्सनुसार, आयपीओ येण्यापूर्वी आमिर खानने कंपनीचे 46 हजार 600 शेअर्स 25 लाख रुपयांना खरेदी केले होते. तर रणबीर कपूरने 20 लाख रुपयांना 37 हजार 200 शेअर्स खरेदी केले. या अभिनेत्यांसह, हे स्टॉक इतर गुंतवणूकदारांना 53.59 रुपये प्रति शेअर दराने दिले गेले.

द्रोणाचार्य एरियल कंपनीचा आयपीओ 2022 च्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये 13 ते 15 तारखेपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला होता. ते 23 डिसेंबर रोजी बीएसईवर 52-54 रुपयांच्या निश्चित किंमत बँडच्या 88 टक्के प्रीमियमसह 102 रुपयांवर सूचीबद्ध झाले. लिस्टिंग झाल्यापासून, हा स्टॉक रॉकेटच्या वेगाने धावला आणि 243 रुपयांच्या जवळ पोहोचला. यामुळे आमिर-रणवीर आणि इतर गुंतवणूकदारांनी भरपूर पैसा कमावला. पण गुरुवारी सकाळी 9.15 वाजता 243.30 रुपयांवर उघडल्यानंतर दुपारी 3.30 वाजता 220.25 रुपयांवर बंद झाला.