Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Stock Market Update: सेन्सेक्स, निफ्टीची नकारात्मक सुरुवात, हिंदुस्तान युनिलिव्हर शेअर्स खालावले!

Share Market Opening

Stock Market Opening Bell Today: आज, 20 जानेवारी रोजी बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली आहे. सेन्सेक्सवरील सुरुवातीच्या व्यापारात, एफएमसीजी क्षेत्रातील दिग्गज हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या (HUL) शेअर्समध्ये 3.06 टक्क्यांची सर्वात मोठी घसरण झाली. इतर कोणते शेअर्स वधारले, कोणते खालावले याबाबतचा तपशील या बातमीतून समजून घ्या.

Trade setup for today: देशांतर्गत शेअर बाजार, आज शुक्रवार दिनांक 20 जानेवारी रोजी सपाट पातळीवर व्यवहार करत होते. सकाळी 09:19 वाजता बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) 39.66 अंकांनी म्हणजेच 0.07 टक्क्यांनी घसरून 60 हजार 818.77 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे एनएसई निफ्टी (NSE Nifty) 14.50 अंकांच्या म्हणजेच 0.08 टक्क्यांच्या घसरणीसह 18 हजार 093.35 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता.

हे शेअर्स घसरले (A decline was seen in these stocks)

सेन्सेक्सवरील सुरुवातीच्या व्यवहारात, एफएमसीजी क्षेत्रातील दिग्गज हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या (HUL)  शेअर्समध्ये 3.06 टक्क्यांची सर्वात मोठी घसरण झाली. त्याचप्रमाणे एशियन पेंट्समध्ये (Asian Paints) 1.99 टक्के, सन फार्मामध्ये (Sun Pharmaceutical) 0.99 टक्के, नेस्ले इंडियामध्ये (Nestlé India) 0.98 टक्के, टायटनमध्ये (Titan) 0.79 टक्के वाढ दिसून आली. याशिवाय आयटीसी (ITC), रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL), बजाज फायनान्स (Bajaj Finance), महिंद्रा आणि महिंद्रा (Mahindra & Mahindra) आणि मारुतीमध्येही (Maruti) विक्री दिसून आली, ज्यामुळे शेअर्स खालावत आहेत.

हे शेअर्स वधारले (These stocks showed a bullish trend)

बीएसई सेन्सेक्सवर पॉवरग्रीडचे (PowerGrid) शेअर्स सर्वाधिक एक टक्क्यांच्या उसळीसह व्यवहार करत होते. यासह आयसीआयसीआय बँकेत (ICICI Bank) 0.81 टक्के, इंडसइंड बँकेत (IndusInd Bank) 0.80 टक्के, टाटा मोटर्समध्ये (Tata Motors) 0.72 टक्के, एनटीपीसीमध्ये (NTPC) 0.56 टक्के, अल्ट्राटेक सिमेंटमध्ये (Ultratech Cement) 0.41 टक्के, लार्सन अँड टुब्रो (Larsen and Toubro) 0.41 टक्के, एसबीआय (SBI) 0.3 टक्के, विप्रो (Wipro) 0.32 टक्के, एचसीएल टेक (HCL Tech) 0.32 टक्के आणि भारती एअरटेल (Bharti Airtel) 0.27 टक्के व्यवसायात उडी मारली आहे.

रुपया वाढीसह उघडला (Rupee opened higher)

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 0.12 टक्क्यांनी वाढून 81.26 वर उघडला. मागील सत्रात तो 81.36 च्या पातळीवर बंद झाला होता.

या कंपन्यांचे, आज निकाल (Results of these companies today)

शुक्रवारी, 20 जानेवारी रोजी 56 कंपन्यांचे तिमाही निकाल येणार आहेत. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, जेएसडब्ल्यू स्टील, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स, बंधन बँक आणि आरबीएल बँक यांचा समावेश आहे.

हे सिग्नल एसजीएक्स निफ्टीवर दिसून आले

सिंगापूर एक्सचेंजवर निफ्टी फ्युचर्स 18 अंकांच्या, म्हणजेच 0.10 टक्क्यांच्या वाढीसह 18 हजार 131.50 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. यावरून शुक्रवारी दलाल स्ट्रीटची सुरुवात सकारात्मक होणार असल्याचे संकेत मिळाले.