Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Adani vs Hindenburg: अदानी यांनी उचलले आता ‘हे’ मोठे पाऊल

Adani Group

Image Source : www.thehindubusinessline.com

Hindenburg ने आपला रिसर्च जाहीर केल्यानंतर अदानी यांना रोज नवनव्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यातच आता गौतम अदानी यांनी ही एक मोठी घोषणा केली आहे.

शेअर बाजारात अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सुरू असलेल्या चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर समूहाने मोठी घोषणा केली आहे. सोमवारी एक निवेदन जारी करण्यात आले. यात  कंपनीने म्हटले आहे की,  ती सप्टेंबर 2024 पूर्वी आपल्या सूचीबद्ध कंपन्यांचे 1114 दशलक्ष अमेरिकन डॉलर म्हणजे 111 कोटी मूल्याचे तारण शेअर्स रिलीज करेल.
समूहाने केलेल्या घोषणेनुसार, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन 168.27 दशलक्ष शेअर जारी करतील, जे कंपनीतील एकूण प्रवर्तकांच्या 12 टक्के शेअर्स आहेत. तर अदानी ग्रीनचे 27.56 दशलक्ष शेअर्स जारी केले जातील, जे प्रवर्तकांच्या होल्डिंगच्या 3% आहे.

अदानी समूहाचे प्रवर्तक सप्टेंबर 2024 मध्ये मुदतपूर्तीपूर्वी तारण ठेवलेले शेअर्स सोडण्यासाठी 1,114 डॉलर दशलक्षचे प्री-पेमेंट करतील, असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. अदानी ट्रान्समिशन लिमिटेडचे 11.77 दशलक्ष शेअर्स जारी केले जातील जे कंपनीतील प्रवर्तक होल्डिंगच्या 1.4% इतके आहेत. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की,  प्रवर्तकांनी वित्तीय संस्थांना त्यांच्या कर्जाच्या पेमेंटची खात्री देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

अदानी समूहाबाबत हिंडेनबर्ग संशोधनाचा अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर समूहाच्या शेअर्समध्ये कमालीची घसरण झाली आहे. समूहाचे मार्केट कॅप जवळपास निम्म्यावर आले आहे. दरम्यान, समूहाने आपला एफपीओही मागे घेतला आहे. या अहवालात अदानी समूहाच्या खात्यांमध्ये अनियमितता असल्याचा दावा करण्यात आलेला आहे.अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये गेले काही दिवस घसरण बघायला मिळत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांना अदानी समूहाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच अदानी समूहाला आता Dow Jones निर्देशांकतूनही बाहेर पडावे लागणार आहे .