Tamil Nadu Start - Up Mission For Women’s : तामिळनाडू सरकारने आपल्या 2023 ते 2024 च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी विशेष अशा स्टार्ट-अप मिशन फॉर वूमन या योजनेची घोषणा केली आहे. नवीन व्यवसाय सुरू करताना महिलांना समान संधी उपलब्ध करुन देण्यासाठी, निधी उभारणे, उत्पादनांचे विपणन (मार्केटिंग) करण्यासाठी महिलांना विविध अडचणी येतात. या अडचणींवर मात करण्यासाठी महिलांना मदत करण्याच्या उद्देशाने तामिळनाडू सरकारने ही योजना सुरू केली आहे.
2030 पर्यंत तामिळनाडू राज्याला आपली अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट साध्य करायचे आहे. या उद्दिष्टपूर्तीमध्ये महिलाचा वाटा अधिक असावा या उद्देशाने तामिळनाडू सरकारने याआधिही विविध योजनांच्या माध्यमातून महिला उद्योजकांना, नोकरदार महिलांना विविध सोई-सुविधा वा योजना लागू केल्या आहेत.
आता नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या स्टार्ट-अप मिशन फॉर वूमन या उपक्रमा अंतर्गत लघु-उद्योगांचे प्रमाणा वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच महिलांकडून नेतृत्व केल्या जाणाऱ्या स्टार्ट-अप व्यवसायाच्या वाढीसाठी त्यांना आवश्यक असलेले प्रशिक्षण व मार्गदर्शन केले जाणार आहे. कर्ज उभारणीसाठी मदत करणे व उद्योगांच्या स्थिरतेसाठी सहाय्य करणार आहेत.
Highlights of Startup related announcements in Tamil Nadu Budget 2023-24 by Dr. Palanivel Thiaga Rajan, Hon’ble Minister for Finance and Human Resources Management, on March 20, 2023.@mkstalin @ptrmadurai @thamoanbarasan @aprsiva #TamilNaduBudget pic.twitter.com/0JXtW5l3lE
— Startup TN (@TheStartupTN) March 20, 2023
महिलांचे स्टार्टअप्समधील योगदान
केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत या अंतर्गत स्टार्ट इंडिया या मिशनला सुरूवात केली आहे. त्यानुसार आजमितीला भारतामध्ये 57 हजार स्टार्ट-अप्स आहेत. या स्टार्ट-अप इंडिया इकोसिस्टीममध्ये महिलांकडून नेतृत्व केल्या जाणाऱ्या स्टार्ट-अपचे प्रमाण 18 टक्के आहे. झीनोव-नॅसकॉमच्या (Zinnov-Nasscom) पाहणी अहवालानुसार, 36 युनीकॉर्न्सच्या संस्थापक किंवा सह-संस्थापकामध्ये (Founder or Co-founder) महिलांचा समावेश आहे.
उद्योगाच्या वार्षिक अहवालानुसार (Annual Report of Industry 2017-18) तामिळनाडूमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यासोबतच महिला उद्दोजकांचे सुद्धा सर्वाधिक प्रमाण (13.51 टक्के) हे तामिळनाडूमध्ये आहे. म्हणून नोकरी करण्यासोबत नोकरी देणाऱ्यामध्येही तामिळनाडूमधील महिला अग्रस्थानी आहेत. केरळमध्ये महिला उद्योजक प्रमाण 11.35 आणि आंध्रप्रदेशमध्ये 10.56 टक्के आहे.
महाराष्ट्र सरकारचे महिला उद्योजकासंबंधित धोरण
महाराष्ट्रामध्ये 2 हजारहून अधिक स्टार्टअप्स अस्तित्वात आहेत. सहाव्या आर्थिक पाहणी अहवालानुसार (2013-2014), महाराष्ट्रामध्ये महिला नव-उद्याजकांचे प्रमाण 8.16 टक्के होते. राज्यातील विविध स्तरावरील महिला उद्योजकांचे प्रमाण वाढावे यासाठी डिसेंबर 2017 साली महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिला उद्योजकांसाठी विशेष धोरण तयार केले. महिला उदयोजकांसाठी विशेष धोरण राबविणारे महाराष्ट्र राज्य हे पहिले राज्य होते.
महाराष्ट्र सरकारच्या या धोरणा अंतर्गत महिला उद्योजकांना विशेष प्रोत्साहन योजनेअंतर्गत भांडवली अनुदान, वीज दर अनुदान, व्याज दर अनुदान, कामगार कल्याण साहाय्य, बाजारपेठ विकास व विपणन साहाय्य, समर्पित जागा निर्माण करणे, स्पर्धात्मकता वाढविणे, साहस भांडवल निर्मिती अशा विविध बाबींचा समावेश करण्यात आला आहे.