पुणे विमानतळावरुन अनेक शहरासांठी विमान सेवा सुरू झाल्या आहेत. त्यातच आता पुण्यातून बिझनेस क्लास विमानसेवा सुरू होणार आहे. स्टार एअरकडून (Star Air) पुण्यातून बिझेनस क्लास विमान सुविधा सुरू करण्यात येणार आहे. पुणे हैदराबाद बंगळुरू अशी ही विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे. येत्या 26 जुलैपासून पुणे बंगळुरू-पुणे व्हाया हैदराबाद अशी विमान सेवा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा स्टार एअरकडून करण्यात आली आहे
पुणे-हैदराबाद बिझनेस क्लास सेवा
स्टार एअर, भारतातील प्रादेशिक विमान कंपनी आहे. या कंपनीकडून पुण्यातून प्रथमताच विमान सुरु करण्यात येत आहे.  26 जुलै 2023 पासून, स्टार एअर बंगळुरू (BLR) हैदराबाद (HYD) मार्गे पुणे (PNQ) अशी विमान सेवा सुरू करेल. या नवीन डेस्टिनेशनमुळे हैदराबाद-पुणे या हवाई मार्गावर बिझनेस क्लास सुविधा देणारी स्टार एअर ही एकमेव एअरलाइन झाली आहे. स्टारचे Embraer  E175  हे विमान पुण्यात उतरण्याचीही ही पहिलीच वेळ असेल.
पुणे- बंगळुरू-पुणे हैदराबाद मार्गे
बंगळुरू-हैदराबाद फ्लाइट बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोमवार ते शुक्रवार 15:25 वाजता निघेल आणि 16:35 वाजता हैदराबादला पोहोचेल. हैदराबादहून ती 17:05 वाजता निघून पुण्याला 18:15 वाजता पोहोचेल. परतीच्या मार्गावर पुण्याहून 18:45 वाजता निघून 20:10 वाजता हैदराबादला पोहोचेल.हैदराबादहून ते 20:50 वाजता निघेल आणि 21.55 वाजता बंगळुरूला पोहोचेल. शनिवार आणि रविवारी स्टार एअरकडून पुणे हैदराबाद बंगळुरू दोन्ही बाजूंची सेवा बंद राहणार आहे.
भविष्यात आणखी नवीन शहरांसाठी सेवा
स्टार एअरचे सीईओ सिमरन सिंग तैवान यांनी म्हटले की, बंगळुरु, हैदराबात आणि पुणे ही सेवा प्रथमच आम्ही सुरु करत आहोत. यामुळे प्रवाशांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण होणार आहे. पुणे हे आमच्यासाठी चांगले नेटवर्क आहे. त्याठिकाणी भविष्यात पुण्यातून आणखी काही शहरासांठी विमान सेवा सुरू करण्यात येणार आहेत.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            