SpiceJet Widens Net Loss to Rs 838 Crore : देशातील लो कॉस्ट कॅरियर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्पाइस जेटच्या रेवेन्यूमध्ये वाढ झाली आहे. एकीकडे ही वाढ दिसत असली तरी स्पाइस जेटला 838 कोटींचा तोटा झाला आहे. चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा तोटा वाढला आहे.
महसुलात 57% वाढ
स्पाइस जेटच्या एकूण महसुलामध्ये 57%वाढ झाली. कंपनीला दुसऱ्या तिमाहीत 2,104 कोटींचा महसूल प्राप्त झाला.गेल्या आर्थिक वर्षात याच तिमाहीत सुमारे 1538 कोटी इतका होता. यात 566 कोटी इतकी वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी 14 नोव्हेंबर 2022 रोजी जाहीर करण्यात आली. कंपनीने प्रसिद्ध केल्याप्रमाणे सप्टेंबर तिमाहीतील निव्वळ तोटा वाढून तो 838.7 कोटीपर्यंत गेला आहे. गेल्या वर्षातल्या या तिमाहीत तो सुमारे 561 कोटी रुपये इतका होता. सप्टेंबर तिमाहीच्या दरम्यान स्पाइस जेटची सब्सिडियरी कार्गो कंपनी स्पाइस एक्सप्रेसने 21.2 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. या कालावधीत कंपनीने सुमारे 206 कोटी इतका महसूल मिळवला आहे.
तोटा कशामुळे
फॉरेन एक्स्चेंज करन्सीही ठरली तोट्याचे कारण : फॉरेन एक्स्चेंज करन्सी लॉस हे एक यातले महत्वाचे कारण आहे. 838 कोटीपैकी 260 कोटीच्या तोट्याचे हे कारण आहे. हे नुकसान बाजूला केल्यावर ते गेल्या वर्षीच्या याच काळवधीतल्या तोट्याच्या जवळपास पोहोचतो. या तिमाहीत रूपयाच्या मूल्यात घट झाली. त्याचप्रमाणे हवाई इंधनाच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. ही कारणं या तोट्याविषयी स्पाइस जेटने स्पष्ट केली आहेत.
वर्षभरात शेअर्समध्ये घसरण : गेल्या वर्षभरात स्पाइस जेटचा दर 45 टक्क्यानी घसरला आहे. मात्र गेल्या एका महिन्याभरात तो एक टक्क्यापेक्षा अधिक वाढला आहे. 15 नोव्हेंबर रोजी त्यात 0.13 टक्क्यानी घट होत तो 38.85 रुपयांवर बंद झाला आहे.