Ujjivan Small Finance Bank General Customers Scheme : खाजगी क्षेत्रातील उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने 2 जून रोजी आपल्या ग्राहकांसाठी एक वर्षाच्या मुदत ठेवीवर (FD) दिलेल्या व्याजात वाढ केली आहे. आता ही बँक आपल्या ग्राहकांना एक वर्षाचा FD व्याजदर 8 टक्क्यांहून अधिक देत आहे. हा व्याजदर सर्व लघु वित्त बँकांद्वारे देऊ केलेल्या सर्वोच्च व्याजदरांपैकी एक आहे. त्याच वेळी, ही बँक ज्येष्ठ नागरिकांच्या श्रेणीतील ग्राहकांना 8.50 टक्क्यांहून अधिक व्याजदर देखील देत आहे.
ही बँक किती व्याज देत आहे
खाजगी क्षेत्रातील उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 1 वर्षाच्या FD वर 8.25 % व्याजदर देत आहे. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर 8.75 % केला आहे. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक मासिक, त्रैमासिक आणि मॅच्युरिटी असे तीनही पेमेंट पर्याय ऑफर करते. टॅक्स सेव्हर फिक्स्ड डिपॉझिट पाच वर्षांच्या लॉक-इन कालावधीसह देत आहे.
बँकेने काय सांगितले
'आम्हाला आमच्या ग्राहकांसाठी 1 वर्षाच्या कालावधीसाठी व्याजदरात वाढ देतांना आनंद होत आहे. यामुळे आमच्या ग्राहकांना कमी मुदतीच्या ठेवींवर जास्त परतावा मिळू शकेल. बँक प्लॅटिना एफडी अंतर्गत 0.20 % अतिरिक्त व्याज दर देत आहे, हा व्याजदर 15 लाखांपेक्षा जास्त आणि 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींसाठी लागू होते. प्लॅटिना एफडी नॉन-कॉलेबल आहे, याचा अर्थ या योजनेत आंशिक आणि मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध नाही', अशी माहिती उज्जीवन बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी इत्तिरा डेव्हिस यांनी दिली.
एफडीचे दर वाढतील
एकीकडे एफडीवरील व्याजदरात वाढ केली जात असताना, दुसरीकडे व्यापारी बँकांच्या तुलनेत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उज्जीवन बँक आपल्या पत वाढीसाठी (For credit enhancement) अधिक व्यावसायिक दर देऊ करत आहे. दुसरीकडे, AU स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना 12 महिन्यांच्या कालावधीसाठी 6.71 % दराने व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हे व्याज ७.२१ % आहे. दुसरीकडे, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना 6.60 % आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.10 % व्याजदर देत आहे. तर कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक १२ महिन्यांच्या एफडीवर ७.६० % आणि ज्येष्ठ नागरिकांना ८.२५ % व्याज देत आहे.