Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tax Benefits For Women : कर बचतीच्या या टीप्स महिलांना माहित असायला हव्यात

Special Income Tax Benefits For Women, Income Tax, Salaried Women Income

What are the Tax Benefits For Women : महिला विविध माध्यमातून त्यांच्या इन्कम टॅक्समधील मोठी रक्कम वाचवू शकतात. प्रत्येकाकडे स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी आरोग्य विमा असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे आरोग्य विमा असण्याचे आणखी एक कारण म्हणजे तुम्ही आरोग्य विम्यासाठी भरलेला प्रीमियम कर कपातीसाठी पात्र आहे.

वाढणारी महागाई, बेरोजगारीमुळे आर्थिक गणित कोलमडते. अशा स्थितीत उत्तम, स्थिर भविष्यासाठी अनेक पर्यायांचा आजपासूनच विचार करणे गरजेचे आहे. भारतात महिलांना आयकरात (Income Tax) कोणतीही विशेष सवलत देण्यात आलेली नाही. तरीही विविध योजना आणि विविध कर सवलतींच्या माध्यमातून महिला आयकरातून मोठी रक्कम वाचवू शकतात.  

सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samridhi Yojna)

जर तुम्हाला मुलगी असेल, तर तुम्ही तिच्यासाठी सुकन्या समृद्धी खाते सुरु करु शकता. यात गुंतवणूक केलेली रक्कम कर वजावटीसाठी (Tax Deduction) पात्र असेल. 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडू शकता आणि प्रत्येक आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 1,50,000 रुपये जमा करु शकता. जेव्हा तुमची मुलगी २१ वर्षांची होईल तेव्हा या योजनेतील सर्व रक्कम काढता येते. पण काही विशिष्ट परिस्थितीत या योजनेतील पैसे वेळेपूर्वी काढता येतात. सध्या, सुकन्या समृद्धी योजना 7.6% व्याज दर देते. योजनेचा कालावधी 21 वर्षांचा आहे. विशेष म्हणजे, या योजनेतून मिळणारी एकूण रक्कम आणि व्याजावर कोणताही कर आकारला जात नाही.  

इतर गुंतवणुकीवर वजावट (Deduction on Other Investment)

तुम्ही कलम 80C वापरू शकता आणि 1,50,000 रुपयांपर्यंतच्या कपातीसाठी दावा करू शकता. या विभागात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जसे की, पीपीएफ, आयुर्विमा, पाच वर्ष मुदतीच्या ठेवी, ईएलएसएस म्युच्युअल फंड इत्यादी पर्याय आहेत. पीपीएफ सध्या 7.1% वार्षिक व्याज दर देतात.

आरोग्य विमा (Health Insurance)

प्रत्येकाकडे स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी आरोग्य विमा असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे आरोग्य विमा असण्याचे आणखी एक कारण म्हणजे तुम्ही आरोग्य विम्यासाठी भरलेला प्रीमियम कर कपातीसाठी पात्र आहे. आरोग्य विम्यासाठी तुम्ही दावा करु शकता अशी कमाल वजावट (maximum deduction) रुपये 25,000 प्रति वर्ष आहे. तुम्ही हे पेमेंट स्वतःसाठी, तुमच्या जोडीदारासाठी, मुलांसाठी किंवा पालकांसाठी करू शकता.

तुम्ही तुमच्या बचत खात्यात ठेवलेल्या पैशातून व्याज मिळवल्यास, तुम्ही 10,000 रुपयांपर्यंतच्या कर वजावटीसाठी  दावा करु शकता. भारतातील बहुतेक बँका महिलांसाठी विशेष खाते सुविधा देतात ज्या तुम्हाला शून्य-बॅलन्स खाते (Zero Balance Account) उघडण्याचा पर्याय देतात.

घर भाड्यासाठी भत्ता (Allowance for House Rent)

तुम्ही एखादे ठिकाण किंवा घर भाड्याने घेतल्यास, तुम्हाला त्या रकमेचा करातून सूट मिळवण्यासाठी वापर करत येतो. ही सूट तुमची भाड्याची रक्कम, मूळ पगार, नियोक्त्याने (employer) दिलेला भत्ता आणि स्थान यावर अवलंबून असते.

शैक्षणिक कर्ज (Educational loan)

जर तुम्ही शैक्षणिक कर्ज घेतले असेल, तर तुम्ही कर्जावरील व्याजावर कर लाभांचा दावा करू शकता. हे कर्ज तुमच्या नावावर किंवा तुमच्या मुलांच्या नावावर असू शकते. कर सवलतीचे दावे 8 वर्षांपर्यंत किंवा व्याज भरण्यापर्यंत केले जाऊ शकतात. येथे सर्वात मोठा फायदा म्हणजे दाव्याच्या रकमेसाठी कोणतीही उच्च मर्यादा नाही.

गृहकर्ज (Home Loan)

चालू आर्थिक वर्षात, गृहनिर्माण वित्त कंपन्यांच्या पोर्टफोलिओमध्ये 8-10% आणि आर्थिक वर्ष 2022-2023 मध्ये 9-11% वाढ होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही गृहकर्ज घेतले असेल, तर तुम्ही आयकर कायद्याच्या 80C अंतर्गत मूळ रक्कम, मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्कावर वजावटीचा (Deduction) दावा करू शकता. कलम 24 अंतर्गत गृह मालमत्तेतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा भाग म्हणून गृहनिर्माण कर्जावरील व्याजासाठी तुम्ही 2,00,000 रुपयांपर्यंतच्या अतिरिक्त कपातीचा दावा करू शकता.