Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sovereign Gold Bond: सार्वभौम सुवर्ण रोख्यात गुंतवणुकीचा विचार आहे? वर्षाला ‘एवढा’ मिळेल परतावा

Sovereign Gold Bond

आरबीआयकडून दरवर्षी Sovereign Gold Bond गुंतवणुकीसाठी सीरिज जारी केली जाते. यामधील गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित मानली जाते.

गेल्याकाही वर्षात दागिन्यांच्या स्वरुपात सोने खरेदी करण्याचे प्रमाण कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकजण सोन्याच्या इतर स्वरुपात गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. यापैकीचSovereign Gold Bondएक आहे. सरकारकडून देखील सार्वभौम सुवर्ण रोख्यातील गुंतवणुकीला प्राधान्य दिले जात असून, आरबीआयकडून दरवर्षी यामध्ये गुंतवणुकीसाठी सीरिज जारी केली जाते. तुम्ही देखील यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर यातून मिळणाऱ्या परताव्याविषयी सविस्तर जाणून घेणे गरजेचे आहे. 

सार्वभौम सुवर्ण रोखे (Sovereign Gold Bond) म्हणजे काय?

सार्वभौम सुवर्ण रोखे म्हणजे नक्की काय हे थोडक्यात समजून घेणे गरजेचे आहे. सरकारने 2015 मध्ये या योजनेची सुरुवात केली होती. एकप्रकारे ही सोन्याची खरेदीच असते. मात्र, यात अस्सल सोन्याऐवजी बाँड्समध्ये गुंतवणूक केली जाते. याची किंमत ही ग्रॅमनुसार ठरत असते. यातील गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित मानली जाते. 

तुम्ही किती सोने खरेदी करू शकता?

Sovereign Gold Bond योजनेंतर्गत एक व्यक्ती सर्वसाधारणपणे 1 ग्रॅमपासून ते 4 किलोपर्यंत सोने खरेदी करू शकता. एचयूएफसाठी ही मर्यादा 4 किलो व इतर संस्थांसाठी 20 किलोपर्यंत आहे. 

बाजारातील सोन्याच्या तुलनेत किंमत कमी

या योजनेंतर्गत सोने खरेदी केल्यास बाजारातील सोन्याच्या तुलनेत खूपच कमी किंमतीत मिळतात. तसेच, ऑनलाइन माध्यमातून खरेदी केल्यास प्रति ग्रॅमवर 50 ते 70 रुपयांपर्यंत सूट देखील देण्यात येते. या योजनेंतर्गत गेल्याकाही महिन्यात विक्री करण्यात आलेल्या बाँड्सची किंमत पुढे देण्यात आली आहे. 

गेल्याकाहीमहिन्यात सुवर्ण रोख्याची किंमत

महिना

किंमत(प्रति ग्रॅम)

जून 2022

Rs. 5,041

ऑगस्ट 2022

Rs. 5,091

डिसेंबर 2022

Rs. 5,409

मार्च 2023

Rs. 5,611

जून 2023

Rs. 5,926

सप्टेंबर 2023

Rs. 5,923

सोर्स - https://cleartax.in/   

व्याजदर आणि कालावधी 

या योजनेंतर्गत गुंतवणुकीवर वर्षाला 2.5 टक्के दराने परतावा मिळतो. यावरील व्याज दर सहा महिन्याने दिले जाते. व्याजदरात संपूर्ण मॅच्युरिटी कालावधीमध्ये बदल होत नाही. योजनेचा मॅच्युरिटी कालावधी हा 8 वर्ष असतो. परंतु, 5 वर्षानंतर तुम्ही यातून बाहेर पडू शकता.

समजा, तुम्ही यामध्ये 6000 रुपयांची गुंतवणूक केली असल्यास 2.5 टक्के दराने तुम्हाला वर्षाला 150 रुपये परतावा मिळेल. अशाप्रकारे, पुढील 8 वर्ष तुम्हाला 1200 रुपये (8 वर्षX 150 रुपये) व्याज स्वरुपात मिळेल. 

Sovereign Gold Bond vs इतर सोन्यात गुंतवणूक

सार्वभौम सुवर्ण रोख्याव्यतिरिक्त सोन्यात गुंतवणुकीचे इतरही मार्ग आहेत. तुम्ही दागिने, नाणी अशा अस्सल सोन्यात गुंतवणूक करू शकता. तसेच, गोल्ड ईटीएफ, डिजिटल गोल्ड, गोल्ड म्यूच्युअल फंड असेही अनेक गुंतवणुकीचे प्रकार आहेत. कशात गुंतवणूक कमी जोखमीची व जास्त परतावा देणारी असेल, हे समजून घेणे गरजेचे आहे. Sovereign Gold Bond मध्ये परतावा कमी मिळतो. तर त्या तुलनेत अस्सल सोन्यातील गुंतवणुकीत कोणताही परतावा मिळत नाही. असे सोने हरवण्याची, चोरी होण्याची देखील शक्यता असते. दुसरीकडे, गोल्ड ईटीएफ, गोल्ड म्यूच्युअल फंड हे बाजारानुसार नियंत्रित होत असतात. या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा अधिक असला तरीही जोखीम देखील तेवढीच असते. 

सार्वभौम सुवर्ण रोखे (sovereign gold bonds) तुम्हाला कसे लाभ देतात याबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.