रेस्टॉरंट चेन मॅकडॉनल्ड (McDonald's) लवकरच भारतात एक म्युझिक प्लॅटफॉर्म (Music Platform) लॉंच करत आहे. आय एम लव्हिंग इट लाइव्ह (I am loving it live) या नावाच्या या व्यासपीठावर देशातील बड्या कलाकारांचा समावेश आहे. कंपनीने बॉलिवूड स्टार कार्तिक आर्यनला आपला ब्रँड अँम्बेसेडर म्हणून घोषित केले आहे. या म्युझिक प्लॅटफॉर्मवर आठ दिग्गज संगीतकार सादरीकरण करणार आहेत, अशी माहिती मॅकेडॉनल्ड्स नॉर्थ अँड ईस्टचे अध्यक्ष संजीव अग्रवाल यांनी दिली. यात गुरू रंधावा, अरमान मलिक या नावांचा समावेश आहे. कंपनीचा बिझनेस प्लॅन स्पष्ट करताना संजीव अग्रवाल यांनी मॅकडॉनल्ड्स 5000 लोकांची भरती करण्याच्या तयारीत असल्याचंही सांगितलं. कंपनी तीन वर्षांत 160 नवीन आउटलेट उघडणार आहे.
आंतरराष्ट्रीय संगीत फ्रँचायझी तयार करणार (Will create an international music franchise)
संजीव अग्रवाल म्हणाले की, मॅकडॉनल्ड्स एमटीव्ही या म्युझिक चॅनेलसोबत आंतरराष्ट्रीय संगीत फ्रँचायझी तयार करण्यासाठी काम करत आहे. या योजनेंतर्गत ग्लोबल म्युझिक प्लॅटफॉर्मची स्थापना करण्यात येत आहे. हा प्लॅटफॉर्म कोक स्टुडिओ सारखाच असेल, जो एक टेलिविजन आधारित संगीत शो आहे. ज्यामध्ये स्टुडिओ रेकॉर्डेड प्रोग्रामचे प्रदर्शन होते.
सबब्रँड मॅककॅफे बाजारात आणणार (Subbrand McCafe will be launched in the market)
मॅकडॉनल्ड्स इंडिया नॉर्थ अँड ईस्टचे अध्यक्ष संजीव अग्रवाल म्हणाले की, म्युझिक प्लॅटफॉर्मचा उद्देश ग्राहकांशी आमचे संबंध दृढ करणे हा आहे. मॅकडॉनल्ड्सची ही घोषणा अशा वेळी करण्यात आली आहे जेव्हा कोरोना महामारीच्या 2 वर्षांनंतर अशा कॉन्सर्टला पुन्हा एकदा जोर चढत आहे आणि सर्व कंपन्या त्यांच्या प्रमोशनसाठी असे प्लॅटफॉर्म तयार करताना दिसत आहेत. कोविड – 19 नंतरच्या काळात लोकांची गर्दी पुन्हा एकदा मॉल्स आणि रेस्टॉरंटकडे वळत आहे. याचा फायदा घेण्यासाठी मॅकडॉनल्ड्स आपला एक सबब्रँड मॅककॅफे बाजारात आणणार आहे. मॅककॅफे ही कॉफी-हाऊस-स्टाईल फूड अँड बेव्हरेज चेन असेल जी मॅकडॉनल्डच्या मालकीची असेल. मॅककॅफे हा एक स्वतंत्र ब्रँड असेल जो स्टारबक्स, कोस्टा कॉफी आणि टिम हॉर्टन्सशी स्पर्धा करेल. याशिवाय रिलायन्ससारखा मोठा ब्रँडही या सेगमेंटमध्ये पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे.