Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Saving Tips : पती-पत्नी दोघांनी मिळून बचत करण्याच्या काही टिप्स जाणून घ्या

Saving Tips

Saving Tips For Husband And Wife : विवाह झाल्यानंतर संसार सांभाळतांना पती-पत्नीच्या खऱ्या जबाबदाऱ्या सुरु होतात. नोकरी किंवा व्यवसाय करणे, घर खर्च चालविणे, मुलांचे आरोग्य सांभाळणे, घरातील ज्येष्ठांचा मानपान सांभाळणे, या सगळ्या गोष्टींमध्ये महत्वाची गोष्ट करायची राहुनच जाते, ती म्हणजे दोघांनी मिळून केलेली बचत.

Take Financial Decision Together : एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, जे पती-पत्नी मिळून बचत करतात किंवा आर्थिक धोरण ठरवतात, ते कुटुंब आर्थिकदृष्ट्या अधिक सुखी असते. पती-पत्नी जीवनाशी निगडीत प्रत्येक निर्णय एकत्र घेत असतात. मग ज्यावेळी आर्थिक बचतीची वेळ येते, त्यावेळी आपण मागे का पडतो?  

क्रेडिट कार्ड, बँक आणि एकत्रित गुंतवणूक करण्यास खाती उघडणारी जोडपी दीर्घकाळासाठी आनंदी असतात. त्यांच्या कडे घर खरेदीपासून ते सेवानिवृत्तीपर्यंतच्या आयुष्यातील प्रत्येक मोठे ध्येय पूर्ण करण्याची क्षमता असते. आज आपण जाणून घेणार आहोत, पती-पत्नी दोघांनी मिळून बचत करण्याच्या काही टिप्स.

दोघांनी मिळून घ्या आर्थिक निर्णय

एका संशोधनात असे आढळून आले की, जे जोडपे पैसे शेअर करतात, ते त्यांच्या नात्यात अधिक समाधानी असतात. कारण दोघेही त्यांच्या आर्थिक बाबींसाठी जबाबदार असतात. अश्यावेळी पती-पत्नी दोघेही त्यांचे आर्थिक खर्च आणि बचतीच्या सवयींवर अधिक बारकाईने लक्ष ठेवू शकतात. तेव्हा आर्थिक बाबींचा कोणताही निर्णय घेतांना तुम्ही दोघांनी तो एकत्र घेणे अपेक्षित आहे.

एकत्र बचत करा

एकमेकांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी संयुक्त बँक खाते उघडण्याचा निर्णय घ्या. दोघांच्या पागाराचा काही भाग घरखर्चासाठी संयुक्त खात्यात ठेवा आणि दोघांच्या वयक्तिक खर्चासाठी काही पैसे आपआपल्या वैयक्तिक खात्यात ठेवा.

संयुक्तपणे आर्थिक प्लॅन बनवा

जर तुम्हाला होणारा अतिरिक्त किंवा अनावश्यक खर्च टाळायचा असेल, तर तुम्ही एकत्र बसुन आर्थिक प्लॅन तयार करा, असे केल्यास तुम्हाला एकत्र आर्थिक लक्ष्य निश्चित करण्यास मदत होईल. तसेच, तुम्ही दोघे करीत असलेल्या अनावश्यक खर्चावर टाळा बसेल.

रोख पैश्यांनी खरेदी करा

तुम्ही क्रेडिट कार्डऐवजी रोख पैश्यांनी खरेदी केली, तर तुमचे पैसे वाचवण्यास खूप मदत होईल. कारण रोख हातात असल्यास, आपण एकूण किती पैसे खर्च केले, हे कळून येते. सोबतच ऑनलाईन शॉपिंग कमी करण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या जोडीदारालाही ते करायला सांगा.

शिल्लक उत्पन्न बचत करा

पती-पत्नी दोघेही नोकरी करीत असेल, तर एकाच्या पगाराने घर खर्च, इतर खर्च आणि आरोग्य विमा तसेच विमा पॉलिसीसाठी लागणारा खर्च मॅनेज करा. त्यानंतर उरलेल्या पैश्यांमधून काही रक्कम दोघांच्या वैयक्तिक खर्चासाठी बाजूला काढून ठेवा. तर दुसऱ्याच्या पगाराचा 75% भाग हा बचतीसाठी वापरा. असे केल्यास तुमचे सगळे खर्च मॅनेज होऊन, एक मोठी रक्कम तुमच्याकडे बचतीसाठी जमा होईल.

वैयक्तिक खर्च करतानाही ऑफर शोधा

तुम्ही दोघे स्वत:चा वैयक्तिक खर्च करताना देखील त्यावर काही बचत होऊ शकते का? याचा विचार करा. जसे, कपडे खरेदीला गेले असता त्यावर डिस्काउंट मिळणे, शनिवारी किंवा रविवारी बाहेर जेवायला जाण्याऐवजी इतर दिवशी गेल्यास तुम्हाला सवलत मिळेल, स्नॅक्स खायचं असल्यास ऑफर असणाऱ्या रेस्टॉरेंट किंवा कॅफे मध्ये जा.

योग्य ठिकाणी गुंतवणूक करा

तुम्ही कमावलेले कष्टाचे पैसे योग्य ठिकाणी, तज्ञांचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा. कुठेही गुंतवणूक करण्याआधी बँक, पोस्ट ऑफिस, म्युच्युअल फंड, एसआयपी, आरडी, एफडी अशा सर्व स्किम व्यवस्थित तपासा. जिथे रिस्क कमी आणि रिटर्न मिळणारा पैसा जास्त असेल, अशाच ठिकाणी पैसे गुंतवा.