Pune News: संपूर्ण जगजाहीर की पुणेरी स्वभाव! या ठिकाणी अशक्य असणाऱ्या सर्व गोष्टी घडतात. पुणेरी पाटया काय उगाच प्रसिद्ध नाही. पुणेरी टोमणे तर विचरायलाचं नको.. पुणेकर आहेच असे....लयं भारी.. अगदी त्यांच्या रोखटोक स्वभावामुळे घडले देखील असे की, जी महानगरपालिका सर्वांना बिलं पाठविते, त्याच पालिकेला पुण्यातील एका सोसायटीने सोळा लाखाचे बिल पाठविले आहे, ते का पाठविले याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
कारण काय (What is the Reason)
पुणे महानगरपालिकेच्या नियमांनुसार विना परवानगीने कुठे ही जाहिरात किंवा रंगरंगोटी केली, तर थेट पालिकेच्यावतीनेच कसला ही विलंब न करता त्वरित नोटिस येते. त्या माध्यमातून दंडच्या स्वरूपात बिलाच्या स्वरूपात एखादी मोठी रक्कमदेखील येते. पण हीच चूक केली ती पुणे महानगरपालिकेने. पुण्यातील एका सोसायटीच्या सीमा भितींवर विना परवानगी भिंत रंगवली म्हणून, सोसायटीने थेट पुणे महानगरपालिकेलाच 16 लाखाचे बिल पाठविले आहे.
पुण्यात कुठे घडले (Where did it Happen in Pune)
पुण्यामध्ये जी-20 परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेची जाहिराती जागोजागी करण्यात आली आहे. यानुसारच कोथरूड येथील स्वप्नशिल्प सोसायटीची सीमाभिंत पुणे महापालिकेने विनापरवानगी रंगवली. त्यामुळे या सोसायटीने महापालिकेला चक्क 16 लाख रूपयांचे बिल पाठवले आहे. स्वप्नशिल्प सोसायटीचे अध्यक्ष दिलीप देशपांडे यांनी 22 डिसेंबर रोजी पुणे महापालिका आयुक्त विक्रांत कुमार यांना यासंदर्भात पत्र पाठविले आहे.
महानगरपालिकेची प्रतिक्रिया (Municipal Corporation's Response)
आता पुणेकरांच्या या दणक्यासमोर महानगरपालिका पुर्णपणे झुकली आहे. महापालिकेन आपली चूक मान्य केली असून, सोसायटीची सीमाभिंत पूर्ववत करून देण्याचे आश्वासनदेखील दिले आहे. मात्र, या प्रकरणामुळे पुणेकरांच्या स्वभावाची चर्चा पुन्हा एकदा राज्यभरात चांगलीच चर्चा रंगली आहे, हे पाहायला मिळाले. सोशलमिडीयावरदेखील ही चर्चा नक्कीच रंगेन असे म्हणण्यास हरकत नाही.