Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Smartphone Launch in Jan 2023: नवीन वर्षातील पहिल्याच महिन्यात लाँच होतील 'हे' स्मार्टफोन!

Smartphone Launch in 2023

Image Source : www.notebookcheck.net

Smartphone Launch in Jan 2023: भारतात 2022 मध्येच 5G ची सेवा सुरु झाली आणि वर्षाच्या अखेरीस 5G स्मार्टफोनच्या मागणीही खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

Smartphone Launch in Jan 2023: नवीन वर्ष सुरु होऊन चक्क 2 दिवस झाले आहेत. भारतीय बाजारात मागील वर्षात अनेक वेगवेगळे स्मार्टफोन लॉन्च(Smartphone Launch) करण्यात आले होते. भारतात 2022 मध्येच 5G ची सेवा सुरु झाली आणि वर्षाच्या अखेरीस 5G स्मार्टफोनच्या मागणीही खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 2023 मध्येही अनेक वेगवेगळ्या कंपन्यांचे स्मार्टफोन लाँच होणार असून नववर्षाच्या सुरुवातीला जानेवारी(January 2023) महिन्यामध्ये लॉन्च होणाऱ्या 'या' कमाल स्मार्टफोनबद्दल चला तर जाणून घेऊयात.

रेड मी नोट 12 5G(Redmi Note 12 5G)

Redmi 5 जानेवारील नवीन 5G फोन Redmi Note 12 5G लॉन्च करणार असून कंपनीच्या मते, फोन स्नॅपड्रॅगन 4 Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज असणार आहे. फोनसह सुपर AMOLED डिस्प्ले पॅनल देण्यात येणार आहे. Redmi Note 12 5G या फोनला चार्ज करण्यासाठी 33W जलद चार्जिंग सुविधा देण्यात येत आहे. या फोमध्ये 48MP प्राथमिक कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. नुकताच हा फोन चिनी मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे.

मोटो एक्स 40(Moto X40)

Moto X40 हा फोन आता भारतात जानेवारी 2023 मध्ये लाँच करण्यात येणार आहे.  या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर आणि 60 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा सपोर्ट आहे. Moto X40 सह 12 GB पर्यंत RAM आणि 512 GB पर्यंत स्टोरेज देण्यात आलेले आहे. फोनमध्ये 12GB पर्यंत LPPDR5X RAM आणि 512 GB पर्यंत UFS 4.0 स्टोरेजसाठी जागा देण्यात आलेली आहे. Moto X40 125W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग दिले आहे. या फोनच्या बॅटरीची क्षमता 4,600mAh पर्यंत असणार आहे.

रियलमी जीटी निओ 5(Real me GT Neo 5)

रियलमीचा नवीन फ्लॅगशिप फोन रियलमी GT neo 5 जानेवारीमध्येच लॉन्च होणार असून हा फोन Snapdragon 8 Plus Gen 1 चिपसेट आणि 256GB च्या UFS 3.1 स्टोरेजसह 16GB LPDDR5 रॅमसह सुसज्ज असणार आहे. मात्र, अजून पर्यंत कंपनीने या फोनच्या लॉन्चची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. हा फोन चार्ज करण्यासाठी 240W फास्ट चार्जर वापरला जाईल. फोनला सोनी IMX890 सेन्सरसह एक प्राथमिक कॅमेरा मिळेल, जो OIS सपोर्टसह येईल. या फोनची बॅटरी क्षमता 4,600 mAh इतकी असणार आहे.

iQOO 11 5G

iQOO 11 5G  हा फोन 10 जानेवारी 2023 रोजी लाँच होणार आहे. हा फ्लॅगशिप फोन Qualcomm च्या सर्वात वेगवान Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज असणार आहे. या फोनची बॅटरी क्षमता 5000 mAh इतकी असणार आहे. फोनला 50-मेगापिक्सेल प्राइमरी कॅमेराचा सपोर्ट देण्यात आलेला असून 12 GB पर्यंत LPDDR5X रॅमसह 512 GB पर्यंत UFS 4.0 स्टोरेज सपोर्ट दिला आहे. हा फोन चार्ज करण्यासाठी 120 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टही देण्यात येत आहे.