Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Xiaomi 13 New series Launch: Xiaomi चे नवीन स्मार्टफोन्स लॉन्च, जाणून घ्या काय आहेत फीचर्स

Xiaomi 13

Image Source : www.gizmochina.com

नुकतीच Xiaomi ची नवीन स्मार्टफोन(smartphone) सीरीज लॉन्च करण्यात आली आहे. यामध्ये Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro हे दोन स्मार्टफोन बाजारात आले आहेत.

Xiaomi 13 New series Launch:    Xiaomi  ही चीनमधील सर्वात नामांकित कंपनी असून टेक्नोलॉजीच्या(technology) बाबतीत अग्रगण्य स्थानावर आहे असे म्हणणे काही चूक ठरणार नाही. चीनने नुकतेच  Xiaomi चे दोन स्मार्टफोन(smartphone) सीरीज लॉन्च केल्या आहेत. यात  Xiaomi 13  आणि  Xiaomi 13 Pro हे कंपनीचे टॉप फ्लॅगशिप फोन आहेत, ज्यामध्ये ग्राहकांना क्वालकॉमचा नवीनतम स्नॅपड्रॅगन  8 Gen 2  प्रोसेसर आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जात आहे. चला तर जाणून घेऊयात या फोन्सच्या फीचर्सबाबत.    

Xiaomi 13 Pro चे स्पेसिफिकेशन        

  • Xiaomi 13 Pro मध्ये 120 फास्ट वायर्ड आणि  50W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह  4820mAh बॅटरीची क्षमता देण्यात आली आहे. तसेच तुम्हाला  10W रिव्हर्स वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळेल 
  • या फोनमध्ये ग्राहकांना  6.73  इंच वक्र    2K(1440p)  LTPO AMOLED  डिस्प्ले, 120 Hz  रिफ्रेश रेट, 1900nits पीक ब्राईटनेस, HDR10+ डॉल्बी व्हिजन प्लेबॅकसह मिळेल
  • Snapdragon 8 Gen 2  प्रोसेसर यामध्ये देण्यात आला आहे, ज्यात  Adreno GPU सह 12 GB पर्यंत रॅम आणि 512 Gb स्टोरेज देण्यात आले आहे 
  • कॅमेराबाबतीत बोलायचे झाले तर तुम्हाला यात ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळणार आहे, ज्यामध्ये  OIS सह  50 MP  मेन सेन्सर,    50 MP  अल्ट्रावाईड सेन्सर आणि  50 MP  टेलिफोटो सेन्सर देण्यात आला आहे
  • याशिवाय फोनच्या मागील कॅमेरामध्ये  24fps वर 8k व्हिडीओ रेकॉर्डिंगची सुविधा देखील देण्यात आली आहे 

Xiaomi 13  चे स्पेसिफिकेशन        

  • Xiaomi 13 या फोनमध्ये 6.36 इंचाचा फ्लट    1080p AMOLED ( नॉन LTPO) डिस्प्ले आहे, ज्यामध्ये  120Hz रिफ्रेश रेट,    1900nits पर्यंत पीक ब्राईटनेस,  HDR10+ आणि डॉल्बी व्हिजन प्लेबॅक सपोर्ट आहे    
  • Xiaomi 13 यात Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे, ज्यामध्ये 12 GB  पर्यंत  LPDDR5X  रॅम आणि    512GB  पर्यंत UFS4.0 स्टोरेज आहे
  • या फोनमधील कॅमेराबद्दल सांगायचे झाले तर, या फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये  OIS सह  50 MP  मेन सेन्सर, 12 MP अल्ट्रावाईड - एगंल आणि  10 MP टेलिफोटो सेन्सर देण्यात आला आहे
  • Xiaomi 13  मध्ये  67W  फास्ट वायर्ड आणि 50 W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 4 500mAh बॅटरी क्षमता आहे. तसेच तुम्हाला 10 W रिव्हर्स वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळेल

काय असेल  Xiaomi 13 सीरीजची किंमत?        

  • Xiaomi 13 Pro  ची किंमत  8GB/128GB व्हेरीएंटसाठी  CNY 4,999( अंदाजे रु.  59,300),  8GB/256GB  व्हेरीएंटसाठी    CNY 5,399( अंदाजे रु. 64,000) , CNY5.799( अंदाजे रु.  65/120,120GB) त्याची किंमत CNY 6,299( अंदाजे रु. 75,000) आहे
  • Xiaomi 13 च्या  8GB/128GB व्हेरीएंटसाठी किंमत CNY 3,999( सुमारे  47, 000 रुपये ), 8GB/256GB व्हेरीएंटची किंमत  CNY 4,299 ( सुमारे  51,000 रुपये), 12GB/256GB व्हेरीएंटची किंमत CNY4,999 ( अंदाजे रु.  59,300) ठेवली आहे. हा फोन ब्लॅक , व्हाईट, ग्रीन आणि फार माउंटन ब्लू रंगामध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे