Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Market Bull : Sir Jhon Templeton, नव्वदीच्या दशकातील सर्वांत मोठा स्टॉक पिकर!

Market Bull Sir Jhon Templeton

Image Source : https://www.templeton.org/

Sir Jhon Templeton : 'जर तुम्हाला खरोखर श्रीमंत व्हायचे असेल, तर तुमच्यासाठी तुमच्या पैशांनी काम केले पाहिजे.', जॉन टेंपलटन यांचे हे वाक्य खूप काही सांगणारं आहे. आजही ट्रेडर्स त्यांच्या नियमांचा आणि वेगवेगळया फंडांचा वापर करत आहेत.

“If you want to become really wealthy, you must have your money work for you.” 

– Sir John Templeton

जर तुम्हाला खरोखर श्रीमंत व्हायचे असेल, तर तुमच्यासाठी तुमच्या पैशांनी काम केले पाहिजे 

– सर जॉन टेंपलटन

जॉन टेंपलटन (Jhon Templeton) या जगप्रसिद्ध गुंतवणूकदाराला (Investor) कोण ओळखत नाही?  बेंजामिन ग्रॅहम (Benjamin Graham)  यांच्यासारख्या गुरूंकडून ज्यांनी गुंतवणुकीचे धडे घेतले असे सर जॉन मार्क्स टेंपलटन (Sir John Marks Templeton) हे जगातले सर्वात उत्तम स्टॉक निवडणारे एकमेव इन्व्हेस्टर मानले जातात. आजच्या मार्केट बुल्समध्ये आपण जॉन टेंपलटन यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत व त्यांनी सांगितलेल्या अनेक मार्केट मंत्र (Market Mantra) समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

जॉन टेंपलटन यांचे सुरुवातीचे आयुष्य!

जॉन टेम्पलटन यांचा जन्म विंचेस्टर, टेनेसी (Winchester, Tennessee) येथील एका गावात झाला. त्यांनी आपले शिक्षण येल युनिव्हर्सिटी (Yale University) मधून पूर्ण केले होते. त्यांच्या शिक्षणाची खास बात म्हणजे त्यांनी त्यांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चातील अर्धा खर्च पोकर (Poker) गेम खेळून कमावला होता. त्यानंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून (Oxford University) शिक्षण घेऊन ते चॅटर्ड फायनाशिअल अॅनालिस्ट (CFA- Chartered Financial Analyst) बनले. जॉन टेम्पलटन हे बेंजामिन ग्रॅहम यांचे शिष्य होते आणि त्यांच्याकडून त्यांनी गुंतवणुकीचे धडे घेतले होते.

टेंपलटन यांचे इन्व्हेस्टमेंट करिअर! (Templeton’s Investment Career) 

टेंपलटन यांनी आपल्या इन्व्हेस्टमेंट करिअरची सुरुवात 1937 मध्ये वॉल स्ट्रीट (Wall Street) मध्ये दाखल झाल्यानंतर केली. 1929 मध्ये जेव्हा मार्केट कोसळले तेव्हा संपूर्ण इकॉनॉमीला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर इकॉनॉमी सतत ढासळत होती. यामुळे अनेक कंपन्यांचे स्टॉक धडाधड कोसळले होते. या परिस्थितीचे अचूक आकलन करत टेंपलटन यांनी त्यांच्या बॉसकडून 10 हजार डॉलर्स उसने घेतले आणि न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज (New York Stock Exchange) मधील 1 डॉलरपेक्षा कमी किमत असलेल्या कंपन्यांचे प्रत्येकी 100 स्टॉक्स विकत घेतले. त्यांनी एकूण 104 कंपन्यांचे स्टॉक विकते घेतले होते. त्यातील 34 कंपन्या बुडाल्या. पण US इकॉनॉमी जेव्हा स्थिरस्थावर झाली. तेव्हा टेंपलटन यांना उरलेल्या स्टॉकसमधून भरपूर फायदा झाला. त्यांनी या गुंतवणुकीतून 400 टक्के रिटर्न्स मिळवले होते. त्यांनी आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या प्रवासात कायम  एका मंत्राचा वापर केला तो म्हणजे, “बाय लो, सेल हाय” (Buy Low, Sell High).


35 देशांमधील शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक केली! (Invest in 35 Countries)

टेंपलटन यांनी स्वतःला केवळ US मार्केटपर्यंत कधीच मर्यादित ठेवले नाही. जवळजवळ 35 देश फिरून त्यांनी प्रत्येक मार्केटमध्ये गुंतवणुकीची संधी शोधली. तसेच त्यांनी सोन्यामध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. 

स्वत:च्या नावाने सुरु केला म्युच्युअल फंड! (Start Templeton Growth Fund)

शेअर मार्केटमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर टेंपलटन यांनी म्युच्युअल फंडसकडे (Mutual Funds) आपला मोर्चा वळवला. त्यांनी स्वत: अनेक जागतिक स्तरावरील वैविध्यपूर्ण म्युच्युअल फंड तयार केले. 1954 मध्ये त्यांनी स्वतःचा इन्व्हेस्टमेंट फंड सुरु केला. ज्याचे नाव टेम्पल्टन ग्रोथ फंड (Templeton Growth Fund) असे होते. टेम्पल्टन ग्रोथ फंड हा जगातील पहिला असा फंड होता; ज्याने 1960 मध्ये जपानमध्ये गुंतवणूक केली होती. या फंडाने सलग 38 वर्षे सरासरी वार्षिक 15 टक्के रिटर्न्स दिल्याचे दिसून येते. 

दि ग्रेटेस्ट स्टॉक पीकर (The Greatest Stock Picker)

टेंपलटन यांनी सुरुवातीला एक लहान इन्व्हेस्टमेंट अॅड्वायसेरी कंपनी सुरु केली होती; जी त्यावेळी फक्त 2 मिलियन डॉलर्सपर्यंत गुंतवणूक सांभाळत होती. 1959 मध्ये ही कंपनीचा टर्नओव्हर 66 मिलियन डॉलर्स पर्यंत गेला. त्यावेळी कंपनीने IPO देखील फाईल केला होता. दरम्यान, टेंपलटन यांनी या फर्मद्वारे अणुऊर्जा, रसायने आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रावर लक्ष देणारे फंडस् देखील तयार केले. पण 1992 मध्ये त्यांनी ही कंपनी फ्रँकलिन रिसोर्सस (Franklin Resources) कंपनीला 913 मिलियन डॉलर्सला विकली. त्यांच्या या इन्व्हेस्टमेंटचा प्रवास पाहून थक्क झालेल्या मनी मॅगझीनने (Money Magazine) त्यांना द ग्रेटेस्ट स्टॉक पीकर (The Greatest Stock Picker) हा किताब दिला.

टेंपलटन यांचा मार्केट मंत्रा (Templeton’s Market Mantra)

टेंपलटन नेहमी कमी किंमत आणि भरपूर मूल्य असणारे स्टॉक्स निवडत असत. ते नेहमी म्हणत असत की, “तुमच्या नवीन गुंतवणुकीच्या कल्पना नेहमी वॉच लिस्टमध्ये ठेवा किंवा घाई करण्यापूर्वी एक छोटी पोझिशन घ्या. जर हा खरोखरच चांगला सौदा असेल, तर घाई करण्याची गरज नाही. ” ज्याचा संबंध आजही पाहायला मिळतो. 

1987 मध्ये राणी एलिझाबेथ दुसरी (Queen Elizabeth II) ने त्यांना त्यांच्या अनेक परोपकारी कामगिरीबद्दल नाईट बॅचलर (Night Bachelor) म्हणून नाव दिले. आपल्या प्रदीर्घ आयुष्यात त्यांनी डझनभर पुस्तके लिहिली काही संपादित केली. 2008 मध्ये सर जॉन टेंपलटन यांचे निधन झाले. आजही ट्रेडर्स त्यांच्या नियमांचा आणि वेगवेगळया फंडांचा वापर करत आहेत.