Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Market Bull : बेंजामिन ग्रॅहम ‘द इंटेलिजन्ट इन्व्हेस्टर’

Benjamin Graham The Intelligent Investor

Image Source : www.wikipedia.com

Market Bull – Benjamin Graham : बेंजामिन ग्रॅहम यांनी ‘द इंटेलिजन्ट इन्व्हेस्टर’ (The Intelligent Investor) या पुस्तकातून इन्वेस्टिंगच्या अनेक नवनवीन संकल्पाना लोकांसमोर मांडल्या आहेत; ज्याचा वापर लोक आजही गुंतवणूक करतान दिसतात.

आपल्यापैकी अनेक जणांनी ‘द इंटेलिजन्ट इन्व्हेस्टर’ (The Intelligent Investor) हे पुस्तक शेअर मार्केटमध्ये उतरल्यानंतर नक्कीच वाचले असेल. बेंजामिन ग्रॅहम ( Benjamin Graham) यांनी लिहिलेल्या या पुस्तकात इन्वेस्टिंगच्या अनेक नव्या संकल्पाना मांडल्या आहेत; ज्याचा वापर लोक आजही गुंतवणूक करताना दिसतात. अमेरिकन इकॉनॉमिस्ट आणि इन्व्हेस्टर बेंजामिन ग्रॅहम (Benjamin Graham, American Economist & Investor) इन्वेस्टींगचे गॉडफादर (Godfather of Investment) मानले जातात. आजच्या मार्केट बुल्समध्ये आपण जाणून घेणार आहोत; मार्केटच्या या गॉडफादरची गोष्ट!

ग्रॅहम यांचा जन्म 1894 मध्ये लंडनमधील एका ज्युईश परिवारात झाला होता. ग्रॅहम 1 वर्षाचे असताना ते न्यूयॉर्कला शिफ्ट झाले. अमेरिकन समाजशैली आणि परंपरा पूर्णपणे आत्मसात (Adopt) करण्याकरता आणि सेमिटिक आणि जर्मन विरोधी भावना टाळण्याकरता त्यांच्या परिवाराने आडनाव बदलण्याचा निर्णय घेतला होता. ग्रॉसबॉम या आडनावावरून त्यांनी ग्रॅहम हे आडनाव स्वीकारले. वडील गेल्यानंतर ग्रॅहम यांनी त्यांचे फर्निचरचे दुकान सांभाळण्यास सुरुवात केली. कोलंबियातून ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वॉल स्ट्रीटमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. ग्रॅहम यांनी ‘द नॉर्दर्न पाईपलाईन अफेअर’ सर्वांसमोर आणून वॉल स्ट्रीटमध्ये आपले नाव अधोरेखित केले.

सिक्युरिटी ॲनालिसिस या नवीन संकल्पनेचा शोध!

वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत ग्रॅहम वॉल स्ट्रीटमधले एक यशस्वी इन्व्हेस्टर म्हणून ओळखले जाऊ लागले. ते वर्षाला जवळ जवळ 5 लाख डॉलर्स उत्त्पन्न घेत होते. पण हे फार काळ टिकले नाही. 1929 मध्ये झालेल्या मार्केट क्रॅशमध्ये ग्रॅहम यांची सगळी इन्व्हेस्टमेंट बुडाली. या मार्केट क्रॅशमध्ये त्यांचा जरी तोटा झाला असला तरी आपला यातून फायदाच झाला, असे ग्रॅहम यांना वाटत होते. कारण मार्केट क्रॅशमध्ये त्यांचे पैसे बुडाले. पण त्यातून त्यांना नवीन कल्पनाविष्कार झाला. या नुकसानीतून ‘सिक्युरिटी ॲनालिसिस’ या त्यांच्या पहिल्या पुस्तकाचा जन्म झाला. डेविड डॉड्ड यांच्यासोबत त्यांनी 1934 मध्ये हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात सर्वप्रथम व्हॅल्यू इन्वेस्टींगचा (Value Investing) उल्लेख केला होता. ज्यावर त्यांचे दुसरे पुस्तक ‘द इंटेलिजन्ट इन्व्हेस्टर’ हे आधारित होते.

व्हॅल्यू इन्वेस्टींग म्हणजे, अशा स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणे; ज्यामध्ये क्षमता भरपूर आहे. पण त्याची किंमत अगदी कमी असेल. ज्यावेळी शेअर मार्केटला लोक सट्टा बाजार असे म्हणत होते. तेव्हा ग्रॅहम इंट्रिनसिक व्हॅल्यू आणि मार्जिन ऑफ सेफ्टी (Intrinsic Value and Margin of Safety)  अशा नव्या संकल्पना त्यांच्या पुस्तकात मांडत होते. इंट्रिनसिक व्हॅल्यू म्हणजे आपल्या ॲसेटची व्हॅल्यू किती आहे, हे मोजणे. तर मार्जिन ऑफ सेफ्टी ही एक इन्वेस्टींग संकल्पना आहे. ज्यामध्ये सिक्युरिटीज तेव्हा विकत घेतल्या जातात; जेव्हा त्यांची किंमत त्यांच्या इंट्रिनसिक व्हॅल्यूपेक्षा कमी असते. फंडामेंटल अनालिसिसमध्ये सर्वात महत्त्वाच्या असणाऱ्या या संकल्पना ग्रॅहम यांनी आपल्या सिक्युरिटी ॲनालिसिस पुस्तकात सविस्तरपणे समजावून सांगितल्या आहेत. ग्रॅहम आणि डॉड्ड यांच्या मते व्हॅल्यू इन्वेस्टींगमुळे स्टॉक मार्केटमध्ये असलेल्या किमतीकडे दुर्लक्ष करूनही त्या स्टॉकची इंट्रेसिंक व्हॅल्यू काढता येते. कंपनीचे ॲसेट्स, कंपनीची एकूण कामे आणि कंपनी किती डिव्हिडंट देते अशा अनेक घटकांवरून कंपनीच्या स्टॉकची इंट्रेसिंक व्हॅल्यू काढली जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले. जर निघालेली इंट्रेन्सिक व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यूपेक्षा कमी असेल तर तो स्टॉक नक्की घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.

द इंटेलिजन्ट इन्व्हेस्टर!

The Intelligent Investor

1949 मध्ये ग्रॅहम यांनी ‘द इंटेलिजन्ट इन्व्हेस्टर’ हे पुस्तक लिहिले. जगभरात मार्केटचे बायबल मानले जाणाऱ्या या पुस्तकात मिस्टर मार्केट या काल्पनिक पात्राच्या मदतीने त्यांनी अनेक मार्केट मंत्र दिले आहेत. मिस्टर मार्केट हे इन्वेस्टरचे काल्पनिक बिजनेस पार्टनर असतात. जे इन्वेस्टरकडून दररोज शेअर्सची खरेदी-विक्री करत असतात. मिस्टर मार्केट हे तर्कहीन तर असतात; पण ते नेहमी स्वतःच्या मूडनुसार वेगवेगळ्या किमती ठरवून इन्व्हेस्टरकडे शेअर्स  घेऊन येत असतात. ग्रॅहम सांगतात की, मार्केट नेहमी अस्थिर असते व यामागे इन्वेस्टरची भीती व भूक हे कारणीभूत असतात. मार्केटच्या भावनेनुसार चालण्यापेक्षा इन्वेस्टरने स्वतःच कंपनीचे ॲनालिसिस करून स्टॉक ॲनालाईज करून गुंतवणूक केली पाहिजे. या ॲनालिसिसमुळे मिस्टर मार्केटने केलेल्या कोणत्याही ऑफरमध्ये न अडकता इन्व्हेस्टमेंट करणे शक्य होते.


ग्रॅहम यांच्या मते इंटेलिजन्ट इन्व्हेस्टर तो आहे जो एका निराशावादी इन्व्हेस्टरकडून स्टॉक विकत घेऊ शकतो व एका आशावादी इन्व्हेस्टरला स्टॉक विकू शकतो. आर्थिक मंदी, बाजारातील क्रॅश, वेगवेगळ्या घटना व त्यांच्या बातम्या, तात्पुरती नकारात्मक प्रसिद्धी आणि मानवी चुका इत्यादी घटकांमुळे स्टॉकची किंमत वर खाली होते. अशावेळी जेव्हा किंमत खाली असते तेव्हा स्टॉक विकत घेऊन किंमत वर गेल्यावर स्टॉक विकला पाहिजे. मार्केटमध्ये जेव्हा अशा सोप्या संधी तयार होताना दिसतात. तेव्हा इन्वेस्टरने त्यात उडी मारून फायदा मिळवला पाहिजे, असे ग्रॅहम म्हणतात. सिक्युरिटी ॲनालिसिस मधील फंडामेंटल ॲनालिसिसच्या अनेक धड्यांची थोडक्यात माहिती या पुस्तकात दिली आहे. जुन्या धड्यांसोबत इन्वेस्टर्सना नवे धडे देखील ग्रॅहम यांनी या पुस्तकातून दिले आहेत.

ग्रॅहम यांनी शेअर मार्केटमधील ॲनालिसिसबाबत भरपूर महत्त्वाची भूमिका बजावली आहे व त्यांनी दिलेल्या माहितीचे महत्त्वही मार्केटमध्ये खूप जास्त आहे. यामुळे अनेक गुंतवणूकदार मोठे झाले आहेत. यातील एक म्हणजे वॉरेन बफेट (Warren Buffett); ग्रॅहम यांचे शिष्य असलेले वॉरेन बफेट आजही नव्या गुंतवणूकदारांना हे पुस्तक नक्की वाचण्यास सांगतात. तुम्हालाही वेळ मिळाला तर नक्की हे पुस्तक वाचा.