प्रत्येकाला वाटत असतं की, आपणही एक दिवशी करोडपती व्हावं. पण खरंच करोडपती होता येतं का? म्हणजे सर्वसामान्यांना ते शक्य आहे का? असा तुम्हालादेखील प्रश्न पडला असेल ना! पण याचं उत्तर होय असंच आहे.
जर तुम्हाला ही येणाऱ्या 10 वर्षात करोडपती व्हाययचं असेल तर त्याची सुरूवात तुम्हाला आजपासून करावी लागणार आहे. कारण अनेक गुंतवणूक सल्लागारांचे असे मत आहे की, तुम्हीदेखील करोडपती होऊ शकता. पण त्यासाठी तुम्ही सातत्याने गुंतवणूक करत राहणे गरजेचे आहे आणि त्यात कोणताही खंड नसावा. ही गुंतवणूक तुम्ही जर दीर्घकाळासाठी सुरू ठेवली तर नक्कीच तुम्हीसुद्धा काही वर्षात करोडपती होऊ शकता.
गुंतवणुकीसाठी मार्केटमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यातील आपण एसआयपी म्हणजेच सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनबद्दल तपशिलाने जाणून घेणार आहोत. ज्याच्या मदतीने आपल्याला करोडपतीचा टप्पा गाठायचा आहे. दीर्घकाळासाठी गुंतवणूक करत असताना सातत्यपूर्ण गुंतवणूक हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे. कारण यातूनच्या तुमच्या एकूण गुंतवणुकीत वाढ होण्यास मदत होणार आहे.
महागाई आणि रुपयाचं अवमूल्यांकन लक्षात घ्या!
लॉन्ग टर्म कालावधीसाठी गुंतवणूक करत असताना दोन गोष्टींवर प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे महागाई, जी दिवसेंदिवस वाढत जाते आणि दुसरी म्हणजे रुपयांचं होणारं अवमूल्य. या दोन गोष्टींचा गुंतवणुकीवर परिणाम होत असतो. यामध्ये जर काही गडबड झाली तर तुमच्या गुंतवणुकीतील नफ्यावरही त्याचा परिमाण लगेच दिसून येतो. यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. ते होऊ नये यासाठी गुंतवणूक करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
एसआयपी हे या दोन्ही प्रश्नांचे उत्तर ठरू शकते. एसआयपीमधील नियमित गुंतवणुकीमुळे आणि त्यावर मिळणाऱ्या चक्रवाढ व्याजामुळे (Power of Compounding) तुमच्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्यात या दोन्ही गोष्टींची आपोआप काळजी घेतली जाते. परिणामी दीर्घकाळात तुमच्या गुंतवणुकीतून तुम्हाला भरघोस असा परतावा मिळू शकतो. तर अशाप्रकारे तुम्हाला अवघ्या 10 वर्षात करोडपती व्हायचं असेल तर, प्रत्येक महिन्याला किती रुपयांची एसआयपी करावी लागेल. हे आपम समजून घेणार आहोत.
10 वर्षात करोडपती व्हा!
जर तुम्ही पारंपरिक योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तिथे तु्म्हाला किमान 8 टक्के परतावा मिळेल. त्यानुसार तुम्हाला प्रत्येक महिन्याला 5,42,999 रुपयांची एसआयपी करावी लागेल. तेव्हा 10 वर्षांनी तुमच्याकडे 1 कोटी रुपये जमा होतील. पण तुम्ही म्युच्युअल फंडमधील इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार केला तर, तिथे तुम्हाला 12 ते 15 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.
Mutual Fund SIP Calculator
आपण 12 टक्के परतावा अपेक्षित धरून 10 वर्षांपर्यंत गुंतवणूक करण्याचा विचार केला तर, साधारण प्रत्येक महिन्याला 45,000 रुपयांची एसआयपी करावी लागेल. तेच 10 टक्क्यांचा परतावा गृहित धरल्यास प्रत्येक महिन्याला 49,000 रुपयांची एसआयपी करावी लागेल आणि सर्वांधिक 15 टक्क्यांचा परतावा गृहित धरला तर प्रत्येक महिन्याला 36,000 रुपयांची एसआयपी करावी लागेल. तर अशाप्रकारे तुम्ही प्रत्येक महिन्याच्या गुंतवणुकीतून 10 वर्षात करोडपती होण्याचे टार्गेट निश्चित करू शकता.
(डिसक्लेमर : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)