Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SIP Calculator - Systematic Investment Plan Calculator Online in Marathi

मासिक गुंतवणूक
अपेक्षित परतावा दर
%
कालावधी
Yr
गुंतवणूक केलेली रक्कम
अंदाजे परतावा
एकूण मूल्य

 

MahaMoney SIP Calculator कसा वापरायचा? त्याचे फायदे काय?

म्युच्युअल फंडातली गुंतवणूक दोन प्रकारची असते. एकतर तुम्ही एकगठ्ठा ठरावीक रक्कम तुमच्या पसंतीच्या एखाद्या फंडात गुंतवू शकता. किंवा दर महिन्याला ठरावीक रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवण्याची सोय एका कराराद्वारे करू शकता. यातल्या दुसऱ्या प्रकाराला SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान असं म्हणतात.

दोन्ही प्रकारच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे स्वतंत्र फायदे - तोटे आहेत. आणि त्याविषयीची माहिती तुम्ही महामनी डॉट कॉमवर या लेखात घेऊ शकता.

https://mahamoney.com/mutual-fund-lumpsum-vs-sip-what-is-more-profitable

इथं बघूया म्युच्युअल फंडात SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करायची असल्यास ठरावीक वर्षांनी तुम्हाला किती रक्कम मिळणार हे गणित कसं समजून घ्यायचं. त्यासाठी आहे महामनी सिप कॅल्क्युलेटर (MahaMoney SIP Calculator)

महामनी SIP कॅल्क्युलेटरचे फायदे

महामनी SIP कॅल्क्युलेटर म्हणजे, सोप्या आणि वापरायला सुटसुटीत साधनाचा वापर करून तुम्ही म्युच्युअल फंडात केलेल्या (किंवा करू इच्छित असलेल्या) गुंतवणुकीवर ठरावीक कालावधीनंतर तुम्हाला नेमका किती परतावा मिळू शकेल आणि तुमच्याकडे एकूण किती निधी जमा होऊ शकेल याचा घेतलेला अंदाज.

या कॅल्क्युलेटरच्या मदतीने तुम्ही म्युच्युअल फंडातल्या तुमच्या गुंतवणुकीचं जास्त चांगलं नियोजन करू शकता. ठरावीक निधी जमा करण्यासाठी किती रकमेची SIP करणं गरजेचं आहे याचा नेमका अंदाज यातून तुम्हाला येईल. तसंच नियमित गुंतवणुकीतून ठरावीक कालावधीनंतर तुमच्याकडे किती निधी जमा होऊ शकतो याचा आढावाही तुम्हाला घेता येईल. या कॅल्क्युलेटरचे फायदे बघूया,


महामनी SIP कॅल्क्युलेटर कसा वापरायचा?

प्रत्येक घटकाखाली दिलेली निळी रेषा हलवून तुम्ही नेमका आकडा निवडू शकता. किंवा चौकटीत तुमचा आकडा लिहा

Step 1 : म्युच्युअल फंडात दर महिन्याला तुम्ही करू इच्छित असलेला किंवा केलेल्या गुंतवणुकीचा आकडा लिहा  

Step 2 : तुम्हाला अपेक्षित असलेला परताव्याचा दर लिहा

Step 3 : आणि तिसऱ्या टप्प्यात तुमच्या गुंतवणुकीची मुदत किंवा एकूण कालावधी लिहा

ही माहिती भरलीत की, खाली तुम्ही गुंतवलेली रक्कम, त्यावर अपेक्षित व्याजदराने परतावा आणि त्यानुसार ठरावीक मुदतीनंतर संकलित होणारा एकूण निधी अशी सर्व माहिती तुम्हाला मिळेल.


महामनी SIP कॅल्क्युलेटरसाठी वापरलेलं सूत्र

जगभरातल्या इतर म्युच्युअल फंड योजनांप्रमाणेच भारतातही चक्रवाढ पद्धतीने व्याज लागू होतं. आणि त्यासाठीचं गणिती सूत्र आहे,

M = P × ( { [1 + i] ^ n – 1} / i ) × (1 + i).

इथं M म्हणजे निर्धारित कालावधीनंतर तुमच्याकडे जमा होणारा एकूण निधी

P: तुम्ही दर महिन्याला गुंतवलेली रक्कम (SIP रक्कम)

I: व्याजदर  

N: किती वेळा SIP केली ती संख्या

म्युच्युअल फंडात SIP माध्यमातून गुंतवणूक

ही सगळी गणितं मांडताना एक लक्षात घेतलं पाहिजे की, म्युच्युअल फंडातल्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा हा फंडाच्या शेअर बाजारातल्या कामगिरीवर अवलंबून असतो. त्यामुळे म्युच्युअल फंडातली गुंतवणूक ही जोखमीची मानली जाते.

पण, तरीही म्युच्युअल फंडात गुंतवणुकीकडे तरुणांचा ओढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याचं कारण, या गुंतवणुकीवर मिळणारा घसघशीत परतावा. महागाईत वाढ होत असताना, महागाई दरापेक्षा जास्त परतावा देण्याची क्षमता म्युच्युअल फंडात आहे. आणि शिवाय शेअर बाजारात प्रत्यक्ष केलेल्या गुंतवणुकीपेक्षा इथं जोखीम कमी आहे.

कारण, म्युच्युअल फंड योजनेत काम करणारे तज्ज्ञ तुमचा पैसा तुमच्या वतीने शेअर बाजारात गुंतवतात. आणि फंडाला झालेला फायदा हा गुंतवणूकदारांमध्ये वाटून देतात. म्युच्युअल फंडाचे विविध प्रकार आणि त्यामध्ये कशी गुंतवणूक करायची याविषयीची माहिती या लिंकमध्ये तुम्ही पाहू शकता.

https://mahamoney.com/mutual-fund-how-do-mutual-funds-work

https://mahamoney.com/what-is-mutual-fund

 

SIP पद्धतीने गुंतवणुकीचे फायदे

SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान किंवा म्युच्युअल फंडात नियमित आणि पद्धतशीर गुंतवणूक. या पद्धतीमध्ये दर महिन्याला एका ठरावीक तारखेला तुमच्या बँक खात्यातून पूर्व निर्धारित रक्कम वळवून ती म्युच्युअल फंडाच्या एखाद्या योजनेत गुंतवली जाते. आणि गुंतवणुकीचं हे सत्र दर महिन्याला सुरू राहतं. किती कालावधीची गुंतवणूक करायची हे तुम्हाला SIP सुरू करताना एकदा ठरवता येतं. आणि त्यात कधीही बदलही करता येतो.

SIP पद्धतीने गुंतवणूक ही म्युच्युअल फंडातील एक लोकप्रिय गुंतवणुकीची पद्धत आहे. याला कारण आहे गुंतवणुकीतली लवचिकता आणि नियमितता. SIP गुंतवणुकीचे काही फायदे त्यासाठी पाहूया,

नियमित गुंतवणूक : दीर्घ काळात मोठा निधी, संपत्ती जमा करायची असेल तर त्यासाठी शिस्त हवी आणि नियमितता हवी असं अर्थतज्ज्ञ सांगतात. आणि SIP माध्यमातून या दोन्ही सवयी अंगी बाणवता येतात. दर महिन्याला खात्यातून रक्कम वळवली जात असल्यामुळे यात शिस्तही आली आणि नियमितताही. अशी गुंतवणूक 10 वर्षांपेक्षा जास्त काळ केली तर त्यातून महागाई दरापेक्षा जास्त परतावा गुंतवणूकदारांना मिळाला आहे.

एकगठ्ठा पैसे उभे करण्याचा त्रास नाही : एकगठ्ठा पैसे गुंतवताना तेवढं भांडवल हाताशी असणं जरुरीचं असतं. याउलट म्युच्युअल फंडातली गुंतवणूक 500 रुपयांच्या SIP पासून सुरू करता येते. वर्षाला एकदाच 6,000 रुपये वेगळे काढण्यापेक्षा दर महिन्याला 500 रुपये जात असल्यामुळे खिशावर ताण पडत नाही. 500 रुपयांपासून ते पुढे तुम्हाला शक्य असलेली रक्कम दर महिन्याला तुम्ही गुंतवू शकता. आणि गुंतवणुकीत बदलही करू शकता.

शेअर बाजारातल्या उतार - चढावांचा धोका कमी : म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा SIP हा प्रभावी मार्ग समजला जातो. याचं कारण, एकगठ्ठा पैसे गुंतवलेत तर तेव्हाच्या शेअर बाजाराच्या स्थितीप्रमाणे तुम्हाला युनिट्स मिळतात. तुमच्या गुंतवणुकीचं मूल्य शेअर बाजाराच्या कामगिरीवर ठरत असतं. आणि शेअर बाजार वर असेल तर तुमचं मूल्यही वाढणं अपेक्षित असतं. तसंच शेअर बाजार खाली असेल तर गुंतवणुकीचं मूल्य कमी होतं. (नेहमीच असं होईल असं नाही. पण, म्युच्युअल फंडातली गुंतवणूक शेअर बाजाराच्या कामगिरीवर नक्कीच अवलंबून असते) अशावेळी दर महिन्याला गुंतवणूक करत असाल तर शेअर बाजारातला उतार - चढावांची जोखीम कमी करता येते. एकाच वेळी गुंतवणूक करताना ही जोखीम तेव्हाच्या शेअर बाजाराच्या स्थितीनुसार कमी किंवा जास्त होते. नियमित गुंतवणुकीतून तुम्ही जोखमही अ‍ॅव्हरेज आऊट होते

 गुंतवणुकीत विविधता शक्य : हा SIP गुंतवणुकीतला सगळ्यात मोठा फायदा आहे. तुम्ही एकाच वेळी अनेक म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. म्युच्युअल फंडांचेही प्रकार आहेत. या लिंकमध्ये तुम्ही ते सविस्तर पाहू शकता. https://mahamoney.com/what-is-mutual-fund अशावेळी तुम्ही 4 किंवा 5 प्रकारच्या म्युच्युअल फंड योजना निवडून त्यात छोट्या - छोट्या SIP सुरू करू शकता. याचा फायदा हा की, शेअर बाजार वर असताना इक्विटी फंड तुम्हाला फायदा मिळवून देतील. तर बाजार खाली असताना डेब्ट फंड. आणि तुम्ही दोन्ही प्रकारच्या फंडात नियमित गुंतवणूक करत असल्यामुळे तुमचं गुंतवणुकीचं मूल्य सरासरी वाढतच राहील. अर्थात, फंड निवडताना आणि गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक तज्ज्ञांचा नक्की सल्ला घ्या.

म्युच्युअल फंडातून कर बचतही शक्य : ELSS प्रकारच्या म्युच्युअल फंडात केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला कर बचत आणि कर वजावटही शक्य होते. त्याविषयीची माहिती इथं पाहा. https://mahamoney.com/how-are-mutual-fund-investments-tax-deductible

आणि म्युच्युअल फंडातल्या गुंतवणुकीवर नेमका किती कर लागतो. आणि गुंतवणूक कशी काढून घ्यायची तसंच परताव्यावर किती कर लागू शकतो हे समजून घेण्यासाठी mahamoney.com साईटला नक्की भेट द्या.

 

 

 

महामनीचे इतर कॅल्क्युलेटर
PPF Calculator
NPS - National Pension Scheme 
Home Loan EMI  Calculator
EPF - Calculator
Lumsum - Mutual Funds Calculator