Aren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
NPS Calculator - National Pension Scheme calculator Online in Marathi
NPS Calculator कसा वापरायचा? त्याचे फायदे काय?
नॅशनल पेन्शन स्कीम अर्थात राष्ट्रीय पेन्शन योजनेत गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी महामनी डॉट कॉमने हा NPS कॅल्क्युलेटर आणला आहे. त्याच्या मदतीने तुम्ही तुमचं निवृत्तीसाठीचं आर्थिक नियोजन चोख करू शकता.
NPS मध्ये तुम्ही करत असलेल्या किंवा करणार असलेल्या गुंतवणुकीतून 60व्या वर्षी तुम्हाला नेमका किती भविष्यनिर्वाह निधी जमा करता येईल याचा अंदाज या कॅल्क्युलेटरमधून तुम्हाला येईल. किंवा एक ठरावीक निधी जमा करण्यासाठी दरमहा किती गुंतवणूक लागेल याचा अंदाजही तुम्ही घेऊ शकता.
महामनी NPS कॅल्क्युलेटरचे फायदे
निवृत्ती नंतरच्या आर्थिक नियोजनासाठी नेमकेपणाने मदत करणारं साधन. ठरावीक निधी जमा करण्यासाठी दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल याचा अंदाज यातून तुम्हाला येईल
- निवृत्ती नंतर तुम्हाला नेमकं किती पेन्शन मिळू शकेल याचा अचूक अंदाज तुम्हाला येईल
- त्याचबरोबर निवृत्तीच्या वेळी तुमच्याकडे किती निधी जमा झालेला असेल याचा अंदाजही तुम्हाला मिळेल
- हा कॅल्क्युलेटर वापरायला सोपा आणि सुटसुटीत आहे
- कॅल्क्युलेटर हे यंत्र असल्यामुळे गणिती आकडेमोडीत चूक होण्याची शक्यता नाही. एरवी NPS निधीचा अंदाज बांधणं आणि त्यासाठी आकडेमोड करणं जिकिरीचं आणि किचकट काम आहे.
महामनी NPS कॅल्क्युलेटर कोण वापरू शकतं?
निवृत्ती नंतरचं आर्थिक नियोजन करू इच्छिणारे तसंच NPS मध्ये गुंतवणूक करू इच्छिणारे सर्व लोक हा कॅल्क्युलेटर वापरू शकता. भारतात NPS मध्ये गुंतवणूक करण्याचं वय 18 ते 60 वर्षं इतकं आहे.
महामनी NPS कॅल्क्यलेटर कसा वापरायचा?
प्रत्येक घटकाखाली दिलेली निळी रेषा हलवून तुम्ही नेमका आकडा निवडू शकता
Step 1 : सगळ्यात आधी तुम्हाला दरमहा किती रक्कम गुंतवायची आहे तो आकडा निवडा
Step 2 : पुढे NPS मधल्या गुंतवणुकीवरचा अंदाजे व्याजदर निवडा
Step 3 : आणि तिसऱ्या टप्प्यात तुमचं वय सांगा (किंवा ज्या वयात तुम्ही गुंतवणूक सुरू केलेली असेल तो वयाचा आकडा लिहा)
ही माहिती भरलीत की, खाली तुम्ही गुंतवलेली रक्कम, त्यावर अपेक्षित व्याज आणि NPS मध्ये संकलित होणारा एकूण निधी अशी सर्व माहिती तुम्हाला मिळेल.
पेन्शन निधी ठरवण्यासाठी वापरलेलं सूत्र
जगभरातल्या इतर पेन्शन योजनांप्रमाणेच भारतातही NPS वर चक्रवाढ पद्धतीने व्याज लागू होतं. आणि त्यासाठीचं गणिती सूत्र आहे,
A = P (1 + r/n) ^ nt
इथं A म्हणजे एकूण जमलेला निधी.
P: मुद्दल
R: वार्षिक व्याजदर
N: वर्षातून कितीवेळा व्याज मोजलं जातं
T: एकूण मुदत
NPS योजनेविषयी थोडक्यात
NPS किंवा नॅशनल पेन्शन स्कीम ही केंद्रसरकारने सुरू केलेली पेन्शन योजना आहे. यातला सहभाग ऐच्छिक आहे. म्हणजे या योजनेतली गुंतवणूक सक्तीची नाही. पण, 18 ते 60 वयोगटातले भारतीय स्वेच्छेनं खातं उघडून या योजनेत गुंतवणूक करू शकतात. नियमित गुंतवणुकीतून निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी आर्थिक नियोजन शक्य व्हावं यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
NPS च्या सरकारी वेबसाईटवर या योजनेची उद्दिष्टं सांगताना, ‘लोकांनी नियमित गुंतवणुकीची सवय बाणवावी,’ तसंच ‘उतार वयात नियमित पेन्शनची सोय व्हावी,’ ही उद्दिष्टं नमूद करण्यात आली आहेत.
NPS अंतर्गत झालेली गुंतवणूक एकत्र करून ती मध्यवर्ती पेन्शन फंडात जमा केली जाते. आणि PFRDA (पेन्शन फंड नियामक विकास प्राधिकरण) या संस्थेकडून हा निधी सांभाळला जातो. या संस्थेतले तज्ज्ञ गुंतवणूकदार सरकारमान्य योजनांमध्ये या निधीची गुंतवणूक करतात. आणि वर्षातून तीनदा तुम्ही गुंतवलेल्या आणि तुमच्या खात्यात एकूण जमा झालेल्या रकमेवर व्याज दिलं जातं. हा व्याजदर अर्थ मंत्रालयाकडून निर्धारित केला जातो. दरवर्षी या व्याजदराचा फेरआढावा घेण्यात येतो.
तुमच्या निवृत्तीच्या वयानंतर जमा झालेल्या निधीनुसार तुम्हाला दर महिन्याला पेन्शन लागू होते. या व्यतिरिक्त अलीकडे झालेल्या बदलानुसार, NPS खात्याची मुदत संपल्यावर तुमच्याकडे इतरही दोन पर्याय आहेत. जमा झालेल्या निधीपैकी काही रक्कम तुम्ही एकगठ्ठा काढून घेऊ शकता. आणि दुसरा पर्याय म्हणजे PFRDA ने प्रमाणित केलेल्या आयुर्विमा कंपन्यांमध्ये तुमची सर्व NPS रक्कम गुंतवून त्यावर दरवर्षी ठरावीक रक्कम मिळवू शकता. याला लाईफ अॅन्युटी
असं म्हणतात. आणि हा फायदा तुम्हाला आजीवन मिळतो.
NPS मध्ये गुंतवलेल्या रकमेवर आणि परताव्यावर तुम्हाला कर बचतीचा फायदाही मिळतो.
याशिवाय NPS विषयीची इतर माहिती तुम्ही या लिंकमध्ये पाहू शकता.
https://mahamoney.com/understand-the-national-pension-scheme-for-post-retirement-planning