Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Lumpsum Calculator - Lumpsum Investment Plan Calculator Online in Marathi

एकूण गुंतवणूक
अपेक्षित परतावा दर
%
कालावधी
Yr
एकूण गुंतवणूक
अंदाजे परतावा
एकूण मूल्य

 

MahaMoney Lumpsum Calculator कसा वापरायचा? त्याचे फायदे काय?

म्युच्युअल फंडातली गुंतवणूक दोन प्रकारची असते. एकतर तुम्ही एकगठ्ठा ठरावीक रक्कम तुमच्या पसंतीच्या एखाद्या फंडात गुंतवू शकता. किंवा दर महिन्याला ठरावीक रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवण्याची सोय एका कराराद्वारे करू शकता. यातल्या दुसऱ्या प्रकाराला SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान असं म्हणतात.

दोन्ही प्रकारच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे स्वतंत्र फायदे - तोटे आहेत. आणि त्याविषयीची माहिती तुम्ही महामनी डॉट कॉमवर या लेखात घेऊ शकता.

https://mahamoney.com/mutual-fund-lumpsum-vs-sip-what-is-more-profitable

इथं बघूया म्युच्युअल फंडात एकगठ्ठा गुंतवणूक करायची असल्यास ठरावीक वर्षांनी तुम्हाला किती रक्कम मिळणार हे गणित कसं समजून घ्यायचं. त्यासाठी आहे महामनी लम्पसम कॅल्क्युलेटर (MahaMoney Lumpsum Calculator)

 

महामनी Lump Sum कॅल्क्युलेटरचे फायदे

महामनी लम्पसम कॅल्क्युलेटर या सोप्या आणि वापरायला सुटसुटीत साधनामुळे तुम्ही म्युच्युअल फंडात केलेल्या (किंवा करू इच्छित असलेल्या) गुंतवणुकीवर ठरावीक कालावधीनंतर तुम्हाला नेमका किती परतावा मिळू शकेल आणि तुमच्याकडे एकूण किती निधी जमा होऊ शकेल याचा घेतलेला अंदाज.

या कॅल्क्युलेटरच्या मदतीने तुम्ही म्युच्युअल फंडातल्या तुमच्या गुंतवणुकीचं जास्त चांगलं नियोजन करू शकता. या कॅल्क्युलेटरचे फायदे बघूया,

गुंतवणूक परताव्याचा सर्वात अचूक अंदाज - गुंतवणूक करताना आपला महत्त्वाचा प्रश्न असतो की, ठरावीक कालावधीनंतर या गुंतवणुकीतून नेमका किती निधी जमा होईल. एकूण निधीचा अंदाज घेण्यासाठी हा कॅल्क्युलेटर खूप उपयोगाचा आहे. आणि कागदावर आपण ही आकडेमोड करणं खूपच जिकिरीचं आहे. याउलट यंत्राच्या मदतीने आपण बिनचूक हा अंदाज मांडू शकतो.

सुटसुटीत वापर - महामनी लम्पसम कॅल्क्युलेटर हा ऑनलाईन उपलब्ध आहे. महामनी वेबसाईटवर या कॅल्क्युलेटरच्या पेजवर गेलात की, लगेच तुम्ही याचा वापर करू शकाल. आणि तुमचा अंदाजे परतावा त्वरित तुम्हाला मिळेल. हा कॅल्क्युलेटर वापरायला अत्यंत सोपा आहे.

गणिती आकडेमोड सोपी होते - एरवी मोठ्या कालावधीची गणितं करणं किंवा कागदावर, तोंडी आकडेमोड करणं सोपं नाही. पण, यंत्राच्या मदतीने हे आकडेवारी सोपी होते. हा कॅल्क्युलेटरचा फायदा आहे. शिवाय तुम्ही करणार असलेल्या गुंतवणुकीतून 1, 2, 5 अशा विविध कालावधीत तुम्हाला किती परतावा मिळू शकेल याचा अंदाज या कॅल्क्युलेटरमधून तुम्हाला येईल.

 

महामनी Lumpsum कॅल्क्युलेटर कसा वापरायचा?

प्रत्येक घटकाखाली दिलेली निळी रेषा हलवून तुम्ही नेमका आकडा निवडू शकता. किंवा चौकटीत तुमचा आकडा लिहा

Step 1: म्युच्युअल फंडात तुम्ही करू इच्छित असलेला किंवा केलेल्या गुंतवणुकीचा आकडा लिहा  

Step 2: तुम्हाला अपेक्षित असलेला परताव्याचा दर लिहा

Step 3: आणि तिसऱ्या टप्प्यात तुमच्या गुंतवणुकीची मुदत किंवा एकूण कालावधी

ही माहिती भरलीत की, खाली तुम्ही गुंतवलेली रक्कम, त्यावर अपेक्षित व्याजदराने परतावा आणि त्यानुसार ठरावीक मुदतीनंतर संकलित होणारा एकूण निधी अशी सर्व माहिती तुम्हाला मिळेल.


महामनी Lumpsum कॅल्क्युलेटरसाठी वापरलेलं सूत्र

जगभरातल्या इतर म्युच्युअल फंड योजनांप्रमाणेच भारतातही चक्रवाढ पद्धतीने व्याज लागू होतं. आणि त्यासाठीचं गणिती सूत्र आहे,

A = P (1 + r/n) ^ nt

इथं A म्हणजे एकूण जमलेला निधी.

P: मुद्दल

R: वार्षिक व्याजदर

N: वर्षातून कितीवेळा व्याज मोजलं जातं

T: एकूण मुदत

म्युच्युअल फंडातील एकगठ्ठा गुंतवणूक

ही सगळी गणितं मांडताना एक लक्षात घेतलं पाहिजे की, म्युच्युअल फंडातल्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा हा फंडाच्या शेअर बाजारातल्या कामगिरीवर अवलंबून असतो. त्यामुळे म्युच्युअल फंडातली गुंतवणूक ही जोखमीची मानली जाते.

पण, तरीही म्युच्युअल फंडात गुंतवणुकीकडे तरुणांचा ओढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याचं कारण, या गुंतवणुकीवर मिळणारा घसघशीत परतावा. महागाईत वाढ होत असताना, महागाई दरापेक्षा जास्त परतावा देण्याची क्षमता म्युच्युअल फंडात आहे. आणि शिवाय शेअर बाजारात प्रत्यक्ष केलेल्या गुंतवणुकीपेक्षा इथं जोखीम कमी आहे.

कारण, म्युच्युअल फंड योजनेत काम करणारे तज्ज्ञ तुमचा पैसा तुमच्या वतीने शेअर बाजारात गुंतवतात. आणि फंडाला झालेला फायदा हा गुंतवणूकदारांमध्ये वाटून देतात. म्युच्युअल फंडाचे विविध प्रकार आणि त्यामध्ये कशी गुंतवणूक करायची याविषयीची माहिती या लिंकमध्ये तुम्ही पाहू शकता.

https://mahamoney.com/mutual-fund-how-do-mutual-funds-work

https://mahamoney.com/what-is-mutual-fund

 

 

 

महामनीचे इतर कॅल्क्युलेटर
PPF Calculator
NPS - National Pension Scheme 
Home Loan EMI  Calculator
SIP - Mutual Funds Calculator
EPF - Calculator