Income Tax benefits: सरकारने इन्कम टॅक्स कायद्यांतर्गत वेगवेगळ्या तरतुदींखाली करदात्याला गुंतवणुकीतून टॅक्स बेनिफिट मिळावा म्हणून काही सवलती दिल्या आहेत. त्यात म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचाही समावेश आहे. पण तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली म्हणजे तुम्हाला टॅक्स लागणार नाही, असे नाही. यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरही टॅक्स भरावा लागतो. फक्त हे ठरवताना तुम्ही म्युच्युअल फंडमधील कोणत्या योजनेमध्ये गुंतवणूक केली आहे. किती काळासाठी केली आहे आणि त्यातून किती पैसे काढले, यावर अवलंबून असते.
गुंतवणूकदार गुंतवणूक करताना बऱ्याचदा गुंतवणुकीतून किती टॅक्स बेनिफिट मिळू शकतो किंवा मिळतो की नाही. याचा विचार न करता गुंतवणूक करत असतो. परिणामी त्याला वर्षाच्या शेवटी अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वच योजनांमधून गुंतवणूकदाराला टॅक्समध्ये सवलत मिळत नाही. म्युच्युअल फंडमधील ईएलएसएस फंड हा असाच एक प्रकार आहे. ज्याद्वारे गुंतवणूक केल्यास टॅक्समध्ये सवलत मिळते. ईएलएसएस फंडला इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS) म्हणतात.
Table of contents [Show]
ईएलएसएस फंड काय आहेत?
ईएलएसएस फंड हे इक्विटी फंड आहेत. त्याला टॅक्स सेव्हिंग फंड असेही म्हटले जाते. या योजनेला इन्कम टॅक्स कायद्यातील सेक्शन 80C अंतर्गत 1.50 लाखांपर्यंतची कर सवलत घेण्याची तरतूद आहे. या योजनेला 3 वर्षांचा लॉक-इन कालावधी आहे. म्हणजे गुंतवणूक केल्यापासून 3 वर्षापर्यंत गुंतवणूकदार यातून पैसे काढू शकत नाही. तसेच गुंतवणुकीचे 3 वर्षे पूर्ण झाल्यानंतर या योजनेतून जो काही लाभ मिळतो. तो लॉन्ग टर्म कॅपिटल गेन (LTCG) मानला जातो आणि त्यावर 10 टॅक्स आकारला जातो.
2023 Best ELSS: 2023 मधील बेस्ट टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड
ईएलएसएस म्युच्युअल फंडची वैशिष्ट्ये काय?
- ईएलएसएस फंडमध्ये केलेल्या गुंतवणुकीपैकी किमान 65 टक्के रक्कम इक्विटी किंवा इक्विटीशी संबंधित योजनांमध्ये गुंतवली जाते.
- या फंडचे मॅनेजर इक्विटीमध्ये वैविध्य पद्धतीने गुंतवणूक करत असतात. त्यामुळे त्यातून मिळणारा परतावा हा बॅलन्स मानला जातो.
- यात किमान गुंतवणुकीचा कालावधी नाही. पण गुंतवणुकीचा लॉक-इन कालावधी तीन वर्षांचा आहे.
- ईएलएसएस म्युच्युअल फंडमध्ये कमीतकमी रकमेपासून गुंतवणूक करता येते.
- यात गुंतवलेल्या रकमेवर इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 80C अंतर्गत टॅक्स बेनिफिटचा लाभ घेता येतो.
ELSS फंडमध्ये गुंतवणूक करण्याची 5 प्रमुख कारणे
- टॅक्स बेनिफिट
- लॉक इन कालावधी
- दीर्घकालीन मुदतीचा लाभ
- बचतीची सवय लावण्यासाठी
- बचतीसह इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी
ELSS Mutual Fund मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात घ्या
म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीवर कोणता टॅक्स लागतो?
म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक आणि त्यातील गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्यावरही टॅक्स लागतो. म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीवर लागणारा हा टॅक्स दोन प्रकारे आकारला जातो. एक म्हणजे आपत्कालीन भांडवली नफा टॅक्स (Short Term Capital Gans-STCG) आणि दीर्घकालीन भांडवली नफा टॅक्स (Long Term Capital Gain-LTCG). या दोन टॅक्सबरोबरच म्युच्युअल फंडमधून मिळणाऱ्या लाभांशावर ही टॅक्स लागू होतो. त्याला लाभांश वितरण टॅक्स (Dividend Distribution Tax-DDT) म्हणतात. तसेच काही फंडानुसार टीडीएस (Tax Deduction at Source-TDS)ही कापला जातो.
अल्पकालीन भांडवली नफा टॅक्स काय आहे?
जर एखाद्या व्यक्तीने इक्विटी किंवा ईएलएसएस फंडमध्ये अल्प मुदतीसाठी म्हणजेच 12 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी गुंतवणूक केली असेल तर त्यावर 15 टक्के टॅक्स आकारला जातो.
दीर्घकालीन भांडवली नफा टॅक्स काय आहे?
गुंतवणूकदाराने एका ठराविक कालावधीसाठी गुंतवणूक केली आहे आणि त्यातून मिळणारा नफा हा 1 लाखापेक्षा कमी असेल तर त्यावर कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. पण तोच नफा 1 लाखापेक्षा अधिक असेल तर त्यावर 10 टक्क्याप्रमाणे टॅक्स आकारला जाईल.