Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

EPF or PF Calculator – Employee Provident Fund (EPF) Calculator Online in Marathi

मासिक पगार
तुमचे वय
Yr
EPF मध्ये तुमचे योगदान
%
EPF मध्ये तुमच्या नियोक्त्याचे योगदान
3.67%
पगारात वार्षिक वाढ
%
वर्तमान EPF शिल्लक असल्यास
व्याज दर किती टक्के?
8.10%
तुम्ही निवृत्त होईपर्यंत तुमच्याकडे

 

MahaMoney EPF Calculator कसा वापरायचा? त्याचे फायदे काय?  

EPF म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी. पण, सर्वसाधारणपणे, याला PF किंवा भविष्यनिर्वाह निधी म्हणूनच ओळखलं जातं. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा 1952 नुसार या निधीची स्थापना झाली आहे. या निधीमध्ये संघटित क्षेत्रात काम करणारे सर्व कर्मचारी सहभागी होऊ शकतात. या फंडात कर्मचारी तसंच कर्मचाऱ्याच्या खात्यात कंपनीही गुंतवणूक करत असते. नावाप्रमाणेच लोकांच्या निवृत्ती नंतरच्या निर्वाहाची सोय व्हावी म्हणून हा निधी स्थापन करण्यात आला आहे.  

ज्या कंपनीत 20 च्या वर कर्मचारी आहेत अशा सगळ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक करणं अनिवार्य आहे. पण, त्यापेक्षा कमी कर्मचारी असले तरीही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना EPF खातं उघडण्यासाठी मदत करू शकते.  

ज्या कंपनीत 20 च्या वर कर्मचारी आहेत, अशा कंपनीतल्या 15,000 रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचं EPF खातं असणं बंधनकारक आहे. पण, कंपन्या इतर कर्मचाऱ्यांनाही हे खातं उघडण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकतात. EPF साठी पगार म्हणजे मूळ पगार आणि महागाई भत्ता धरला जातो. इतर भत्ते यात धरण्यात येत नाहीत.  

अलीकडे EPF खात्यांबरोबर तुम्हाला UAN म्हणजे युनिक अकाऊंट नंबर दिला जात असल्यामुळे कंपनी बदललीत तरीही तुम्ही तुमच्या खात्यात जमा झालेली रक्कम दुसऱ्या कंपनीच्या खात्यात वळती करू शकता.  

EPF खात्यात पैसे कसे आणि किती गुंतवायचे यासाठी काही सरकारी नियम आहेत. दर महिन्याला कर्मचाऱ्याचा एकूण पगार आणि महागाई भत्ता मिळून एकूण कमाईतली 12% रक्कम भविष्य निर्वाह निधीत गुंतवली जाते. कंपनीकडूनही तेवढाच हिस्सा या फंडात जातो. कंपनीच्या एकूण हिश्शापैकी 8.33% रक्कम ही थेट पेन्शन फंडात जाते. तर उर्वरित 3.67% रक्कम ही PF म्हणजे भविष्य निर्वाह निधीत जाते. तर कर्मचाऱ्याच्या 12% हिश्शातली सर्व च्या सर्व रक्कम भविष्य निर्वाह निधीत जाते.  

निवृत्तीच्या वेळी तुमच्या EPF फंडातली सर्वाच्या सर्व रक्कम तुम्हाला उपलब्ध होऊ शकते. तर पेन्शन फंडातली रक्कम अर्थातच पेन्शनच्या रुपात मिळते. ही सरकारी योजना असल्यामुळे सर्वात सुरक्षित आहे. आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. सरकार यातील परताव्याची हमीही तुम्हाला देतं. योजनेवरचा व्याजदर EPFO ट्रस्टकडून दर वर्षी ठरवला जातो. आणि त्यानुसार, या निधीतल्या पैशावर ग्राहकांना वार्षिक व्याज मिळतं. हा व्याजदर एकतर कायम ठेवला जातो किंवा अंशत: वाढतो. पण, तो कमी झाल्याची उदाहरणं नाहीत.  

 

महामनी EPF कॅल्क्युलेटर काय आहे?  

महामनी EPF कॅल्क्युलेटरच्या मदतीने तुम्ही निवृत्तीच्या वेळी तुमच्या EPF खात्यात जमा होणाऱ्या भविष्य निर्वाह निधीचा अंदाज घेऊ शकता. या निधीतली तुमची हिस्सेदारी आणि कंपनीने उचललेला वाटा असा दोघांचा मिळून एकत्रित आकडा तुम्हाला इथं मिळेल. आणि या एकूण गुंतवणुकीवर मिळालेलं व्याजही तुम्हाला समजू शकेल.  

या कॅल्क्युलेटरमध्ये तुम्हाला तुमचं सध्याचं वय, मूळ पगार आणि महागाई भत्ता, महिन्याला तुम्ही फंडात जमा करत असलेली रक्कम तसंच तुमच्या EPF खात्यात आधीची काही रक्कम असेल तर ती ही तुम्हाला लिहिता येईल. आणि मग कॅल्क्युलेटर तुमच्यासाठी गणिती आकडेमोड करून तुम्हाला सांगेल निवृत्तीच्या वेळी तुमच्याकडे जमा होणारी रक्कम.  

महामनी EPF कॅल्क्युलेटरसाठी वापरलेलं सूत्र  

EPF मध्ये तुम्ही किती पैसे गुंतवू शकता यासाठी सरकारी नियम आणि मार्गदर्शक तत्त्वं आहेत. आणि एका खातेधारकाच्या EPF खात्यात त्याचा स्वत:चा आणि कंपनीचा असे दोन हिस्से दर महिन्याला जमा होत असतात.  

कर्मचाऱ्याचा EPF मधील वाटा  

दर महिन्याला, कर्मचारी आपला मूळ पगार आणि महागाई भत्ता मिळून येणाऱ्या आकड्यातली 12% रक्कम EPF खात्यात जमा करत असतो. म्हणजे तुमचा मूळ पगार जर 20,000 रुपये असेल (महागाई भत्ता नाही) तर यातले 12% म्हणजे 2,400 रुपये दर महिन्याला तुमच्या पगारातून वळते होऊन ते तुमच्या EPFO खात्यात जमा होतील.  

कंपनीचा EPF मधील वाटा  

कंपनीकडून त्यांच्या एकूण 12% हिस्सेदारी पैकी 8.33% वाटा हा पेन्शन फंडात गुंतवला जातो. तर 3.67% वाटा हा भविष्य निर्वाह निधीत गुंतवला जातो. वरील 20,000 रुपये मूळ पगाराचं उदाहरण घेतलं तर कंपनीकडून तुमच्या EPF निधीमध्ये दर महिन्याला 734 रुपये गुंतवले जातील.  

आणि दर महिन्याला तुमच्या EPF खात्यात तुमचे स्वत:चे आणि कंपनीचे मिळून एकूण 3,134 रुपये जमा होतील.  

EPF खात्यावरील व्याजदर  

आर्थिक वर्ष 2023-24 साठी EPF वरील व्याजदर 8.15% इतका करण्याची शिफारस EPFO ट्रस्टने अर्थ मंत्रालयाकडे केली आहे. EPFO ट्रस्ट हा व्याजदर दरवर्षी ठरवत असते. आणि त्यांच्या प्रस्तावावरून अर्थ मंत्रालयाकडून या व्याजदराला मान्यता देण्यात येते. प्रत्यक्ष EPF खात्यासाठी मात्र दर महिन्याच्या शेवटी व्याजदरानुसार व्याजाची रक्कम मोजण्यात येते. व्याजाची रक्कम मात्र दरवर्षी एकदा आर्थिक वर्षाच्या शेवटी जमा केली जाते.  

वर दिलेल्या उदाहरणानुसार, पहिल्या महिन्यात कर्मचाऱ्याच्या खात्यात 3,134 रुपये जमा होणार आहेत. आणि पुढच्या प्रत्येक महिन्यात तितकीच रक्कम खात्यात जमा होईल. पण, पहिल्या महिन्यात जमा रकमेवर कुठलंही व्याज मिळत नाही. तुम्ही व्याजासाठी पात्र ठरता ते दुसऱ्या महिन्यापासून. त्यामुळे दोन महिन्यात 6,268 रुपये इतकी रक्कम जमा झालेली असेल. आणि या रकमेवर 8.15% वार्षिक व्याज लागू होईल.  

पुढचे दहा महिने, दर महिन्याला व्याजाची रक्कम मोजली जाईल. आणि आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात ही व्याजाची रक्कम एकत्र करून तुमच्या खात्यात जमा केली जाईल. दर महिन्याला EPF खात्यात जमा होणाऱ्या रकमेनुसार तुमची गुंतवणुकीची रक्कम वाढत जाईल. आणि त्यामुळे व्याजही वाढत जाईल.  

एका कोष्टकाच्या मदतीने हे गणित समजून घेऊया,  

 

मूळ पगार + महागाई भत्ता  

20,000 रु.  

कर्मचाऱ्याची EPF हिस्सेदारी  

2,400 रु 

कंपनीचा EPF मधील वाटा  

734 रु.  

कंपनीचा पेन्शन फंडातील वाटा  

1,666 रु. 

एकूण EPF गुंतवणूक  

3,134 रु.  

आर्थिक वर्ष 2023-24 साठी व्याजदर  

8.15%  

दर महिन्याला मिळणारा व्याजदर  

0.6791% 

एकूण व्याज  

42.56 रु 

पण, ही सगळी आकडेमोड कागदावर करण्यापेक्षा कॅल्क्युलेटरच्या मदतीने हे गणित तुम्ही सोपं करू शकता. आणि फक्त वर्षाचंच नाही तर अख्ख्या कारकीर्दीचं गणित तुम्ही मांडू शकता.  

महामनी EPF कॅल्क्युलेटर कसा वापरायचा?  

Step 1 : तुमचा महिन्याचा पगार लिहा (मूळ पगार + महागाई भत्ता)  

Step 2 : तुमचं सध्याचं वय लिहा 

Step 3 : EPF मध्ये तुमचं योगदान (12%) लिहा 

Step 4 : EPF मधील कंपनीचं योगदान (3.67%) लिहा

Step 5 : पगारातील वार्षिक वाढ टक्क्यांमध्ये लिहा 

Step 6 : EPS फंडातील बाकी रक्कम (असल्यास)

Step 7 : सध्याचा व्याजदर (8.15%)

हे सगळे आकडे टाकलेत की, तुमच्या EPF खात्यात निवृत्तीच्या वेळी जमा होणारा अंदाजे निधी काही सेकंदात तुमच्यासमोर येईल.  

 

महामनी EPF कॅल्क्युलेटर तुम्हाला कशी मदत करेल? 

नोकरीच्या कालावधीत EPF मध्ये गुंतवलेल्या पैशातून निवृत्तीच्या वेळी तुमच्याकडे नेमका किती निधी जमा होईल याचा निश्चित अंदाज या कॅल्क्युलेटरमधून तुम्हाला येईल. यात व्याजदर हा एकच बदलणारा घटक आहे.  

EPF फंडाचा अंदाज घेतल्यानंतर ती रक्कम निवृत्ती नंतरच्या आयुष्यासाठी पुरेशी नसेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुम्ही इतरही ठिकाणी गुंतवणुकीचा विचार करू शकता. निवृत्ती नंतरच्या आर्थिक नियोजनासाठी हा कॅल्क्युलेटर खूप महत्त्वाचा ठरू शकतो.  

 

महामनी EPF कॅल्क्युलेटरचे फायदे  

निवृत्ती नंतरच्या निर्वाहासाठी निधीचा अंदाज - निवृत्तीच्या वेळी तुमच्या EPF खात्यात नेमके किती पैसे जमा असतील याचा नेमका अंदाज या कॅल्क्युलेटरमुळे तुम्हाला येतो. त्यावरून हे पैसे तुम्हाला पुरतील का किंवा इतरही गुंतवणूक करावी लागेल याचा निर्णय तुम्हाला घेता येईल. त्या दृष्टीने आर्थिक नियोजनाचा एक महत्त्वाचा घटक आहे हा कॅल्क्युलेटर  

निवृत्तीनंतर पैशाची सोय - मूळात EPF निधीची स्थापना लोकांना निवृत्ती नंतरच्या आयुष्यात आर्थिक गरजा भागवता याव्यात यासाठी पैशाची सोय म्हणून झाली. या निधीमध्ये नियमित गुंतवणुकीची सवय बाणवून तुम्ही भविष्याची नीट तरतूद करू शकता. आणि त्यासाठी हा कॅल्क्युलेटर तुम्हाला मदतच करेल.  

वापरायला सोपा - हा कॅल्क्युलेटर वापरायला अगदी सोपा आणि सुटसुटीत आहे. यात क्लिष्ट गणिती आकडेमोड तुम्हाला करावी लागत नाही. हे ऑनलाईन टूल ही आकडेमोड तुमच्यासाठी करतं. महामनी EPF कॅल्क्युलेटरवर क्लिक केलंत की, पुढच्या सूचना तुम्ही फक्त पार पाडायच्या आहेत. आणि ते सोपं आहे.  
बदलणाऱ्या व्याजदरांचं भान - या कॅल्क्युलेटरला EPF फंडावरील व्याजदर किती हे ठाऊक आहे. तुम्ही या माहितीवर लक्ष ठेवण्याची गरज नाही. तसंच व्याजाच्या गणितासाठी सूत्र लक्षात ठेवण्याची किंवा व्याज कधी आणि कसं जमा होतं याची माहिती ठेवण्याची गरज नाही. हे काम हा कॅल्क्युलेटर स्वत:हून करतो. म्हणजेच तो अपडेटेड आहे.  

 

 

 

 

महामनीचे इतर कॅल्क्युलेटर
PPF Calculator
NPS - National Pension Scheme 
Home Loan EMI  Calculator
SIP - Mutual Funds Calculator
Lumsum - Mutual Funds Calculator